Book Title: Je Ghadle Toch Nyay
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/030117/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान प्ररूपित जे घडले तोच न्याय जो निर्सगाचा न्याय आहे त्यात एका क्षणसाठी सुद्धा अन्याय झालेला नाही। Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ AMA दादा भगवान प्ररूपित जे घडले तोच न्याय मुळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल महाविदेह फाउन्डेशन 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) २७५४०४०८ All Rights reserved - Dr. Niruben Amin Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. १००० १००० १००० प्रथम आवृत्ति : द्वितीय आवृत्ति : तृतिय आवृत्ति : चतुर्थ आवृत्ति : पंचम आवृत्ति : छठ्ठी आवृत्ति : सितम्बर २००७ फरवरी २००९ दिसम्बर २००९ सितम्बर २०११ मार्च २०१२ अक्तुबर २०१३ १००० ३००० ३००० भाव मूल्य : ‘परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : १० रुपये लेज़र कम्पोज : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद. मुद्रक : महाविदेह फाउन्डेशन पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैन्क के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४ Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાનતીર્થકર . શ્રીસીમંધરસ્વામી | नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी १. भोगतो त्याची चुक ६. क्रोध २. एडजेस्ट एवरीव्हेर ७. चिंता ३. जे घडले तोच न्याय ८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा ९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे? हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दु:खों से मुक्ति २३. दान ३. कर्म का सिद्धांत २४. मानव धर्म ४. आत्मबोध २५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ? २६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष ७. भुगते उसी की भूल २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर २९. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए ३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय ३१. अहिंसा ११. चिंता ३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध ३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण ३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन? ३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार ३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप ३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन? ३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र ३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम ४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८ दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे। Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण ? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम ( क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए. एम. | पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत। ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही । माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो. ' व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही? - दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे. हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत. पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे. ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे. प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा. ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे. अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय बद्रीकेदारच्या जत्रेला लाखो लोक गेले होते आणि तेथे एकदम हिमवर्षाव झाला आणि शेकडो लोक चेंगरुन मेले. ही बातमी ऐकून प्रत्येकाला धक्का च बसतो कि, अरे ! भक्तिभावाने देवाचे दर्शन करायला जातात त्यांनाच देव मारुन टाकतो? परमेश्वर खूप अन्यायी आहे ! दोन भावामध्ये मिळकत वाटणीत एक भाऊ सगळे हडप करून टाकतो, दुसऱ्याला खूप कमी मिळते तेथे बुद्धि न्याय शोधते, शेवटी कोर्टाचा आधार घेतला जातो आणि सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण जाते त्याचा परिणाम, ते दुःखी दुःखी होतात. निर्दोष व्यक्ति तुरुंगात जाते, गुन्हेगार व्यक्ति मजा करते तेव्हा ह्यात न्याय कुठे राहिला? नितीवाली माणसे दु:खी होतात, अनितीवाला बंगला बांधतो, गाडीत फिरतो हा कुठला न्याय? असे प्रसंग वरच्यावर होत असतात, जेथे बुद्धि न्याय शोधायला लागते आणि दुःखी होऊन जाते. परम पूज्य दादाश्रींचा अद्भूत आध्यात्मिक शोध आहे की ह्या जगात कुठेही अन्याय होतच नाही. जे घडले तोच न्याय! निसर्ग कधी न्यायाच्या बाहेर गेला नाही. कारण कि, निसर्ग म्हणजे एखादी व्यक्ति किंवा देव नाही, कि त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे वर्चस्व राहिल. निसर्ग म्हणजे 'सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (वैज्ञानिक संयोगिक पुरावा).' कितीतरी संयोग एकत्र होतात तेव्हा एक कार्य घडते! एवढ्या सगळ्यात माणसात अमुक च का मेले? ज्याचा त्याचा हिशोब असतो त्याचा तो भोग बनतो, मृत्युचा आणि दुर्घटनेचा! एन इन्सिडन्ट हेझ सॉ मेनी कॉझीझ आणि एन एक्सिडेन्ट हेझ टू मेनी कॉझीझ. आपल्या हिशोबा शिवाय एकही मच्छर चावू शकत नाही. हिशोब आहे म्हणूनच दंड होतो. म्हणून ज्याला ह्यातून सुटायचे आहे त्याला ही च गोष्ट समजायला हवी, कि आपल्या बरोबर जे जे घडले तोच न्याय आहे! 