________________
जे घडले तोच न्याय
२
नाही. लोक मला विचारतात कि तुमच्या पायाला फ्रेक्चर झाले आहे ते? तेव्हा मी सांगतो कि न्याय च केला आहे निसर्गने.
निसर्गाच्या न्यायाला जो समजेल 'घडले तोच न्याय' तर तुम्ही या जगातून मुक्त होऊ शकाल. नाहीतर निसर्गाला जरा सुद्धा अन्यायी समजलात तर मग तुमचे जगातील गोंधळून जायचे स्थानच आहे हे! निसर्गाला न्यायी मानणे ह्यालाच ज्ञान म्हणतात. 'जसे आहे तसे' समजणे, ह्याचे नांव ज्ञान 'जसे आहे तसे' न समजणे ह्याचे नांव अज्ञान.
एका माणसाने दुसऱ्याचे घर जाळून टाकले, तर अशा वेळेस कोणी विचारेल कि देवा हे काय? ह्याचे घर ह्या माणसाने जाळले हेच न्याय. हा न्याय आहे कि अन्याय ? तर म्हणे, 'न्याय. जाळले हेच न्याय.' आता त्याच्यावर तो राग काढेल, कि नालायक आहे, असा आहे आणि तसा आहे. त्यानंतर त्याला अन्यायाचे फळ मिळेल. तो न्यायालाच अन्याय म्हणत आहे ! हे जग अगदी न्यायस्वरूप च आहे. एक क्षण भर ही त्यात अन्याय होत नाही.
ह्या जगात न्याय शोधू नका. न्यायामुळेच सर्व जगात वादविवाद (भांडणे) व्हायला लागले आहेत. जग हे न्यायस्वरूपच आहे. म्हणून जगात न्याय शोधू च नका. जे घडले तोच न्याय. जे होऊन गेले तोच न्याय. ही कोर्ट वगैरे झालीत, ते न्याय शोधायला निघालात म्हणून ! अरे माणसा, न्याय होतो का? त्यापेक्षा काय झाले ते पहा! हाच न्याय आहे.
न्यायस्वरूप वेगळे आहे आणि आपले हे फळस्वरूप वेगळे आहे. न्याय अन्यायाचे फळ हे सारे हिशोबाने येते आणि आपण आपला न्याय त्याच्या बरोबर जोइन्ट करायला (जोडायला) जातो. त्यामुळे तर कोर्टातच जावे लागते ना? आणि तेथे जाऊन थकून परतच यायचे आहे शेवटी !
एखाद्याला आपण एक शिवी दिली तर तो परत आपल्याला दोनतीन शिव्या देणारच. कारण कि त्याचे मन आपल्यावर रागाने उफाळत असते. तर लोक काय म्हणतात ? त्याने तीन शिव्या का दिल्या? ह्याने तर एकच