________________
१६
जे घडले तोच न्याय भ्रांतित सापडलेला आहेस आणि तू वेड्या तू भ्रांतिला परत खरे समजतो. परंतु सुटकाच नसते, खरे मानले म्हणून. ह्या व्यवहाराला खरे मानले आहे, तर मार पडणारच ना! बाकी, निसर्गाच्या न्यायात काही भूल-चुक नसतेच.
आता तिथे आम्ही असे सांगणार नाही कि, 'तुम्हाला असे नाही करायचे. ह्यांना एवढे करायचे.' नाहीतर आम्ही वीतराग नाही म्हटले जाणार. हे तर आम्ही पहात रहातो, कि मागचा काय हिशोब आहे!
आम्हाला सांगितले कि तुम्ही न्याय करा. न्याय करायला सांगतात तर आम्ही म्हणू कि भाऊ, आमचा न्याय वेगळ्या प्रकारचा आहे, या जगाचा न्याय वेगळ्या प्रकारचा आहे. जगाचे रेग्युलेटर आहे ना, ते त्याला रेग्युलेशन (नियमन)मध्येच ठेवतो. एक क्षणपण अन्याय होत नाही. पण लोकांना अन्याय कशाप्रकारे वाटतो? मग तो न्याय शोधतो. अरे भाऊ, जे देतो तोच न्याय. का तुला दोन दिले नाही आणि पाच दिले? देतो तोच न्याय. कारण कि आधीचा हिशोब आहे सर्व समोरासमोर. गुंथाच आहे, हिशोब आहे. म्हणून न्याय थर्मोमीटर आहे. थर्मोमीटरने पाहून घ्यायचे कि आधी मी न्याय केला नाही, म्हणून माझ्यावर अन्याय झाला आहे हा. म्हणजे थर्मामीटरचा दोष नाही. तुम्हाला कसे वाटते? माझी ही गोष्ट काही तुम्हाला मदत करते?
प्रश्नकर्ता : पुष्कळ मदत होईल.
दादाश्री : जगात न्याय शोधू नका. जे होत आहे तोच न्याय. आपण पहायचे कि हे काय होत आहे. तर तो म्हणतो 'पन्नास बिघाच्या ऐवजी पाच बिघा देत आहे.' भावाला म्हणावे, 'बरोबर आहे, आता तू खुश आहे ना?' तर म्हणे 'हो' मग दुसऱ्या दिवशी एकत्र जेवायला बसतात-उठतात. हा हिशोब आहे. हिशोबाच्या बाहेर तर कोणीच नाही. बाप, मुलाला हिशोब घेतल्याशिवाय सोडत नाही. हा तर हिशोबच आहे, नातं नाही. तुम्ही नातं समजून बसला होता?