________________
जे घडले तोच न्याय आग्रह सोडला तो जिंकला ह्या जगात तू न्याय शोधायला जातो? जे घडले तोच न्याय, थप्पड मारली तर त्याने माझ्यावर अन्याय केला असे नाही. पण जे घडले तोच न्याय. हे जेव्हा समजले तेव्हा हा सारा उलगडा झाला.
___'जे घडले तोच न्याय' असे नाही म्हणालात तर बुद्धि उड्या मारायला लागेल. अनंत जन्मापासून ही बुद्धि गोंधळ करत आहे, मतभेद निर्माण करत आहे. खरं तर बोलण्याची वेळच येत नाही. आम्हाला काही बोलण्याची वेळच येत नाही. जो आग्रह सोडून देतो तो जिंकला. तो स्वत:च्या जबाबदारीवर आग्रह करत असतो. अर्थात् बुद्धि गेली हे कसे कळून येणार? जे घडले त्याला न्याय म्हटले, म्हणजे बुद्धि गेली. असे म्हणता येईल. बुद्धि काय करते? न्याय शोधशोध करते. त्यामुळे च हा संसार ऊभा राहिला आहे. म्हणून न्याय शोधू नका!
न्याय तर शोधायचा असतो का? जे झाले तेच करेक्ट, लागलीच तयार. कारण कि 'व्यवस्थित' शिवाय काहीच होत नाही. व्यर्थाची हाय!
हाय!
महाराणीने नाही, वसूलीराणीने फसवले बुद्धि तर खूपच गडबड गोंधळ करते. बुद्धिच सगळं काही बिघडवीत असते ना? ही बुद्धि म्हणजे काय? जी न्याय शोधते, तिलाच बुद्धि म्हणतात. ती (बुद्धि म्हणेल) 'तुम्ही पैसे का म्हणून देणार नाही, माल घेऊन गेला ना?' हे 'का म्हणून' विचारले, ती बुद्धि. अन्याय केला तोच न्याय. तरी आपण वसूली करत रहा. सांगा 'आम्हाला पैश्यांची खूप गरज आहे आणि आम्हाला खूप अडचण आहे'. मग परत मागे यावे. पण 'का म्हणून देणार नाही तो?' असे म्हटले तर मग वकील शोधायला जावे लागते. सत्संग सोडून तेथे बसणार मग? जे घडले तोच न्याय म्हटले म्हणजे बुद्धि निघून जाते.