________________
जे घडले तोच न्याय
१७
चिरडुन मारले हा ही न्याय
एक माणूस बसमध्ये चढण्यासाठी, रस्त्याच्या ऊजव्या बाजुला खाली ऊभा होता. चुकीच्या बाजुने एक बस आली ती थेट त्याच्या अंगावरुन गेली आणि त्याला मारले. ह्याला काय न्याय म्हणता येईल ?
प्रश्नकर्ता : ड्रायवरने चिरडुन मारले, लोक तर असेच म्हणतील.
दादाश्री : हो, अर्थात् चुकीच्या बाजूने येवून मारले तो गुन्हा केला. योग्य रस्त्याने येऊन मारले असते तरीपण तो गुन्हा म्हटला जातो. हा तर दुप्पट गुन्हा झाला. त्याला निसर्ग म्हणतो बरोबर केलेत. आरडाओरड कराल तर व्यर्थ जाणार. आधीचे हिशोब चुकता झाला, पण हे समझले नाही न! संपूर्ण आयुष्य तोडफोडीतच जाते. कोर्ट आणि वकील... त्यात कधीतरी उशीर होऊन जातो तर पुन्हा वकील पण शिव्या देतो, तुम्हाला अक्कल नाही. गाढवासारखे आहात... शिव्या खातो व दुःखी होतो! त्यापेक्षा दादाश्री म्हणतात ते निसर्गाचा न्याय 'घडले तोच न्याय' हे समजून घेतले तर निराकरण होईल ना.
आणि कोर्टात जायला हरकत नाही, कोर्टात जा पण त्याच्याजवळ बसून चहा प्यायचा. अश्या तयारीनेच जा. त्याला नाही पटले, तर सांगायचे, आमचा चहा पी, पण जवळ बैस. कोर्टात जायला हरकत नाही पण प्रेमपूर्वक निकाल लावा. ( आत समोरच्या प्रति राग-द्वेष नाही होणार त्याप्रमाणे)
प्रश्नकर्ता : असा माणूस आपला विश्वासघात पण करेल ना!
दादाश्री : काही करू शकेल असे नाही. मनुष्य काही करू शकेल असे नाही. जर तुम्ही निर्दोष असाल, तर तुम्हाला कोणी काहीच करू शकत नाही. असा या जगाचा कायदा आहे, प्यॉर असाल तर कोणी काही करणार नाही. म्हणून चुक संपवायची असेल तर संपवून टाकावी.