________________
२६
जे घडले तोच न्याय विकल्पाचा अंत हाच मोक्षमार्ग
म्हणून घडेल त्याला न्याय म्हणत असाल तर निर्विकल्प रहाल आणि लोक निर्विकल्प होण्यासाठी न्याय शोधायला निघाले आहेत. विकल्पाचा शेवट येतो तो रस्ता मोक्षाचा. विकल्प निर्माण होणार नाही असा आहे ना आपला मार्ग?
मेहनत केल्याशिवाय आपला अक्रम मार्गात माणूस पुढील प्रगती करत जातो. आपल्या चाव्याच अशा आहेत कि मेहनत केल्याशिवाय पुढे प्रगती होत जाते.
आता बुद्धि जेव्हा विकल्प करविते ना? तेव्हा सांगून द्यायचे, जे घडले तोच न्याय. बुद्धि न्याय शोधते कि माझ्याहून लहान आहेस, मर्यादा ठेवत नाही. मर्यादा ठेवली हा ही न्याय आणि नाही ठेवली तो पण न्याय. जितकी बुद्धि निर्विवाद होईल तेवढे मग निर्विकल्प होणार!
__ हे विज्ञान काय सांगते? न्याय तर संपूर्ण जग शोधत आहे. त्यापेक्षा आपणच स्वीकारुन घ्या ना, कि जे घडले तोच न्याय आहे. म्हणजे जज्ज नको आणि वकील ही लागणार नाही. अन्यथा शेवटी मार खाऊन सुद्धा तसेच राहते ना मग?
कोणत्याही कोर्टात न मिळे संतोष
आणि असे समजा कि, कोण्या एका भाऊला न्याय पाहिजे, तर आपण खालच्या कोर्टात जजमेन्ट करून घेतले. वकील भांडले, मग जजमेन्ट आले, न्याय आला तेव्हा म्हणतो, नाही, पण ह्या न्यायाने मला संतोष झालेला नाही. न्याय मिळाला तरी संतोष नाही, मग आता काय करायचे? वरच्या कोर्टात चला. तेव्हा जिल्हा कोर्टात गेले. तिथल्या जजमेन्ट वर पण संतोष झाला नाही. आता काय करायचे? तेव्हा म्हणे, नाही. तिथे अहमदाबादच्या हायकोर्टात? तेथे पण संतोष झाला नाही, मग सुप्रीम