________________
जे घडले तोच न्याय
इथे रस्त्यात सर्व माणसे येत-जात असतात आणि रस्त्यातच बाभळीच्या काट्याची मोळी पडलेली असते. रस्त्यातून इतके लोक येत-जात असतात पण ती मोळी तशीच पडलेली असते. आपण कधीही बूट, चप्पल घातल्या शिवाय निघत नाही. परंतु त्या दिवशी कोणाकडे गेलो असताना तेथे आरडा ओरड होते कि चोर आला, चोर आला, तेव्हा आपण जर अनवाणी पायाने पळालो, तर ती काट्याची मोळी आपल्या पायाला लागली, तर तो हिशोब आपला! अगदी काटा आरपार निघून जाईल असा लागला ! आता हे संयोग कोणी एकत्र करून आणले? हे 'व्यवस्थित शक्ति' एकत्र करून देतो. (व्यवस्थित शक्ति=वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होऊन आलेला परिणाम.) कायदे सर्व निसर्गाधीन...
७
मुंबईच्या फोर्ट भागात तुमचे सोन्याचा पट्यावाले घड्याळ पडले आणि घरी आल्यानंतर तुम्ही अशी आशा ठेवणार नाही, कि ते घड्याळ पुन्हा तुमच्या हातात येईल. तरी दोन दिवसानंतर पेपरात जाहिरात येते कि, ज्याचे घड्याळ हरवले असेल, तो त्या बद्दलचा पुरावा दाखवून घेऊन जावे आणि जाहिरातीचा खर्च मात्र द्यावा. म्हणजे ज्याचे आहे, त्याचे कोणी घेऊ शकणार नाही. ज्याचे नाही त्याला ते मिळणार नाही. एक सेन्ट पण कोणत्याही पद्धतीने कोणी पुढे-मागे करु शकणार नाही. इतके नियमबद्ध जग आहे. कोर्ट कशी पण असो, पण ते कलियुगाच्या आधाराने च असणार! परंतु हे निसर्गाच्या नियमाधीन असते. कोर्टाचे कायदे मोडले असतील तर कोर्टा संबंधी गुन्हा लागू पडेल. पण निसर्गाच्या कायद्याला तोडु नका.
हे तर आहे स्वतःचेच प्रोजेक्शन
बस, हे सारे प्रोजेक्शन (प्रयोजन) तुमचेच आहे. लोकांना का बरे दोष द्यायचा?
प्रश्नकर्ता: क्रियेची प्रतिक्रिया आहे ही.