Book Title: Je Ghadle Toch Nyay Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय बद्रीकेदारच्या जत्रेला लाखो लोक गेले होते आणि तेथे एकदम हिमवर्षाव झाला आणि शेकडो लोक चेंगरुन मेले. ही बातमी ऐकून प्रत्येकाला धक्का च बसतो कि, अरे ! भक्तिभावाने देवाचे दर्शन करायला जातात त्यांनाच देव मारुन टाकतो? परमेश्वर खूप अन्यायी आहे ! दोन भावामध्ये मिळकत वाटणीत एक भाऊ सगळे हडप करून टाकतो, दुसऱ्याला खूप कमी मिळते तेथे बुद्धि न्याय शोधते, शेवटी कोर्टाचा आधार घेतला जातो आणि सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण जाते त्याचा परिणाम, ते दुःखी दुःखी होतात. निर्दोष व्यक्ति तुरुंगात जाते, गुन्हेगार व्यक्ति मजा करते तेव्हा ह्यात न्याय कुठे राहिला? नितीवाली माणसे दु:खी होतात, अनितीवाला बंगला बांधतो, गाडीत फिरतो हा कुठला न्याय? असे प्रसंग वरच्यावर होत असतात, जेथे बुद्धि न्याय शोधायला लागते आणि दुःखी होऊन जाते. परम पूज्य दादाश्रींचा अद्भूत आध्यात्मिक शोध आहे की ह्या जगात कुठेही अन्याय होतच नाही. जे घडले तोच न्याय! निसर्ग कधी न्यायाच्या बाहेर गेला नाही. कारण कि, निसर्ग म्हणजे एखादी व्यक्ति किंवा देव नाही, कि त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे वर्चस्व राहिल. निसर्ग म्हणजे 'सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (वैज्ञानिक संयोगिक पुरावा).' कितीतरी संयोग एकत्र होतात तेव्हा एक कार्य घडते! एवढ्या सगळ्यात माणसात अमुक च का मेले? ज्याचा त्याचा हिशोब असतो त्याचा तो भोग बनतो, मृत्युचा आणि दुर्घटनेचा! एन इन्सिडन्ट हेझ सॉ मेनी कॉझीझ आणि एन एक्सिडेन्ट हेझ टू मेनी कॉझीझ. आपल्या हिशोबा शिवाय एकही मच्छर चावू शकत नाही. हिशोब आहे म्हणूनच दंड होतो. म्हणून ज्याला ह्यातून सुटायचे आहे त्याला ही च गोष्ट समजायला हवी, कि आपल्या बरोबर जे जे घडले तोच न्याय आहे! 'जे घडले तोच न्याय' ह्या ज्ञानाचा उपयोग जेवढा जीवनात होईल तेवढी शांति राहिल आणि अश्या प्रतिकूलतेत आतील परमाणु ही हलणार नाही. - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंदPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38