________________
जे घडले तोच न्याय
नका शोधू न्याय ह्यात
प्रश्नकर्ता : बुद्धि काढायची च आहे. कारण कि ती खूप मार खायला लावते.
दादाश्री : ती बुद्धि काढायची असेल तर बुद्धि काही अशी च जात नाही. बुद्धि हे कार्य आहे तर आपण त्याचे कारण काढले तर हे कार्य नाहीसे होणार. त्याची कारणे काय? वास्तविकतेत जे घडले, त्याला न्याय म्हणाले, तेव्हा ती निघून जाईल. जग काय म्हणते? वास्तविकतेत झालेले चालवून घ्यावे. आणि न्याय शोधशोध करणार तर वाद (भांडण) चालू राहणार.
म्हणजे बुद्धि तशी जाणार नाही. बुद्धि जाण्याचा मार्ग काय? तर त्याच्या कारणांचे सेवन नाही केले तर बुद्धि निघून जाणार, ते कार्य होणार नाही.
प्रश्नकर्ता : आपण म्हणाला कि बुद्धि हे कार्य आहे आणि त्याची कारणे शोधलित तर ते कार्य बंद होऊन जाईल.
दादाश्री : त्याच्या कारणात, तर आपण न्याय शोधायला निघालो हे च त्याचे कारण आहे. न्याय शोधायचे बंद करून टाकले तर बुद्धि जात राहणार! न्याय कशासाठी शोधता आहात? सून काय म्हणत असते कि 'तू माझ्या सासूला ओळखत नाहीस. मी आले तेव्हापासून ती मला त्रास देत आहे. ह्यात माझा काय गुन्हा?'
कोणी ओळखल्या शिवाय दु:ख देईल का? त्याच्या हिशोबाच्या खात्यात जमा असेल म्हणून तर तुला पुन्हा-पुन्हा दुःख देत राहिल. तेव्हा म्हणशील 'मी तर त्यांचे तोंडही पाहीले नव्हते.' 'अरे, पण तू ह्या जन्मी पाहीले नसेल, परंतु मागच्या जन्मीचा हिशोब काय म्हणतो?' म्हणून जे होत आहे तोच न्याय'!
घरी मुलगा दादागिरी करतो ना? ती दादागिरी करतो तोच न्याय. ती