________________
जे घडले तोच न्याय
आत अशी श्रद्धा ठेवायची कि जे घडले तोच न्याय. तरीही व्यवहारात आपल्याला पैश्यांच्या वसूलीसाठी जावे लागते. तेव्हा ह्या श्रद्धेमुळे आपली बुद्धि बिघडत नाही. समोरच्यावर राग येणार नाही आणि आपला पण संताप होणार नाही. जसे नाटक करीत आहात असे तिथे जाऊन बसायचे. आणि म्हणायचे 'मी तर चार वेळा येऊन गेलो पण भेट झाली नाही. ह्या वेळेला मात्र तुमची पुण्याई म्हणा किंवा माझी पुण्याई पण आपली भेट झाली.' असे गम्मत करता करता, उधारी वसूली करावी. बाकी 'तुम्ही मजेत आहात ना? मी तर मात्र सध्या मोठ्या संकटात सापडलो आहे.' तेव्हा तो म्हणेल, 'तुम्हाला काय अडचण आहे?' तेव्हा सांगायचे 'माझी अडचण तर मलाच माहित. तुमच्या जवळ पैसे नसले तर कोणाकडून मला आणून द्या.' अशा त-हेच्या गोष्टी करून काम काढून घ्यावे. लोकतर अहंकारी आहेत म्हणून आपले काम होईल. अहंकारी नसते तर काहीच चालले नसते. अहंकारी माणसाच्या अहंकाराला जर चढवून दिले, तर तो सर्व काही करतो. 'पांच-दहा हजार आणून द्या'. म्हटले तर तो 'हो, आणून देतो' असे म्हणतो. म्हणजे भांडण व्हायला नको. राग-द्वेष व्हायला नको. शंभर खेपा मारल्या आणि तरीही आणून नाही दिले तर हरकत नाही. 'जे घडले तोच न्याय' असे म्हणावे. निरंतर न्यायच! काय तुमच्या एकट्याची वसूली मिळत नाही असे आहे का?
प्रश्नकर्ता : नाही, नाही. सगळ्या व्यापारांचे असतात!
दादाश्री : सगळे जग महाराणीमुळे फसले नाही, उधारी वसूलीमुळे फसले आहेत. जो तो मला सांगतो कि, 'माझी वसूली दहा लाखाची परत मिळत नाही.' पहिली वसूली मिळत होती. कमवित होते तेव्हा कोणी मला सांगायला येत नव्हते. आता सांगायला येतात!
प्रश्नकर्ता : कोण आपल्याला अपशब्द बोलेल, ती वसूलीच आहे ना? दादाश्री : हो, ती पण वसूलीच आहे ना! तो बोलतो ते तीक्ष्ण