'जे घडले तोच न्याय' ह्या ज्ञानाचा उपयोग जेवढा जीवनात होईल तेवढी शांति राहिल आणि अश्या प्रतिकूलतेत आतील परमाणु ही हलणार नाही. - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय विश्वाची विशालता, शब्दातीत... ह्या साऱ्या शास्त्रात लिहीले आहे एवढे च जग नाही. शास्त्र मध्ये तर अमुकच भाग आहे. जग हे तर अवक्तव्य आणि अवर्णनीय आहे कि ते शब्दाने सांगता येणारे नाही, मग तुम्ही शब्दांच्या बाहेर कुठून आणणार? शब्दात सांगता येणार नाही, ते शब्दांच्या पलीकडेचे त्याचे वर्णन तुम्ही कसे समजणार? एवढे मोठे विशाल आहे जग, आणि ते मी पाहून बसलो आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो कि, जग किती विशाल आहे ! निसर्ग तर सदा न्यायीच जो निसर्गाचा न्याय आहे तेथे एक क्षण सुद्धा अन्याय होत नाही. एक क्षण सुद्धा हा निसर्ग अन्यायाला पावला नाही. कोर्टात तसे झाले असेल, कोर्टात सगळे काही चालते. परंतु निर्सग कधी अन्यायी होत नाही. निसर्गाचा न्याय कसा आहे? तुम्ही जर इमानदार असाल आणि आज जर तुम्ही चोरी करायला जाल तर तो तुम्हाला आधीच पकडून देईल आणि मलीन माणूस असेल तर त्याला पहिल्या दिवशी एन्करेज (प्रोत्साहित) करेल. निसर्गाचा असा हिशोब असतो कि पहिल्याला स्वच्छ ठेवायचे, म्हणून त्याला पकडवून देतो, मदत नाही करत आणि दुसऱ्याला मदतच करत राहतो. नंतर असा मार मारेल कि तो पुन्हा कधी वर येणारच नाही. तो अगदी अधोगतीला जाईल, पण निर्सग एक मिनिट सुद्धा अन्याय करत Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय २ नाही. लोक मला विचारतात कि तुमच्या पायाला फ्रेक्चर झाले आहे ते? तेव्हा मी सांगतो कि न्याय च केला आहे निसर्गने. निसर्गाच्या न्यायाला जो समजेल 'घडले तोच न्याय' तर तुम्ही या जगातून मुक्त होऊ शकाल. नाहीतर निसर्गाला जरा सुद्धा अन्यायी समजलात तर मग तुमचे जगातील गोंधळून जायचे स्थानच आहे हे! निसर्गाला न्यायी मानणे ह्यालाच ज्ञान म्हणतात. 'जसे आहे तसे' समजणे, ह्याचे नांव ज्ञान 'जसे आहे तसे' न समजणे ह्याचे नांव अज्ञान. एका माणसाने दुसऱ्याचे घर जाळून टाकले, तर अशा वेळेस कोणी विचारेल कि देवा हे काय? ह्याचे घर ह्या माणसाने जाळले हेच न्याय. हा न्याय आहे कि अन्याय ? तर म्हणे, 'न्याय. जाळले हेच न्याय.' आता त्याच्यावर तो राग काढेल, कि नालायक आहे, असा आहे आणि तसा आहे. त्यानंतर त्याला अन्यायाचे फळ मिळेल. तो न्यायालाच अन्याय म्हणत आहे ! हे जग अगदी न्यायस्वरूप च आहे. एक क्षण भर ही त्यात अन्याय होत नाही. ह्या जगात न्याय शोधू नका. न्यायामुळेच सर्व जगात वादविवाद (भांडणे) व्हायला लागले आहेत. जग हे न्यायस्वरूपच आहे. म्हणून जगात न्याय शोधू च नका. जे घडले तोच न्याय. जे होऊन गेले तोच न्याय. ही कोर्ट वगैरे झालीत, ते न्याय शोधायला निघालात म्हणून ! अरे माणसा, न्याय होतो का? त्यापेक्षा काय झाले ते पहा! हाच न्याय आहे. न्यायस्वरूप वेगळे आहे आणि आपले हे फळस्वरूप वेगळे आहे. न्याय अन्यायाचे फळ हे सारे हिशोबाने येते आणि आपण आपला न्याय त्याच्या बरोबर जोइन्ट करायला (जोडायला) जातो. त्यामुळे तर कोर्टातच जावे लागते ना? आणि तेथे जाऊन थकून परतच यायचे आहे शेवटी ! एखाद्याला आपण एक शिवी दिली तर तो परत आपल्याला दोनतीन शिव्या देणारच. कारण कि त्याचे मन आपल्यावर रागाने उफाळत असते. तर लोक काय म्हणतात ? त्याने तीन शिव्या का दिल्या? ह्याने तर एकच Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय दिली होती. तर ह्याचे न्याय काय आहे? हे च कि त्यानी आपल्याला तीन शिव्या द्याच्या च होत्या. कारण तो मागचा हिशोब वसुल करणार कि नाही? प्रश्नकर्ता : हो, करुन घेणार. दादाश्री : नंतर वसूली करणार च ना! त्याच्या वडीलांना जर आपण पैसे दिले असले आणि मग संधी मिळाली, तर आपण ते वसुल करून घेऊ ना?! पण तो तर समजेल कि हा अन्याय करीत आहे. असा च हा निसर्गाचा न्याय आहे कि मागचा हिशोब असेल ते सगळे एकत्र जोडून देतो. आज पतिला त्याची पत्नी त्रास देत असेल, तो निसर्गाचा न्याय च आहे. पति समजतो कि ही पत्नी खूप वाईट आहे, आणि पत्नी काय समजणार कि नवरा वाईट आहे. परंतु हा निसर्गाचा न्याय च आहे. प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : आणि मग तुम्ही तक्रार करता. मी तक्रार ऐकत नाही, याचे कारण काय? प्रश्नकर्ता : आता लक्षात आले कि, हा न्याय आहे. गुंथा सोडवतो निसर्ग दादाश्री : ही आमची शोधखोळ आहे ना सगळी! भोगतो त्याची चुक' पहा शोध किती चांगला आहे! कोणाच्याही संघर्षात (वादविवादात) पडायचे नाही, आणि व्यवहारात न्याय शोधूच नका. नियम कसा आहे कि जसा गुंथा केला असेल, त्या पद्धतीनेच तो गुंथा सुटत जाईल. अन्यायपूर्वक गुंथा केला असेल तर अन्यायाने सुटतो आणि न्यायाने केला असेल तर न्यायाने सोडवला जातो. अशा रीतीने सारा गुंथा सोडवला जातो आणि लोक त्यात न्याय शोधतात. अरे माणसा ! कोर्टा प्रमाणे न्याय कसला शोधतोस! अन्यायपूर्वक गुंथा तू केलास आणि आता न्यायपूर्वक तू तो सोडवू पाहतोस. हे कसे होईल? हे तर नऊने गुणायचे Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय आणि नऊने भागायचे म्हणजे पुन्हा मूळ ठिकाणीच येणार न! सारे गुंथे कसे गुरफटलेले आहेत. म्हणून माझे हे शब्द ज्याने पकडले असतील त्यांचे काम होवून जाईल ना ! ४ प्रश्नकर्ता : हो दादा, हे दोन-तीन शब्द पकडले असतील आणि जिज्ञासु माणूस असेल त्याचे काम होऊन जाईल. दादाश्री : काम होऊन जाईल, जास्त शहाणपणा केला नाही, तर काम होऊन जाईल. प्रश्नकर्ता : व्यवहारात ‘तू न्याय शोधू नको' आणि 'भोगतो त्याची चुक', हे दोन सूत्र पकडले आहेत. दादाश्री : न्याय शोधू नको. हे जर वाक्य पकडून ठेवले तर त्याचे सगळे व्यवस्थित होऊन जाईल. हा न्याय शोधतो आहे, गुंतागुंती होत असते. म्हणूनच सर्व पुण्योदयाने खूनी पण सुटेल निर्दोष प्रश्नकर्ता : कोणी कोणाचा खून केला, तर तो पण न्यायच म्हणता येईल का? दादाश्री : न्यायाच्या बाहेर काहीच होत नाही. न्यायच म्हटले जाते परमेश्वराच्या भाषेत. सरकारी भाषेत नाही म्हणता येणार. लोकभाषेत नाही म्हणता येणार. लोकभाषेत तर खून करणाऱ्याला पकडून आणतील, कि हाच गुन्हेगार आहे आणि परमेश्वराच्या भाषेत काय म्हणतात? ते म्हणतात कि, ज्याचा खून झाला तो गुन्हेगार आहे. तेव्हा म्हणे, हा खून करणाऱ्याचा गुन्हा नाही? तेव्हा सांगतात, नाही, खून करणारा जेव्हा पकडला जाईल, त्यानंतर तो गुन्हेगार म्हटला जाईल. आता तर तो पकडला गेला नाही, आणि हा पकडला गेला. तुमच्या लक्षात आले नाही का? प्रश्नकर्ता : कोर्टात एखादा माणूस खून करून निर्दोष सुटून जातो, Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय तो त्याच्या पुण्यमुळे सुटून जातो कि तो त्याच्या पूर्वकर्मचा बदला घेत आहे म्हणून सुटतो. हे काय आहे? दादाश्री : ते पुण्य, आणि पूर्वकर्माचा बदला एकच म्हटले जाते. तो त्याच्या पुण्याइने सुटून गेला आणि कोणी केले नसेल तरी पण पकडला जाईल, त्याला जेलमध्ये जावे लागेल. तो त्याच्या पापाचा उदय. त्यात सुटकाच नाही. बाकी, या कोर्टात कधीकधी अन्याय होतो. परंतु ह्या जगात निसर्ग अन्याय करत नाही, न्यायातच असतो. न्यायाच्या बाहेर निसर्ग कधी ही गेला नाही. मग वादळ दोनदा येवो किंवा एकदा येवो, परंतु न्यायातच होत असते. प्रश्नकर्ता : आपल्या दृष्टिने विनाश होताना जी दृश्ये दिसतात, ते आपल्यासाठी श्रेयकर असतात ना? दादाश्री : विनाश होतांना दिसते, त्याला श्रेयकर कसे म्हणता येईल? पण विनाश होतो ते खरच पद्धतशीर सत्य आहे. निसर्ग तिथे विनाश करतो ते बरोबर आहे आणि निसर्ग ज्याचे पोषण करतो ते पण बरोबर आहे. सर्व अगदी व्यवस्थित चालू आहे ऑन द स्टेज! हे तर लोक आपल्या स्वार्थामुळे ओरडत असतात कि, माझे पीक जळाले तेव्हा ते लहान शेतकरी म्हणतात आमचा फायदा झाला, म्हणजेच लोक तर स्वतःच्या स्वार्थलाच गातात. प्रश्नकर्ता : आपण म्हणता कि निर्सग न्यायी आहे, तर मग भूकंप होतो, वादळ होते, पाऊस खूप पडतो ते का बरं? दादाश्री : तो सर्व न्यायच करीत असतो, पाऊस पडतो, खूप धान्य पिकते. हे सारे न्यायच होत आहे. भूकंप होतो तो पण न्यायच होत आहे. प्रश्नकर्ता : ते कसे काय? दादाश्री : जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनाच पकडले जाते इतरांना नाही. गुन्हेगारालाच पकडले जाते! हे जग किंचित्मात्र डिस्टर्ब झालेले नाही. एक सेकन्डही न्यायाच्या बाहेर मुळीच गेले नाही. Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय जगात जरूरत चोर आणि सापांची कधीकधी लोक मला विचारतात हे चोर लोक कशाला आले आहेत? ह्या साऱ्या खिसेकापूची काय आवश्यकता आहे? परमेश्वराने त्यांना का बरे जन्म दिला असणार? अरे! ते नसते तर तुमचे खिसे रिकामे कोण करणार? परमेश्वर स्वतः येतील का? तुमचे चोरीचे धन कोण घेवून जाणार? तुमचा पैसा खोटा असेल तर कोण घेवून जाणार? ते निमित्तमात्र आहेत बिचारे. म्हणून ह्या सर्वांची जरूरी आहे. प्रश्नकर्ता : कोणाच्या घामाची कमाई पण निघून जाते. दादाश्री : ही तर ह्या जन्माची घामाची कमाई पण मागचा सगळा हिशोब बाकी आहे ना! वहीखाते बाकी आहे म्हणून, नाहीतर आपले कोणी कधी घेऊन जाणार नाही! कोणाची अशी शक्तिच नाही कि तो घेऊन जाईल. आणि घेऊन जाणे हा तर कित्येक जन्माचा मागचा हिशोब आहे. ह्या जगात असा कोणी जन्मला नाही कि जे कोणाला काही करू शकेल. इतके सारे नियमबद्ध जग आहे. खूपच नियमबद्ध चालणारे जग आहे. साप पण शिवणार नाही. एवढे मोठे मैदान सापाने भरलेले असेल, पण ते काही करणार नाही. असे नियमबद्ध जग आहे. खूप हिशोबी जग आहे. हे जग खूप सुंदर आहे. न्यायस्वरूप आहे, पण ते लोकांना समजत नाही. परिणामावरुन कारण कळते हा सारा निकाल आहे. जसा परीक्षेचा निकाल येतो ना, या गणितात शंभर पैकी पंच्यान्नव गुण मिळतात आणि इंग्रजीत शंभर पैकी पंचवीस गुण मिळतात. तर काय आपल्या लक्षात येत नाही कि, आपली कुठे चुक झाली? ह्या परिणामावरुन, कोणत्या, कोणत्या कारणाने चूका झाल्या ते आपल्याला समजते ना? असे हे सर्वांचे परिणाम येतात. हे सर्व संयोग जे एकत्र होतात, ते सारे परिणाम आहेत. आणि त्या परिणामावरुन कारण काय होते ते आपल्याला कळते. Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय इथे रस्त्यात सर्व माणसे येत-जात असतात आणि रस्त्यातच बाभळीच्या काट्याची मोळी पडलेली असते. रस्त्यातून इतके लोक येत-जात असतात पण ती मोळी तशीच पडलेली असते. आपण कधीही बूट, चप्पल घातल्या शिवाय निघत नाही. परंतु त्या दिवशी कोणाकडे गेलो असताना तेथे आरडा ओरड होते कि चोर आला, चोर आला, तेव्हा आपण जर अनवाणी पायाने पळालो, तर ती काट्याची मोळी आपल्या पायाला लागली, तर तो हिशोब आपला! अगदी काटा आरपार निघून जाईल असा लागला ! आता हे संयोग कोणी एकत्र करून आणले? हे 'व्यवस्थित शक्ति' एकत्र करून देतो. (व्यवस्थित शक्ति=वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होऊन आलेला परिणाम.) कायदे सर्व निसर्गाधीन... ७ मुंबईच्या फोर्ट भागात तुमचे सोन्याचा पट्यावाले घड्याळ पडले आणि घरी आल्यानंतर तुम्ही अशी आशा ठेवणार नाही, कि ते घड्याळ पुन्हा तुमच्या हातात येईल. तरी दोन दिवसानंतर पेपरात जाहिरात येते कि, ज्याचे घड्याळ हरवले असेल, तो त्या बद्दलचा पुरावा दाखवून घेऊन जावे आणि जाहिरातीचा खर्च मात्र द्यावा. म्हणजे ज्याचे आहे, त्याचे कोणी घेऊ शकणार नाही. ज्याचे नाही त्याला ते मिळणार नाही. एक सेन्ट पण कोणत्याही पद्धतीने कोणी पुढे-मागे करु शकणार नाही. इतके नियमबद्ध जग आहे. कोर्ट कशी पण असो, पण ते कलियुगाच्या आधाराने च असणार! परंतु हे निसर्गाच्या नियमाधीन असते. कोर्टाचे कायदे मोडले असतील तर कोर्टा संबंधी गुन्हा लागू पडेल. पण निसर्गाच्या कायद्याला तोडु नका. हे तर आहे स्वतःचेच प्रोजेक्शन बस, हे सारे प्रोजेक्शन (प्रयोजन) तुमचेच आहे. लोकांना का बरे दोष द्यायचा? प्रश्नकर्ता: क्रियेची प्रतिक्रिया आहे ही. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय दादाश्री : त्याला प्रतिक्रिया नाही म्हणता येणार. पण हे प्रोजेक्शन सारे तुमचे आहे. प्रतिक्रिया म्हणाल तर मग एक्शन एन्ड रिएक्शन आर इक्वल एन्ड अपॉझिट (क्रिया आणि प्रतिक्रिया समांतर आणि विरुद्ध दिशेच्या असतात). हे तर उदाहरण दिले, फक्त रूपक दिले. तुमचेच प्रोजेक्शन आहे हे. ह्यात दुसऱ्या कोणाचा हात नाही. म्हणून तुम्हाला जागृत असायला पाहिजे कि ही जबाबदारी माझ्यावरच आहे. जबाबदारी समजल्यावर घरातील वर्तन कसे असते? प्रश्नकर्ता : त्याच्या प्रमाणे वर्तन करायला पाहिजे. दादाश्री : हो. स्वत:ची जबाबदारी समजा. नाहीतर म्हणाल कि भगवंताची भक्ति केल्याने हे सारे गुन्हे धुतले जाईल. पोलंपोल! भगवंताच्या नांवाने पोल मारली लोकांनी. जबाबदारी स्वत:ची आहे. सर्वस्व तुमचीच जबाबदारी, प्रोजेक्शनच तुमचे आहे ना? कोणी दुःख दिले तर, जमा करून टाकावे. जे दिलेले असेल तेच जमा करायचे आहे. कारण कि, येथे, विनाकारण दुसऱ्याला दुःख देता येईल, असा कायदा नाही. त्याच्यामागे कारण असली पाहिजे, म्हणून जमा करून ठेवायचे. संसार चक्रातून सुटायचे आहे त्याला मग कधी वरणात मीठ जास्त पडले तो पण न्याय! प्रश्नकर्ता : काय होत आहे ते पहायचे, असे तुम्ही म्हणाले होते. तर मग न्याय करण्याचा प्रश्नच कुठे येतो? दादाश्री : न्याय, मी जरा वेगळेच सांगू इच्छितो. पहा ना, त्याचा हात थोडा रॉकेलतेलाचा आहे, त्या हाताने तांब्या पकडला असेल त्यामुळे तांब्या रॉकेलच्या वासाचा झाला. आता मी सहज पाणी प्यायला Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय गेलो, तर मला रॉकेलचा वास आला. तेव्हा आम्ही 'पहातो आणि जाणतो' कि काय झाले ते! मग न्याय काय व्हायला पाहिजे कि, कधी नाही आणि आज आपल्या वाट्याला हे कुठुन आले? म्हणून हा आपलाच हिशोब आहे. तर मग हा हिशोब पूर्ण करून टाका. परंतु कोणाला कळणार नाही अश्यारीतीने, तो पूर्ण करून टाका. मग सकाळी उठल्या वर त्या बाईनी येऊन परत तेच पाणी मागवून दिले, तरी पुन्हा तेच पाणी आम्ही पिऊन जातो. पण कोणाला कळू देत नाही, आता अज्ञानी ह्या ठिकाणी काय करेल? प्रश्नकर्ता : आरडाओरड करून टाकेल. दादाश्री : घरातील सर्व माणसांना समजून जाईल कि ओहोहो! आज शेठजीच्या पाण्यात रॉकेल पडले! प्रश्नकर्ता : सगळे घर हादरुन जाईल. दादाश्री : अरे, सगळ्यांना वेडे करून टाकेल! आणि बायको तर बिचारी चहात साखर टाकायचेच विसरुन जाईल. एकदा विचलीत झाले तर काय होणार? इतर सर्व बाबतीत पण विचलीत होणार. प्रश्नकर्ता : दादा, आपण तक्रार न करणे हे बरोबर, पण मग शांत चित्ताने घरच्यांना सांगू शकतो ना कि भाऊ, पाण्यात रॉकेल मिसळले होते. आता या पुढे लक्षात ठेवा. ___ दादाश्री : हे केव्हा सांगता येईल? चहा पाणी चालले असेल, सगळे अगदी हसत असतील, तेव्हा हासतहासत आपण गोष्ट सांगून टाकावी. जशी आम्ही ही गोष्ट उघड केली ना?! असेच हासत-खेळत असतांना ती गोष्ट उघड करून टाकावी. प्रश्नकर्ता : म्हणजे समोरच्या व्यक्तिला टोचणार नाही अशा रीतीने सांगायचे ना? Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ १० जे घडले तोच न्याय दादाश्री : होय, ह्याच पद्धतीने सांगायचे तर तो समोरच्या व्यक्तिला मदतीचे ठरेल. पण सगळ्यात चांगला मार्ग हाच कि मेरी भी चूप अन् तेरी भी चूप!!! ह्याच्या शिवाय दुसरे काहीच नाही. कारण कि ज्याला संसारातून सूटका करायची आहे तो किंचित ही आरडाओरड करणार नाही. प्रश्नकर्ता : सल्ला देण्याच्या दृष्टिने ही काही सांगायचे नाही? तेथे पण चूप रहायचे का? दादाश्री : तो त्याचा सर्व हिशोब घेऊन आला आहे. शहाणे होण्यासाठी पण तो सारा हिशोब घेऊनच आलेला आहे. आम्ही काय सांगतो कि संसारतून सूटायचे असेल तर पळून जा. आणि पळायचे असेल तर काही बोलू नको. रात्री पळून जायचे असेल आणि आपणच आरडाओरड केली तर मग आपण पकडले जाऊ ना! परमेश्वराकडे कसे असते? परमेश्वर न्यायस्वरूप नाही आणि अन्यायस्वरूप पण नाही. कोणाला दु:ख होऊ नये हीच परमेश्वराची भाषा आहे. म्हणून न्याय-अन्याय ही तर लोकभाषा आहे. चोर चोरी करण्यात धर्म समजतो, दानेश्वर दान देण्यात धर्म समजतो, ही लोकभाषा आहे, परमेश्वराची भाषा नाही. परमेश्वराकडे असे तसे काहीच नाही. परमेश्वराकडे तर एवढेच आहे कि, 'कोणत्याही जीवाला दुःख होणार नाही, हीच आमची आज्ञा आहे!' न्याय-अन्याय तर निसर्गच पहातो. बाकी, ह्या इथे जो जगाचा न्यायअन्याय आहे ते शत्रूला, गुन्हेगाराला मदत करतो. म्हणेल, 'असेल बिचारा, जाऊ द्या ना!' मग तो गुन्हेगार असा सूटुन जातो. 'असेच असते.' म्हणा. बाकी, निसर्गाच्या न्यायाला तर सुटकाच नाही. तिथे कोणाचेच चालत नाही! Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय स्वदोष दाखवतो अन्याय फक्त स्वत:च्या दोषाने जग सर्व बेकायदेशीर वाटते. बेकायदेशीर कोणत्याही क्षणी नसते. अगदी न्यायशील असते. इथल्या कोर्टाच्या न्यायात फरक पडू शकतो. तो खोटा होऊ शकतो, पण ह्या निसर्गाच्या न्यायात फरक होत नाही. प्रश्नकर्ता : कोर्टाचा न्याय हा निसर्गाचा न्याय, नाही का? दादाश्री : हे सारे नैसर्गिकच आहे. परंतु कोर्टात आपल्याला असे वाटते कि ह्या जज्जने असे केले. तसे निसर्गाच्या बाबतीत वाटणार नाही ना! पण ही तर बुद्धिची लढाई आहे! प्रश्नकर्ता : तुम्ही निसर्गाच्या न्यायाला कॉम्प्युटर बरोबर तुलना केली पण कॉम्प्युटर तर मेकॅनिकल (यंत्रवत्) असते? दादाश्री : त्याच्या सारखे समजविण्याचे दुसरे कोणते साधन नव्हते म्हणून मी हे उदाहरण दिले. बाकी कॉम्प्युटर तर फक्त सांगण्यासाठीच आहे कि कॉम्प्युटर मध्ये जसे फीड केला जातो, तसे ह्यात आपला भाव भरला जातो. म्हणजे एका जन्मातील भावकर्म आहेत ते त्यात पडल्या नंतर दुसऱ्या अवतारात त्याचा परिणाम दिसून येतो, म्हणजे त्याचे विसर्जन होते. आणि ते ह्या 'व्यवस्थित शक्तिच्या' हातात आहे. जे एक्झेक्ट न्यायच करतो. जसे न्यायपूर्ण असेल तसेच करतो. बाप आपल्या मुलाला मारुन टाकतो असे सुद्धा न्यायात येते. तरीसुद्धा त्याला न्याय म्हणतात. निर्सगाच्या न्यायाला न्यायच म्हणतात. कारण कि जसा बाप आणि लेकाचा हिशोब होता, तसे हे हिशोब चुकविले. तो हिशोब होऊन गेला. ह्यात हिशोब (वसूली) असतो, दुसरे काही नाही. एखाद्या गरीब माणसाला लॉटरीत एक लाख रुपये मिळतात ना! हा पण न्याय आहे, आणि कोणाचा खिसा कापला गेला तर तो पण न्याय! Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ १२ जे घडले तोच न्याय निसर्गाच्या न्यायाला आधार काय? प्रश्नकर्ता : निसर्ग न्यायी आहे, त्याला आधार काय? न्यायी म्हणण्यासाठी काही आधारभूत गोष्ट तर पाहिजे ना? दादाश्री : हे न्यायी आहे. ते तर तुम्हाला समजण्यापुरतेच आहे. तुम्हाला खात्री होईल कि न्यायी आहे. परंतु बाहेरच्या लोकांना निसर्ग न्यायी आहे ह्याची कधीच खात्री होणार नाही. कारण कि त्यांना स्वत:ची दृष्टि नाही ना! (ज्याला आत्मज्ञान प्राप्ति झालेली नाही त्याची दृष्टि सम्यक् नाही.) बाकी, आम्ही काय सांगू इच्छितो कि ? आफ्टर ऑल (शेवटी), जग काय आहे? अरे! भाऊ हे असेच आहे. एक अणूचा पण फरक होणार नाही, एवढे सारे न्यायस्वरूप आहे, निव्वळ न्यायी आहे. निसर्ग दोन वस्तुनी बनलेले आहे. एक स्थायी सनातन वस्तु आणि दुसरी अस्थायी वस्तु. जी अवस्था रुपाने आहे. त्यात अवस्था बदलत राहणार आणि त्यांच्या कायद्यानुसार बदलत राहणार. पहाणारा माणूस स्वत:च्या एकांतिक बुद्धिने पाहतो. अनेकांत बुद्धिने कोणी विचार करीत नाही, पण स्वतःच्या स्वार्थनेच पहात असतो. कोणाचा एकुलता एक मुलगा मेला तरी तो न्यायच आहे. तेथे काही कोणी अन्याय केलेला नाही. ह्यात परमेश्वराचा, कोणाचाही अन्याय नाही. हा न्यायच आहे! म्हणून आम्ही म्हणतो कि जग हे न्यायस्वरूप आहे. निरंतर न्यायस्वरूपातच आहे. कोणाचा एकुलता एक मुलगा गेला तर, त्यात त्यांच्या घरातीलच माणसे रडतात. दुसरे आजुबाजूची माणसे का रडत नाही? ती घरातील माणसे स्वतःच्या स्वार्थामुळे रडतात. जर सनातन तत्वात (आत्मस्वरूपात) आलात तर निसर्ग न्यायपूर्ण च आहे. तालमेळ पडतो का ह्या सर्व गोष्टीत? मेळ जमला तर समजावे कि Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय बरोबर आहे. ज्ञानदृष्टिने पाहिले तर दुःख किती कमी होऊन जाते? ज्ञान ठेवून बघितल तर? आणि एक सेकन्डसाठी पण न्यायात फरक नाही होत. जर अन्यायी असते तर कोणी मोक्षाला जाणार नाही. हे तर कोणी म्हणेल, कि चांगल्या माणसांना अडचणी का येतात? पण इतर माणसे अशी काही अडचण करू शकणार नाहीत. कारण कि स्वतः जर कशात ही हस्तक्षेप केला नाही, तर कोणाची हिंमत नाही कि तुमचे नांव घेतील. आपण स्वतः हस्तक्षेप केला म्हणून हे सारे झाले. प्रेक्टिकल पाहिजे, थियरी नाही पण शास्त्रकार काय म्हणतात. 