________________
जे घडले तोच न्याय
२१
दादाश्री : त्याचे चांगले केले तरी तो दंडे मारतो ह्याचेच नांव न्याय! पण तसे समोर बोलायचे नाही. समोर बोलले तर पुन्हा त्याच्या मनात असे येईल कि हा फार निर्लज्ज झाला आहे.
प्रश्नकर्ता : आपण एखाद्या बरोबर अगदी सरळ वागत असलो, तरी तो आपल्याला काठी मारतो.
दादाश्री : लाठी मारतो ते च न्याय ! शांततेने नाही राहू देत ?
प्रश्नकर्ता : सदरा घातला, तर म्हणेल सदरा का घातला ? हा टीशर्ट घातला, तर म्हणेल, टीशर्ट का घालता? तो काढून टाकला तर मग म्हणेल, का काढला?
दादाश्री : ह्याला च न्याय असे आपणास म्हणावे लागेल ना! आणि त्यात न्याय शोधायला गेलो, त्याचाच मार पडतोय सारा. अर्थात् न्याय शोधायचा नाही. हे असे आम्ही अगदी साधे - सरळ संशोधन केले आहे. न्याय शोधला म्हणून तर सर्वांना मार पडला. शेवटी होता तिथल्या तिथे च असतो! तर मग आधीच का बरे नाही समजायचे. ही तर निव्वळ अहंकारची दखल आहे.
‘जे घडले तेच न्याय.' म्हणून न्याय शोधायला जाऊ नका. तुझे वडील म्हणतात ‘तू असा आहेस, तसा आहेस.' ते घडले तोच न्याय आहे. त्यांच्यावर तुम्ही दावा नाही करायचा कि तुम्ही हे असे का बरे बोललात? ही गोष्ट अनुभवाची आहे आणि नाही तरी शेवटी थकून पण न्याय तर (स्वीकार) करावा च लागतो ना! स्वीकार करतात का नाही लोक? जरी कीती ही व्यर्थ प्रयत्न केले तरी पण होता तिथल्या तिथे? तेच स्वखुशीने स्वीकार करून घेतले असते तर काय वाईट? हो, त्यांना समोर सांगायचे नाही, नाहीतर परत उलट्या रस्त्याने चालतील. मनात समजून जायचे कि जे जे घडेल तोच न्याय.
बुद्धिला आता वापरु नका, जे घडत आहे त्यालाच न्याय म्हणा. हा