Book Title: Je Ghadle Toch Nyay
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 20
________________ जे घडले तोच न्याय स्वदोष दाखवतो अन्याय फक्त स्वत:च्या दोषाने जग सर्व बेकायदेशीर वाटते. बेकायदेशीर कोणत्याही क्षणी नसते. अगदी न्यायशील असते. इथल्या कोर्टाच्या न्यायात फरक पडू शकतो. तो खोटा होऊ शकतो, पण ह्या निसर्गाच्या न्यायात फरक होत नाही. प्रश्नकर्ता : कोर्टाचा न्याय हा निसर्गाचा न्याय, नाही का? दादाश्री : हे सारे नैसर्गिकच आहे. परंतु कोर्टात आपल्याला असे वाटते कि ह्या जज्जने असे केले. तसे निसर्गाच्या बाबतीत वाटणार नाही ना! पण ही तर बुद्धिची लढाई आहे! प्रश्नकर्ता : तुम्ही निसर्गाच्या न्यायाला कॉम्प्युटर बरोबर तुलना केली पण कॉम्प्युटर तर मेकॅनिकल (यंत्रवत्) असते? दादाश्री : त्याच्या सारखे समजविण्याचे दुसरे कोणते साधन नव्हते म्हणून मी हे उदाहरण दिले. बाकी कॉम्प्युटर तर फक्त सांगण्यासाठीच आहे कि कॉम्प्युटर मध्ये जसे फीड केला जातो, तसे ह्यात आपला भाव भरला जातो. म्हणजे एका जन्मातील भावकर्म आहेत ते त्यात पडल्या नंतर दुसऱ्या अवतारात त्याचा परिणाम दिसून येतो, म्हणजे त्याचे विसर्जन होते. आणि ते ह्या 'व्यवस्थित शक्तिच्या' हातात आहे. जे एक्झेक्ट न्यायच करतो. जसे न्यायपूर्ण असेल तसेच करतो. बाप आपल्या मुलाला मारुन टाकतो असे सुद्धा न्यायात येते. तरीसुद्धा त्याला न्याय म्हणतात. निर्सगाच्या न्यायाला न्यायच म्हणतात. कारण कि जसा बाप आणि लेकाचा हिशोब होता, तसे हे हिशोब चुकविले. तो हिशोब होऊन गेला. ह्यात हिशोब (वसूली) असतो, दुसरे काही नाही. एखाद्या गरीब माणसाला लॉटरीत एक लाख रुपये मिळतात ना! हा पण न्याय आहे, आणि कोणाचा खिसा कापला गेला तर तो पण न्याय!

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38