'जे घडले तोच न्याय' असे म्हणत नाही. ते तर (लौकिक) न्याय हाच न्याय म्हणतात. अरे वेड्या, तुझ्यामुळे तर आम्ही रखडुन पडलो ! त्यामुळे थियरेटिकली असे म्हणतात कि न्याय हाच न्याय तर प्रेक्टिकल काय म्हणते, जे घडले तोच न्याय प्रेक्टिकल शिवाय जगात काही काम होत नाही. म्हणन हे थियरेटिकल टिकले नाही. म्हणून, जे घडले तोच न्याय. निर्विकल्पी व्हायचे आहे, तर 'जे घडले तोच न्याय.' विकल्पी व्हायचे असेल तर न्याय शोधा. म्हणजे परमात्मा व्हायचे असेल तर ह्या बाजूला जे घडेल तोच न्याय आणि भटकंती व्हायचे असेल तर हा न्याय शोधून भटकतच रहावे लागेल निरंतर. लोभींना बोचे नुकसान हे जग खोटे नाही. जग न्यायस्वरूप आहे बिलकुल कधी ही अन्याय केला नाही निसर्गाने. निसर्ग माणसाला कापून टाकतो, अपघात होतो, हे सारे न्यायस्वरूप आहे. न्यायाच्या बाहेर निसर्ग जात नाही. हे बिनकामाची गैरसमजूतीचीच बोंबाबोंब... आणि जीवन जगण्याची कला पण नाही आणि नुस्ती चिंता, काळजी... म्हणून जे घडते, त्याला न्याय म्हणा. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय तुम्ही दुकानदाराला शंभराची नोट दिली. पांच रुपयाचे त्याने सामान दिले. आणि पांच रुपये त्याने परत दिले. गडबडीत तो नव्वद रुपये द्यायचे विसरुन गेला, त्याच्याकडे कितीतरी शंभराच्या नोटा, कितीतरी दहाच्या नोटा असतात, मोजल्या शिवायच्या. तो विसरुन गेला आणि पाच रुपये त्याने आपल्याला दिले तर आपण काय म्हणणार? 'मी तुला शंभराची नोट दिली होती', तेव्हा तो म्हणेल, 'नाही'. त्याला तशीच आठवण आहे, तो ही खोटे बोलत नाही, तर आपण काय करायचे? १४ प्रश्नकर्ता : पण ती गोष्ट सारखी टोचत - बोचत राहते तेवढे पैसे गेले मन आरडाओरड करते. दादाश्री : ते बोचते, ज्याला बोचते त्याला झोप येणार नाही. 'आपल्याला' (शुद्धात्माला) काय? ह्या शरीरात ज्याला टोचते त्याला झोप येणार नाही. सगळ्यांना काही टोचेल असे थोडी आहे? लोभ्याला च टोचते ! तेव्हा त्या लोभ्याला सांगा, टोचते तर झोपून जा ना ! आत्तातर संपूर्ण रात्र झोपावेच लागेल! प्रश्नकर्ता : त्याची झोप पण जाईल आणि पैसे पण जातील. दादाश्री : हो, म्हणजे तेथे 'जे घडते ते खरे' हे ज्ञान हजर झाले तर आपले कल्याण होते. ‘जे घडले तोच न्याय,' हे समजले तर संपूर्ण संसारचे पैल तीर येऊन जाईल. ह्या जगात एक सेकन्ड पण अन्याय होत नाही. न्यायच होत राहिला आहे. म्हणजे बुद्धि आपल्याला फसवते कि, ह्याला न्याय कसे म्हणता येईल? म्हणून आम्ही मूळ गोष्ट सांगू इच्छितो, कि निसर्गाचे हे आहे, आणि बुद्धिने तुम्ही वेगळे होवून जाता. म्हणजे ह्यात आपल्याला बुद्धि फसविते. एकदा समजून घेतल्यानंतर मग बुद्धिचे आपण नाही ऐकायचे. जे घडले तोच न्याय. कोर्टाचे न्यायत भूल - चुक होऊ शकते. उलट-सुलट होते, परंतु ह्या न्यायात फरक होत नाही. Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय कमी-जास्त वाटणी, हाच न्याय एक माणूस होता, त्याचे वडील वारले तर सर्व भावांची जमीन आहे, ती त्या मोठ्या भावाच्या हातात येते. तो मोठा भाऊ आहे तो इतरांना दटवत राहतो असतो, आणि जमीन देत नाही. जमीन अडीचशे बिघा होती. त्या चौघांना पन्नास-पन्नास बिघा जमीन द्यायची होती. पण कोणी पंचवीस घेऊन गेला, कोणी पन्नास घेऊन गेला, कोणी चाळीस घेऊन गेला आणि कोणाला पाचच बिघा जमीन वाट्याला आलेली असेल. अशावेळेला काय समजायचे? जगाचा न्याय काय म्हणतो कि मोठा भाऊ खोटारडा आणि वाईट आहे. निसर्गाचा न्याय काय म्हणतो? मोठ्या भावाचे खरे आहे. पन्नास वाल्याला पन्नास दिले, पंचवीस वाल्याला पंचवीस, चाळीस वाल्याला चाळीस आणि पाच वाल्याला पाचच बिघा जमीन दिली. आणि बाकी ची गेली मागच्या जन्माची उधारी वसुल करण्यात. माझी गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे ज्याला भांडण करायचे नसेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, नाही तर हे जग भांडण च आहे. येथे न्याय होऊ शकत नाही. न्याय तर पाहण्यासाठी आहे कि, माझ्यात काही परिवर्तन, काही फरक झाला आहे का? जर मला न्याय मिळत असेल, तर मी न्यायी आहे, ही गोष्ट निश्चित होवून गेली. न्याय तर आपले एक थर्मोमीटर आहे. बाकी व्यवहारात न्याय असू शकत नाही ना! न्यायात आला म्हणजे माणूस परिपूर्ण झाला. तोपर्यंत अबाव नॉर्मल किंवा बिलो नॉर्मल असतो. असा पडलेला असतो, किंवा तो नॉर्मलपेक्षा जास्त असतो, किंवा नॉर्मलपेक्षा कमी असतो. म्हणून तो मोठा भाऊ धाकट्या भावाला पूर्ण वाटा देत नाही, त्याला पाच बिघाच जमीन देतो ना! त्याला आपले लोक न्याय करायला जातात आणि ते मोठ्या भावाला वाईट ठरवितात. आता हा सर्व गुन्हाच आहे. तू Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १६ जे घडले तोच न्याय भ्रांतित सापडलेला आहेस आणि तू वेड्या तू भ्रांतिला परत खरे समजतो. परंतु सुटकाच नसते, खरे मानले म्हणून. ह्या व्यवहाराला खरे मानले आहे, तर मार पडणारच ना! बाकी, निसर्गाच्या न्यायात काही भूल-चुक नसतेच. आता तिथे आम्ही असे सांगणार नाही कि, 'तुम्हाला असे नाही करायचे. ह्यांना एवढे करायचे.' नाहीतर आम्ही वीतराग नाही म्हटले जाणार. हे तर आम्ही पहात रहातो, कि मागचा काय हिशोब आहे! आम्हाला सांगितले कि तुम्ही न्याय करा. न्याय करायला सांगतात तर आम्ही म्हणू कि भाऊ, आमचा न्याय वेगळ्या प्रकारचा आहे, या जगाचा न्याय वेगळ्या प्रकारचा आहे. जगाचे रेग्युलेटर आहे ना, ते त्याला रेग्युलेशन (नियमन)मध्येच ठेवतो. एक क्षणपण अन्याय होत नाही. पण लोकांना अन्याय कशाप्रकारे वाटतो? मग तो न्याय शोधतो. अरे भाऊ, जे देतो तोच न्याय. का तुला दोन दिले नाही आणि पाच दिले? देतो तोच न्याय. कारण कि आधीचा हिशोब आहे सर्व समोरासमोर. गुंथाच आहे, हिशोब आहे. म्हणून न्याय थर्मोमीटर आहे. थर्मोमीटरने पाहून घ्यायचे कि आधी मी न्याय केला नाही, म्हणून माझ्यावर अन्याय झाला आहे हा. म्हणजे थर्मामीटरचा दोष नाही. तुम्हाला कसे वाटते? माझी ही गोष्ट काही तुम्हाला मदत करते? प्रश्नकर्ता : पुष्कळ मदत होईल. दादाश्री : जगात न्याय शोधू नका. जे होत आहे तोच न्याय. आपण पहायचे कि हे काय होत आहे. तर तो म्हणतो 'पन्नास बिघाच्या ऐवजी पाच बिघा देत आहे.' भावाला म्हणावे, 'बरोबर आहे, आता तू खुश आहे ना?' तर म्हणे 'हो' मग दुसऱ्या दिवशी एकत्र जेवायला बसतात-उठतात. हा हिशोब आहे. हिशोबाच्या बाहेर तर कोणीच नाही. बाप, मुलाला हिशोब घेतल्याशिवाय सोडत नाही. हा तर हिशोबच आहे, नातं नाही. तुम्ही नातं समजून बसला होता? Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय १७ चिरडुन मारले हा ही न्याय एक माणूस बसमध्ये चढण्यासाठी, रस्त्याच्या ऊजव्या बाजुला खाली ऊभा होता. चुकीच्या बाजुने एक बस आली ती थेट त्याच्या अंगावरुन गेली आणि त्याला मारले. ह्याला काय न्याय म्हणता येईल ? प्रश्नकर्ता : ड्रायवरने चिरडुन मारले, लोक तर असेच म्हणतील. दादाश्री : हो, अर्थात् चुकीच्या बाजूने येवून मारले तो गुन्हा केला. योग्य रस्त्याने येऊन मारले असते तरीपण तो गुन्हा म्हटला जातो. हा तर दुप्पट गुन्हा झाला. त्याला निसर्ग म्हणतो बरोबर केलेत. आरडाओरड कराल तर व्यर्थ जाणार. आधीचे हिशोब चुकता झाला, पण हे समझले नाही न! संपूर्ण आयुष्य तोडफोडीतच जाते. कोर्ट आणि वकील... त्यात कधीतरी उशीर होऊन जातो तर पुन्हा वकील पण शिव्या देतो, तुम्हाला अक्कल नाही. गाढवासारखे आहात... शिव्या खातो व दुःखी होतो! त्यापेक्षा दादाश्री म्हणतात ते निसर्गाचा न्याय 'घडले तोच न्याय' हे समजून घेतले तर निराकरण होईल ना. आणि कोर्टात जायला हरकत नाही, कोर्टात जा पण त्याच्याजवळ बसून चहा प्यायचा. अश्या तयारीनेच जा. त्याला नाही पटले, तर सांगायचे, आमचा चहा पी, पण जवळ बैस. कोर्टात जायला हरकत नाही पण प्रेमपूर्वक निकाल लावा. ( आत समोरच्या प्रति राग-द्वेष नाही होणार त्याप्रमाणे) प्रश्नकर्ता : असा माणूस आपला विश्वासघात पण करेल ना! दादाश्री : काही करू शकेल असे नाही. मनुष्य काही करू शकेल असे नाही. जर तुम्ही निर्दोष असाल, तर तुम्हाला कोणी काहीच करू शकत नाही. असा या जगाचा कायदा आहे, प्यॉर असाल तर कोणी काही करणार नाही. म्हणून चुक संपवायची असेल तर संपवून टाकावी. Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय आग्रह सोडला तो जिंकला ह्या जगात तू न्याय शोधायला जातो? जे घडले तोच न्याय, थप्पड मारली तर त्याने माझ्यावर अन्याय केला असे नाही. पण जे घडले तोच न्याय. हे जेव्हा समजले तेव्हा हा सारा उलगडा झाला. ___'जे घडले तोच न्याय' असे नाही म्हणालात तर बुद्धि उड्या मारायला लागेल. अनंत जन्मापासून ही बुद्धि गोंधळ करत आहे, मतभेद निर्माण करत आहे. खरं तर बोलण्याची वेळच येत नाही. आम्हाला काही बोलण्याची वेळच येत नाही. जो आग्रह सोडून देतो तो जिंकला. तो स्वत:च्या जबाबदारीवर आग्रह करत असतो. अर्थात् बुद्धि गेली हे कसे कळून येणार? जे घडले त्याला न्याय म्हटले, म्हणजे बुद्धि गेली. असे म्हणता येईल. बुद्धि काय करते? न्याय शोधशोध करते. त्यामुळे च हा संसार ऊभा राहिला आहे. म्हणून न्याय शोधू नका! न्याय तर शोधायचा असतो का? जे झाले तेच करेक्ट, लागलीच तयार. कारण कि 'व्यवस्थित' शिवाय काहीच होत नाही. व्यर्थाची हाय! हाय! महाराणीने नाही, वसूलीराणीने फसवले बुद्धि तर खूपच गडबड गोंधळ करते. बुद्धिच सगळं काही बिघडवीत असते ना? ही बुद्धि म्हणजे काय? जी न्याय शोधते, तिलाच बुद्धि म्हणतात. ती (बुद्धि म्हणेल) 'तुम्ही पैसे का म्हणून देणार नाही, माल घेऊन गेला ना?' हे 'का म्हणून' विचारले, ती बुद्धि. अन्याय केला तोच न्याय. तरी आपण वसूली करत रहा. सांगा 'आम्हाला पैश्यांची खूप गरज आहे आणि आम्हाला खूप अडचण आहे'. मग परत मागे यावे. पण 'का म्हणून देणार नाही तो?' असे म्हटले तर मग वकील शोधायला जावे लागते. सत्संग सोडून तेथे बसणार मग? जे घडले तोच न्याय म्हटले म्हणजे बुद्धि निघून जाते. Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय आत अशी श्रद्धा ठेवायची कि जे घडले तोच न्याय. तरीही व्यवहारात आपल्याला पैश्यांच्या वसूलीसाठी जावे लागते. तेव्हा ह्या श्रद्धेमुळे आपली बुद्धि बिघडत नाही. समोरच्यावर राग येणार नाही आणि आपला पण संताप होणार नाही. जसे नाटक करीत आहात असे तिथे जाऊन बसायचे. आणि म्हणायचे 'मी तर चार वेळा येऊन गेलो पण भेट झाली नाही. ह्या वेळेला मात्र तुमची पुण्याई म्हणा किंवा माझी पुण्याई पण आपली भेट झाली.' असे गम्मत करता करता, उधारी वसूली करावी. बाकी 'तुम्ही मजेत आहात ना? मी तर मात्र सध्या मोठ्या संकटात सापडलो आहे.' तेव्हा तो म्हणेल, 'तुम्हाला काय अडचण आहे?' तेव्हा सांगायचे 'माझी अडचण तर मलाच माहित. तुमच्या जवळ पैसे नसले तर कोणाकडून मला आणून द्या.' अशा त-हेच्या गोष्टी करून काम काढून घ्यावे. लोकतर अहंकारी आहेत म्हणून आपले काम होईल. अहंकारी नसते तर काहीच चालले नसते. अहंकारी माणसाच्या अहंकाराला जर चढवून दिले, तर तो सर्व काही करतो. 'पांच-दहा हजार आणून द्या'. म्हटले तर तो 'हो, आणून देतो' असे म्हणतो. म्हणजे भांडण व्हायला नको. राग-द्वेष व्हायला नको. शंभर खेपा मारल्या आणि तरीही आणून नाही दिले तर हरकत नाही. 'जे घडले तोच न्याय' असे म्हणावे. निरंतर न्यायच! काय तुमच्या एकट्याची वसूली मिळत नाही असे आहे का? प्रश्नकर्ता : नाही, नाही. सगळ्या व्यापारांचे असतात! दादाश्री : सगळे जग महाराणीमुळे फसले नाही, उधारी वसूलीमुळे फसले आहेत. जो तो मला सांगतो कि, 'माझी वसूली दहा लाखाची परत मिळत नाही.' पहिली वसूली मिळत होती. कमवित होते तेव्हा कोणी मला सांगायला येत नव्हते. आता सांगायला येतात! प्रश्नकर्ता : कोण आपल्याला अपशब्द बोलेल, ती वसूलीच आहे ना? दादाश्री : हो, ती पण वसूलीच आहे ना! तो बोलतो ते तीक्ष्ण Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ २० जे घडले तोच न्याय बोलतो कुठल्या ही डिक्शनरीत (शब्दकोशात) नसतील असे शब्द बोलतो. मग आपण डिक्शनरी उघडुन शोधतो कि हा शब्द कुठून आला? त्यात तो शब्द नसतो, असे माथेफिरु असतात! पण ते त्यांच्या जबाबदारीवर बोलतात ना! त्यात जबाबदारी आपली नाही ना! तेवढे चांगले आहे. तुमचे पैसे नाही दिले तरी तो न्याय आहे, परत केले तरी तो न्याय आहे. हा सगळा हिशोब मी बऱ्याच वर्षापूर्वी काढून ठेवलेला. अर्थात् पैसे परत दिले नाही यात कोणाचा दोष नाही, त्याच प्रमाणे कोणी पैसे परत करायला आला तर त्यात त्याचे उपकार कसले?! ह्या जगाचे संचालन वेगळ्याच प्रकारचे आहे! व्यवहारात दुःखाचे मूळ न्याय शोधून शोधून तर दम निघून गेला आहे. माणसाच्या मनात असे विचार येतात कि मी याचे काय बिघडवीले आहे, तर तो माझे बिघडवीत आहे. प्रश्नकर्ता : असे वाटते, आपण कोणाचे नांव घेत नाही, तर लोक आम्हाला का म्हणून फटके मारतात? दादाश्री : हो, म्हणूनच तर हे कोर्ट, वकील ह्याचे व्यवसाय चालतात. असे झाले नसते तर कोर्ट कशाप्रकारे चालणार? वकीलांना कोणी अशील मिळाले नसते ना! परंतु वकील किती पुण्यशाली, कि अशील सकाळी लवकर उठून येतात आणि वकीलसाहेब तेव्हा दाढी करीत असतात. तर तो थोडावेळ बसून राहतो. साहेबाला घरच्या घरी पैसे द्यायला येतो. साहेब पुण्यशाली आहेत ना! नोटिस लिहून देण्याचे तो पाचसे रुपये देतो. म्हणून न्याय शोधू नका, तर सर्व सुरळीत पार पडेल. तुम्ही न्याय शोधता हीच भानगड आहे. प्रश्नकर्ता : पण दादा, अशीवेळ आली आहे कि आपण ज्याचे चांगले करायला जातो, तोच आपल्याला दंडा मारतो. Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय २१ दादाश्री : त्याचे चांगले केले तरी तो दंडे मारतो ह्याचेच नांव न्याय! पण तसे समोर बोलायचे नाही. समोर बोलले तर पुन्हा त्याच्या मनात असे येईल कि हा फार निर्लज्ज झाला आहे. प्रश्नकर्ता : आपण एखाद्या बरोबर अगदी सरळ वागत असलो, तरी तो आपल्याला काठी मारतो. दादाश्री : लाठी मारतो ते च न्याय ! शांततेने नाही राहू देत ? प्रश्नकर्ता : सदरा घातला, तर म्हणेल सदरा का घातला ? हा टीशर्ट घातला, तर म्हणेल, टीशर्ट का घालता? तो काढून टाकला तर मग म्हणेल, का काढला? दादाश्री : ह्याला च न्याय असे आपणास म्हणावे लागेल ना! आणि त्यात न्याय शोधायला गेलो, त्याचाच मार पडतोय सारा. अर्थात् न्याय शोधायचा नाही. हे असे आम्ही अगदी साधे - सरळ संशोधन केले आहे. न्याय शोधला म्हणून तर सर्वांना मार पडला. शेवटी होता तिथल्या तिथे च असतो! तर मग आधीच का बरे नाही समजायचे. ही तर निव्वळ अहंकारची दखल आहे. ‘जे घडले तेच न्याय.' म्हणून न्याय शोधायला जाऊ नका. तुझे वडील म्हणतात ‘तू असा आहेस, तसा आहेस.' ते घडले तोच न्याय आहे. त्यांच्यावर तुम्ही दावा नाही करायचा कि तुम्ही हे असे का बरे बोललात? ही गोष्ट अनुभवाची आहे आणि नाही तरी शेवटी थकून पण न्याय तर (स्वीकार) करावा च लागतो ना! स्वीकार करतात का नाही लोक? जरी कीती ही व्यर्थ प्रयत्न केले तरी पण होता तिथल्या तिथे? तेच स्वखुशीने स्वीकार करून घेतले असते तर काय वाईट? हो, त्यांना समोर सांगायचे नाही, नाहीतर परत उलट्या रस्त्याने चालतील. मनात समजून जायचे कि जे जे घडेल तोच न्याय. बुद्धिला आता वापरु नका, जे घडत आहे त्यालाच न्याय म्हणा. हा Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ २२ जे घडले तोच न्याय तर म्हणेल कि, 'तुम्हाला कोणी सांगितले होते जाऊन गरम पाणी ठेवायला?' अरे! जे घडले तोच न्याय. हा न्याय समजला तर, 'आता मी तक्रार नाही करणार,' असे म्हणणार. म्हणणार का नाही म्हणणार? कोणी उपाशी असेल त्याला आपण जेवायला बसवले, आणि नंतर तो म्हणतो, 'तुम्हाला कोणी सांगितले होते जेवू घालायला? विनाकारण आम्हाला त्रास दिलात, आमचा वेळ वाया घालवला! असे म्हणाला तर आपण काय करायचे? त्याच्याशी वाद घालायचा? हे 'जे घडले तोच न्याय' आहे. घरातील दोघांपैकी एकाने बुद्धि चालवणे बंद केले तर सर्व सुरळीत होऊन जाईल. पण तो त्याची बुद्धि चालवित असेल तर काय होईल? मग रात्री जेवायला पण आवडणार नाही. पाऊस पडत नाही, हा न्याय आहे. तेव्हा शेतकरी काय म्हणेल? परमेश्वर अन्याय करत आहे. तो ते त्याच्या गैरसमजुतीमुळे बोलतो. त्याच्या अशा म्हणण्याने काय पाऊस पडून जाईल? पाऊस नाही पडत हाच न्याय. जर सतत पाऊस पडत असता आणि दरवर्षी पावसाळा चांगला जात असता तर पाऊसाचे काय नुकसान होणार होते? एके ठिकाणी गडगडून अतिशय पाऊस पडेल आणि दुसरीकडे दुष्काळ पडेल. निसर्गाने सर्व 'व्यवस्थित' केले आहे. तुम्हाला वाटते ना निसर्गाची व्यवस्था चांगली आहे? निसर्ग नेहमी न्यायच करतो. म्हणजे ही सर्व सैद्धांतिक बाबत आहे. बुद्धि घालविण्यासाठी हा एकच कायदा आहे. जे घडले तोच न्याय, असे मानले तर बुद्धि जात राहणार. बुद्धि कुठपर्यंत जिवंत राहते? जे काही घडते आहे त्यात न्याय शोधायला जाल तोपर्यंत बुद्धि जिवंत राहते, हे तर बुद्धि पण समजून जाते. मग बुद्धिला पण लाज वाटते, कि जळलं हे आता हा धनीच असा बोलत आहे, त्यापेक्षा आपली जागा दुसरी कडे करणे चांगले. Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय नका शोधू न्याय ह्यात प्रश्नकर्ता : बुद्धि काढायची च आहे. कारण कि ती खूप मार खायला लावते. दादाश्री : ती बुद्धि काढायची असेल तर बुद्धि काही अशी च जात नाही. बुद्धि हे कार्य आहे तर आपण त्याचे कारण काढले तर हे कार्य नाहीसे होणार. त्याची कारणे काय? वास्तविकतेत जे घडले, त्याला न्याय म्हणाले, तेव्हा ती निघून जाईल. जग काय म्हणते? वास्तविकतेत झालेले चालवून घ्यावे. आणि न्याय शोधशोध करणार तर वाद (भांडण) चालू राहणार. म्हणजे बुद्धि तशी जाणार नाही. बुद्धि जाण्याचा मार्ग काय? तर त्याच्या कारणांचे सेवन नाही केले तर बुद्धि निघून जाणार, ते कार्य होणार नाही. प्रश्नकर्ता : आपण म्हणाला कि बुद्धि हे कार्य आहे आणि त्याची कारणे शोधलित तर ते कार्य बंद होऊन जाईल. दादाश्री : त्याच्या कारणात, तर आपण न्याय शोधायला निघालो हे च त्याचे कारण आहे. न्याय शोधायचे बंद करून टाकले तर बुद्धि जात राहणार! न्याय कशासाठी शोधता आहात? सून काय म्हणत असते कि 'तू माझ्या सासूला ओळखत नाहीस. मी आले तेव्हापासून ती मला त्रास देत आहे. ह्यात माझा काय गुन्हा?' कोणी ओळखल्या शिवाय दु:ख देईल का? त्याच्या हिशोबाच्या खात्यात जमा असेल म्हणून तर तुला पुन्हा-पुन्हा दुःख देत राहिल. तेव्हा म्हणशील 'मी तर त्यांचे तोंडही पाहीले नव्हते.' 'अरे, पण तू ह्या जन्मी पाहीले नसेल, परंतु मागच्या जन्मीचा हिशोब काय म्हणतो?' म्हणून जे होत आहे तोच न्याय'! घरी मुलगा दादागिरी करतो ना? ती दादागिरी करतो तोच न्याय. ती Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ २४ जे घडले तोच न्याय तर बुद्धि दाखवते, मुलगा असून वडीलांच्या समोर दादागिरी? हे जे घडले तोच न्याय. अर्थात् हे 'अक्रम (क्रमविरहीत) विज्ञान' काय म्हणते? पहा हा न्याय! लोक मला विचारतात कि तुम्ही बुद्धि कशाप्रकारे काढून टाकली? आम्ही न्याय शोधला नाही, म्हणून बुद्धि जात राहिली. बुद्धि कुठपर्यंत राहणार? न्याय शोधलात आणि न्यायाला आधार दिलात तर बुद्धि थांबते, आणि बुद्धि म्हणेल 'आपल्या पक्षात आहे हा भाऊ'. म्हणते, 'एवढी चांगली नोकरी केली आणि हे डायरेक्टरर्स कोणत्या आधाराने असे वाईट बोलतात?' असा प्रकारे तुम्ही आधार देतात का? न्याय शोधता? तो बोलतो तेच खरे आहे. आतापर्यंत का नव्हते बोलत? कोणत्या आधाराने बोलत नव्हते? आता कोणत्या न्यायाच्या आधाराने बोलत आहेत? विचार करायला नको का कि ते बोलतात ते सप्रमाण आहे? अरे, ते पगार वाढवून देत नाहीत हाच न्याय आहे. त्याला अन्याय कशा रीतेने म्हणू आपण? बुद्धि शोधते न्याय हे तर सारे ओढवून घेतलेले दुःख आहे आणि थोडेफार जे दुःख आहे ते बुद्धिमुळे आहे. प्रत्येकात बुद्धि असते ना? ती विकसित बुद्धि दुःख देते. नसले तेथून दु:ख शोधून आणते. माझी तर बुद्धि पूर्ण विकसित झाल्यावर निघून गेली. बुद्धिच नाहीसी झाली! बोला, मजा येणार कि नाही येणार? बिलकुल अगदी एक सेन्ट बुद्धि राहिली नाही. तेव्हा एक माणूस मला म्हणाला, 'बुद्धि कशी काय नाहीसी झाली? तू निघून जा, तू निघून जा, असे म्हटल्याने?' मी म्हणालो 'नाही, अरे! असे नाही करता येत' तिने (बुद्धिने) तर आतापर्यंत आपला प्रभाव पाडला. गोंधळलो असतांना, खऱ्या वेळेला काय करावे, काय करू नये? याचे सगळे मार्गदर्शन ती देते. तिला काढून टाकता येईल का? तेव्हा मी म्हणलो, 'जो न्याय शोधतो ना, त्याच्याजवळ बुद्धि कायमची राहते.' 'जे घडले तोच न्याय' असे म्हणालेत तर बुद्धि जात राहणार. न्याय शोधायला गेलो ती बुद्धि ! Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय चांगले. २५ प्रश्नकर्ता : पण दादा, जे आले ते स्वीकारुन घ्यायचे का जीवनात ? दादाश्री : मार खाऊन स्वीकारण्यापेक्षा आनंदाने स्वीकारुन घ्यावे ते प्रश्नकर्ता : संसार आहे, मुले आहेत, मुलांच्या बायका आहेत, हे आहेत, ते आहेत. म्हणून संबंध तर ठेवावे लागतात. दादाश्री : हो, सगळे ठेवायला पाहिजे. प्रश्नकर्ता : तर त्यात मार पडला तर काय करावे? दादाश्री : संबंध सगळे ठेवून जर मार पडला तर तो आपण स्वीकारुन घ्यावा. नाहीतरी मार पडला तर काय करता येईल ? दुसरा काही उपाय आहे? प्रश्नकर्ता : काही नाही. वकीला कडे जायचे. दादाश्री : होय, दुसरे काय होऊ शकणार? वकील रक्षा करेल का तो त्याची फी घेईल ? 'घडले तोच न्याय', तेथे बुद्धि 'आऊट' न्याय शोधायला लागला म्हणून बुद्धि ऊभी रहाते. बुद्धि जाणते कि, आता माझ्यावाचून चालणार नाही आणि आपण म्हणालो कि घडले तोच न्याय आहे. तेव्हा बुद्धि म्हणते, 'आता या घरी आपला प्रभाव नाही', ती मग निरोप घेते आणि निघून जाते. कोणी तिचा समर्थक असेल तिथे घुसते. तिच्या बदल आसक्ति ठेवनारे तर खूप लोक असतात ना ! नवस करतात, माझी बुद्धि वाढो, अशी ! आणि तेवढ्याच प्रमाणात समोरच्या पल्डयात जळजळ वाढत जाते. बॅलेन्स (समतोल) तर व्हायला पाहिजे ना नेहमी ? त्यांच्या समोर बॅलेन्स असायलाच पाहिजे. आमची बुद्धि संपली म्हणजे जळजळ ही संपली. Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ २६ जे घडले तोच न्याय विकल्पाचा अंत हाच मोक्षमार्ग म्हणून घडेल त्याला न्याय म्हणत असाल तर निर्विकल्प रहाल आणि लोक निर्विकल्प होण्यासाठी न्याय शोधायला निघाले आहेत. विकल्पाचा शेवट येतो तो रस्ता मोक्षाचा. विकल्प निर्माण होणार नाही असा आहे ना आपला मार्ग? मेहनत केल्याशिवाय आपला अक्रम मार्गात माणूस पुढील प्रगती करत जातो. आपल्या चाव्याच अशा आहेत कि मेहनत केल्याशिवाय पुढे प्रगती होत जाते. आता बुद्धि जेव्हा विकल्प करविते ना? तेव्हा सांगून द्यायचे, जे घडले तोच न्याय. बुद्धि न्याय शोधते कि माझ्याहून लहान आहेस, मर्यादा ठेवत नाही. मर्यादा ठेवली हा ही न्याय आणि नाही ठेवली तो पण न्याय. जितकी बुद्धि निर्विवाद होईल तेवढे मग निर्विकल्प होणार! __ हे विज्ञान काय सांगते? न्याय तर संपूर्ण जग शोधत आहे. त्यापेक्षा आपणच स्वीकारुन घ्या ना, कि जे घडले तोच न्याय आहे. म्हणजे जज्ज नको आणि वकील ही लागणार नाही. अन्यथा शेवटी मार खाऊन सुद्धा तसेच राहते ना मग? कोणत्याही कोर्टात न मिळे संतोष आणि असे समजा कि, कोण्या एका भाऊला न्याय पाहिजे, तर आपण खालच्या कोर्टात जजमेन्ट करून घेतले. वकील भांडले, मग जजमेन्ट आले, न्याय आला तेव्हा म्हणतो, नाही, पण ह्या न्यायाने मला संतोष झालेला नाही. न्याय मिळाला तरी संतोष नाही, मग आता काय करायचे? वरच्या कोर्टात चला. तेव्हा जिल्हा कोर्टात गेले. तिथल्या जजमेन्ट वर पण संतोष झाला नाही. आता काय करायचे? तेव्हा म्हणे, नाही. तिथे अहमदाबादच्या हायकोर्टात? तेथे पण संतोष झाला नाही, मग सुप्रीम Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ २७ जे घडले तोच न्याय कोर्टात जायचे तेथे सुद्धा संतोष झाला नाही. शेवटी राष्ट्रपतिकडे, तरीही न्याय मिळत नाही. मार खाऊन मरतो! हा न्यायच शोधू नको, कि तो मला का शिव्या देऊन गेला. अशील माझ्या वकीलातीची फी का म्हणून देत नाही? नाही देत हा न्याय आहे. नंतर देऊन जातो, तो ही न्यायच आहे. न्यायाला तू शोधू नकोस. न्याय : नैसर्गिक आणि विकल्पी दोन प्रकाराचे न्याय. एक विकल्पांना वाढविणारा न्याय आणि दूसरा विकल्पांना कमी करणारा न्याय. अगदी खरा न्याय विकल्पांना कमी करणारा आहे, कि घडले तो न्याय च आहे. आता तू ह्या वर दुसरा दावा करू नकोस. तू तुझी दुसरी गोष्ट ऐक आता, ह्यांच्यावर दावा मांडशील तर तुझ्या दुसऱ्या गोष्टी राहून जातील. न्याय शोधायला निघाला म्हणजे विकल्प वाढतच जाणार आणि हा नैसर्गिक न्याय विकल्पांना निर्विकल्प बनवीत जातो. होऊन गेले, 'घडले तोच न्याय.' आणि त्यानंतर ही मग पाच व्यक्तिनी पंच नेमले तरीपण ते त्याच्या विरुद्धच जाणार. तो त्या पहिल्या न्यायाला स्वीकारत नाही, म्हणजे तो कोणाचे ऐकत नाही. त्यामुळे मग विकल्प वाढतच जातात. स्वत:च्या आजुबाजुचे जाळेच गुंफत राहतो, असा माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही. विनाकारण अतिशय दुःखी होतो! त्यापेक्षा पहिल्या पासूनच श्रद्धा ठेवावी कि 'जे घडून गेले तोच न्याय.' आणि निसर्ग नेहमी न्यायच करीत असतो, निरंतर न्यायच करीत असते आणि तो पुरावा देऊ शकत नाही. पुरावे 'ज्ञानी' देतात कि, न्याय कशा रीतीने? हे 'ज्ञानी' सांगू शकतात. त्याला संतोष करून देतात आणि समाधान मिळते. निर्विकल्पी झाले तर निकाल (निवाडा) येतो. - जय सच्चिदानंद Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राप्तिस्थान दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 भुज त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 :9810098564 कोलकता : 033-32933885 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351 जबलपुर :9425160428 रायपुर : 9329523737 भिलाई :9827481336 पटना : 9431015601 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूना : 9422660497 जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute : 100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232), Email : info@us.dadabhagwan.org U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063Singapore : +65 81129229 Australia : +61 421127947 New Zealand: +64 21 0376434 Website : www.dadabhagwan.org लित बेंगलूर Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ जे घडले तोच न्याय जर निसर्गाच्या न्यायाला समजलात की जे घडले तोच न्याय' तर तुम्ही या जगातून मुक्त होऊ शकाल. जर निसर्गाला जरा सुद्धा अन्यायी मानले तर तेच तुमचे ह्या जगात गोंधळून जाण्याचे कारण ठरेल. निसर्गाला न्यायी मानणे त्याचेच नांव ज्ञान. जसे आहे तसे' जाणणे ह्याचे नाव ज्ञान आणि जसे आहे तसे' न जाणणे ह्याचे नाव अज्ञान. 'जे घडले तोच न्याय,' हे जाणले तर संपूर्ण संसारतून पार होता येईल असे आहे. जगात एकही क्षण अन्याय होत नाही. न्यायच होत आहे. पण बुद्धि आपल्याला फसवत असते की, ह्याला न्याय कसे म्हणता येईल? म्हणून आम्ही मूळ गोष्ट सांगू इच्छितो, की हा निसर्गाचा न्याय आहे, म्हणून तुम्ही बुद्धिपासून वेगळे होवून जा. एकदा समजून घेतल्यानंतर बुद्धिचे आपण ऐकायचे नाही. जे घडले तोच न्याय.' - दादाश्री ISAN 978-81-89911-25-8 9788189-933258 Printed in India Price 310 dadabhagwan.org