Book Title: Je Ghadle Toch Nyay
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 29
________________ २० जे घडले तोच न्याय बोलतो कुठल्या ही डिक्शनरीत (शब्दकोशात) नसतील असे शब्द बोलतो. मग आपण डिक्शनरी उघडुन शोधतो कि हा शब्द कुठून आला? त्यात तो शब्द नसतो, असे माथेफिरु असतात! पण ते त्यांच्या जबाबदारीवर बोलतात ना! त्यात जबाबदारी आपली नाही ना! तेवढे चांगले आहे. तुमचे पैसे नाही दिले तरी तो न्याय आहे, परत केले तरी तो न्याय आहे. हा सगळा हिशोब मी बऱ्याच वर्षापूर्वी काढून ठेवलेला. अर्थात् पैसे परत दिले नाही यात कोणाचा दोष नाही, त्याच प्रमाणे कोणी पैसे परत करायला आला तर त्यात त्याचे उपकार कसले?! ह्या जगाचे संचालन वेगळ्याच प्रकारचे आहे! व्यवहारात दुःखाचे मूळ न्याय शोधून शोधून तर दम निघून गेला आहे. माणसाच्या मनात असे विचार येतात कि मी याचे काय बिघडवीले आहे, तर तो माझे बिघडवीत आहे. प्रश्नकर्ता : असे वाटते, आपण कोणाचे नांव घेत नाही, तर लोक आम्हाला का म्हणून फटके मारतात? दादाश्री : हो, म्हणूनच तर हे कोर्ट, वकील ह्याचे व्यवसाय चालतात. असे झाले नसते तर कोर्ट कशाप्रकारे चालणार? वकीलांना कोणी अशील मिळाले नसते ना! परंतु वकील किती पुण्यशाली, कि अशील सकाळी लवकर उठून येतात आणि वकीलसाहेब तेव्हा दाढी करीत असतात. तर तो थोडावेळ बसून राहतो. साहेबाला घरच्या घरी पैसे द्यायला येतो. साहेब पुण्यशाली आहेत ना! नोटिस लिहून देण्याचे तो पाचसे रुपये देतो. म्हणून न्याय शोधू नका, तर सर्व सुरळीत पार पडेल. तुम्ही न्याय शोधता हीच भानगड आहे. प्रश्नकर्ता : पण दादा, अशीवेळ आली आहे कि आपण ज्याचे चांगले करायला जातो, तोच आपल्याला दंडा मारतो.

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38