________________
२७
जे घडले तोच न्याय कोर्टात जायचे तेथे सुद्धा संतोष झाला नाही. शेवटी राष्ट्रपतिकडे, तरीही न्याय मिळत नाही. मार खाऊन मरतो! हा न्यायच शोधू नको, कि तो मला का शिव्या देऊन गेला. अशील माझ्या वकीलातीची फी का म्हणून देत नाही? नाही देत हा न्याय आहे. नंतर देऊन जातो, तो ही न्यायच आहे. न्यायाला तू शोधू नकोस.
न्याय : नैसर्गिक आणि विकल्पी दोन प्रकाराचे न्याय. एक विकल्पांना वाढविणारा न्याय आणि दूसरा विकल्पांना कमी करणारा न्याय. अगदी खरा न्याय विकल्पांना कमी करणारा आहे, कि घडले तो न्याय च आहे. आता तू ह्या वर दुसरा दावा करू नकोस. तू तुझी दुसरी गोष्ट ऐक आता, ह्यांच्यावर दावा मांडशील तर तुझ्या दुसऱ्या गोष्टी राहून जातील.
न्याय शोधायला निघाला म्हणजे विकल्प वाढतच जाणार आणि हा नैसर्गिक न्याय विकल्पांना निर्विकल्प बनवीत जातो. होऊन गेले, 'घडले तोच न्याय.' आणि त्यानंतर ही मग पाच व्यक्तिनी पंच नेमले तरीपण ते त्याच्या विरुद्धच जाणार. तो त्या पहिल्या न्यायाला स्वीकारत नाही, म्हणजे तो कोणाचे ऐकत नाही. त्यामुळे मग विकल्प वाढतच जातात. स्वत:च्या आजुबाजुचे जाळेच गुंफत राहतो, असा माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही. विनाकारण अतिशय दुःखी होतो! त्यापेक्षा पहिल्या पासूनच श्रद्धा ठेवावी कि 'जे घडून गेले तोच न्याय.'
आणि निसर्ग नेहमी न्यायच करीत असतो, निरंतर न्यायच करीत असते आणि तो पुरावा देऊ शकत नाही. पुरावे 'ज्ञानी' देतात कि, न्याय कशा रीतीने? हे 'ज्ञानी' सांगू शकतात. त्याला संतोष करून देतात आणि समाधान मिळते. निर्विकल्पी झाले तर निकाल (निवाडा) येतो.
- जय सच्चिदानंद