________________
२२
जे घडले तोच न्याय तर म्हणेल कि, 'तुम्हाला कोणी सांगितले होते जाऊन गरम पाणी ठेवायला?' अरे! जे घडले तोच न्याय. हा न्याय समजला तर, 'आता मी तक्रार नाही करणार,' असे म्हणणार. म्हणणार का नाही म्हणणार?
कोणी उपाशी असेल त्याला आपण जेवायला बसवले, आणि नंतर तो म्हणतो, 'तुम्हाला कोणी सांगितले होते जेवू घालायला? विनाकारण आम्हाला त्रास दिलात, आमचा वेळ वाया घालवला! असे म्हणाला तर आपण काय करायचे? त्याच्याशी वाद घालायचा? हे 'जे घडले तोच न्याय' आहे.
घरातील दोघांपैकी एकाने बुद्धि चालवणे बंद केले तर सर्व सुरळीत होऊन जाईल. पण तो त्याची बुद्धि चालवित असेल तर काय होईल? मग रात्री जेवायला पण आवडणार नाही.
पाऊस पडत नाही, हा न्याय आहे. तेव्हा शेतकरी काय म्हणेल? परमेश्वर अन्याय करत आहे. तो ते त्याच्या गैरसमजुतीमुळे बोलतो. त्याच्या अशा म्हणण्याने काय पाऊस पडून जाईल? पाऊस नाही पडत हाच न्याय. जर सतत पाऊस पडत असता आणि दरवर्षी पावसाळा चांगला जात असता तर पाऊसाचे काय नुकसान होणार होते? एके ठिकाणी गडगडून अतिशय पाऊस पडेल आणि दुसरीकडे दुष्काळ पडेल. निसर्गाने सर्व 'व्यवस्थित' केले आहे. तुम्हाला वाटते ना निसर्गाची व्यवस्था चांगली आहे? निसर्ग नेहमी न्यायच करतो.
म्हणजे ही सर्व सैद्धांतिक बाबत आहे. बुद्धि घालविण्यासाठी हा एकच कायदा आहे. जे घडले तोच न्याय, असे मानले तर बुद्धि जात राहणार. बुद्धि कुठपर्यंत जिवंत राहते? जे काही घडते आहे त्यात न्याय शोधायला जाल तोपर्यंत बुद्धि जिवंत राहते, हे तर बुद्धि पण समजून जाते. मग बुद्धिला पण लाज वाटते, कि जळलं हे आता हा धनीच असा बोलत आहे, त्यापेक्षा आपली जागा दुसरी कडे करणे चांगले.