________________
२४
जे घडले तोच न्याय तर बुद्धि दाखवते, मुलगा असून वडीलांच्या समोर दादागिरी? हे जे घडले तोच न्याय.
अर्थात् हे 'अक्रम (क्रमविरहीत) विज्ञान' काय म्हणते? पहा हा न्याय! लोक मला विचारतात कि तुम्ही बुद्धि कशाप्रकारे काढून टाकली? आम्ही न्याय शोधला नाही, म्हणून बुद्धि जात राहिली. बुद्धि कुठपर्यंत राहणार? न्याय शोधलात आणि न्यायाला आधार दिलात तर बुद्धि थांबते, आणि बुद्धि म्हणेल 'आपल्या पक्षात आहे हा भाऊ'. म्हणते, 'एवढी चांगली नोकरी केली आणि हे डायरेक्टरर्स कोणत्या आधाराने असे वाईट बोलतात?' असा प्रकारे तुम्ही आधार देतात का? न्याय शोधता? तो बोलतो तेच खरे आहे. आतापर्यंत का नव्हते बोलत? कोणत्या आधाराने बोलत नव्हते? आता कोणत्या न्यायाच्या आधाराने बोलत आहेत? विचार करायला नको का कि ते बोलतात ते सप्रमाण आहे? अरे, ते पगार वाढवून देत नाहीत हाच न्याय आहे. त्याला अन्याय कशा रीतेने म्हणू आपण?
बुद्धि शोधते न्याय हे तर सारे ओढवून घेतलेले दुःख आहे आणि थोडेफार जे दुःख आहे ते बुद्धिमुळे आहे. प्रत्येकात बुद्धि असते ना? ती विकसित बुद्धि दुःख देते. नसले तेथून दु:ख शोधून आणते. माझी तर बुद्धि पूर्ण विकसित झाल्यावर निघून गेली. बुद्धिच नाहीसी झाली! बोला, मजा येणार कि नाही येणार? बिलकुल अगदी एक सेन्ट बुद्धि राहिली नाही. तेव्हा एक माणूस मला म्हणाला, 'बुद्धि कशी काय नाहीसी झाली? तू निघून जा, तू निघून जा, असे म्हटल्याने?' मी म्हणालो 'नाही, अरे! असे नाही करता येत' तिने (बुद्धिने) तर आतापर्यंत आपला प्रभाव पाडला. गोंधळलो असतांना, खऱ्या वेळेला काय करावे, काय करू नये? याचे सगळे मार्गदर्शन ती देते. तिला काढून टाकता येईल का? तेव्हा मी म्हणलो, 'जो न्याय शोधतो ना, त्याच्याजवळ बुद्धि कायमची राहते.' 'जे घडले तोच न्याय' असे म्हणालेत तर बुद्धि जात राहणार. न्याय शोधायला गेलो ती बुद्धि !