________________
जे घडले तोच न्याय दादाश्री : त्याला प्रतिक्रिया नाही म्हणता येणार. पण हे प्रोजेक्शन सारे तुमचे आहे. प्रतिक्रिया म्हणाल तर मग एक्शन एन्ड रिएक्शन आर इक्वल एन्ड अपॉझिट (क्रिया आणि प्रतिक्रिया समांतर आणि विरुद्ध दिशेच्या असतात).
हे तर उदाहरण दिले, फक्त रूपक दिले. तुमचेच प्रोजेक्शन आहे हे. ह्यात दुसऱ्या कोणाचा हात नाही. म्हणून तुम्हाला जागृत असायला पाहिजे कि ही जबाबदारी माझ्यावरच आहे. जबाबदारी समजल्यावर घरातील वर्तन कसे असते?
प्रश्नकर्ता : त्याच्या प्रमाणे वर्तन करायला पाहिजे.
दादाश्री : हो. स्वत:ची जबाबदारी समजा. नाहीतर म्हणाल कि भगवंताची भक्ति केल्याने हे सारे गुन्हे धुतले जाईल. पोलंपोल! भगवंताच्या नांवाने पोल मारली लोकांनी. जबाबदारी स्वत:ची आहे. सर्वस्व तुमचीच जबाबदारी, प्रोजेक्शनच तुमचे आहे ना?
कोणी दुःख दिले तर, जमा करून टाकावे. जे दिलेले असेल तेच जमा करायचे आहे. कारण कि, येथे, विनाकारण दुसऱ्याला दुःख देता येईल, असा कायदा नाही. त्याच्यामागे कारण असली पाहिजे, म्हणून जमा करून ठेवायचे.
संसार चक्रातून सुटायचे आहे त्याला मग कधी वरणात मीठ जास्त पडले तो पण न्याय!
प्रश्नकर्ता : काय होत आहे ते पहायचे, असे तुम्ही म्हणाले होते. तर मग न्याय करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
दादाश्री : न्याय, मी जरा वेगळेच सांगू इच्छितो. पहा ना, त्याचा हात थोडा रॉकेलतेलाचा आहे, त्या हाताने तांब्या पकडला असेल त्यामुळे तांब्या रॉकेलच्या वासाचा झाला. आता मी सहज पाणी प्यायला