________________ जे घडले तोच न्याय जर निसर्गाच्या न्यायाला समजलात की जे घडले तोच न्याय' तर तुम्ही या जगातून मुक्त होऊ शकाल. जर निसर्गाला जरा सुद्धा अन्यायी मानले तर तेच तुमचे ह्या जगात गोंधळून जाण्याचे कारण ठरेल. निसर्गाला न्यायी मानणे त्याचेच नांव ज्ञान. जसे आहे तसे' जाणणे ह्याचे नाव ज्ञान आणि जसे आहे तसे' न जाणणे ह्याचे नाव अज्ञान. 'जे घडले तोच न्याय,' हे जाणले तर संपूर्ण संसारतून पार होता येईल असे आहे. जगात एकही क्षण अन्याय होत नाही. न्यायच होत आहे. पण बुद्धि आपल्याला फसवत असते की, ह्याला न्याय कसे म्हणता येईल? म्हणून आम्ही मूळ गोष्ट सांगू इच्छितो, की हा निसर्गाचा न्याय आहे, म्हणून तुम्ही बुद्धिपासून वेगळे होवून जा. एकदा समजून घेतल्यानंतर बुद्धिचे आपण ऐकायचे नाही. जे घडले तोच न्याय.' - दादाश्री ISAN 978-81-89911-25-8 9788189-933258 Printed in India Price 310 dadabhagwan.org