Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 10
________________ संघर्ष टाळा नका पडू संघर्षात (वादविवादात) 'कोणाशी ही संघर्ष करू नका आणि संघर्ष टाळा.' ह्या आमच्या वाक्याचे जर आराधन कराल तर थेट मोक्षाला पोहचाल. तुमची भक्ति आणि आमचे वचनबल सर्वच काम करेल. तुमची तयारी पाहिजे. आमचे हे एकच वाक्य जर कोणी अमलात आणले तर तो मोक्षाला जाईल. अरे, आमचे हे एक सूत्र 'जसे आहे तसे' संपूर्ण गिळाल (आत्मासात कराल) तरीसुद्धा मोक्ष हातात लाभेल, असे आहे ! परंतु ते 'जसे आहे तसे' गिळून जा. आमचे हे एक सूत्र एक दिवस पाळलात तर गजबची शक्ति उत्पन्न होईल! आत एवढी सर्व शक्ति आहे कि, संघर्ष (वाद विवाद) कोणी करायला आले तरी त्याला टाळता येईल. जो जाणून-बुजून खाईत पडण्याच्या तयारीत आहे, त्याच्या बरोबर वादविवाद करीत बसायचे आहे का? अशी व्यक्ति तर कधीच मोक्षाला जाणार नाही, परंतु आपल्याला सुद्धा तो त्याच्या जवळ बसवून ठेवेल. अरे! हे आपल्याला कसे परवडणार? जर तुला मोक्षालाच जायचे आहे तर अश्यां बरोबर जास्त शहाणपणा करण्यात अर्थ नाही. सर्वच बाजूनी, चारी दिशांनी अगदी व्यवस्थित सांभाळायचे. जरी तुम्हाला या जाळ्यातून सुटायचे असले तरी हे जग तुम्हाला सुटू देणार नाही. म्हणून वादविवाद उत्पन्न न करता स्मूथली (सुरळीत) बाहेर निघून जायचे आहे. अरे, आम्ही तर असे सांगतो कि, जर तुमचे धोतर काट्यात अडकले असेल आणि जर तुमची मोक्षाची गाडी सुटत असेल

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38