________________
जे घडले तोच न्याय गेलो, तर मला रॉकेलचा वास आला. तेव्हा आम्ही 'पहातो आणि जाणतो' कि काय झाले ते! मग न्याय काय व्हायला पाहिजे कि, कधी नाही आणि आज आपल्या वाट्याला हे कुठुन आले? म्हणून हा आपलाच हिशोब आहे. तर मग हा हिशोब पूर्ण करून टाका. परंतु कोणाला कळणार नाही अश्यारीतीने, तो पूर्ण करून टाका. मग सकाळी उठल्या वर त्या बाईनी येऊन परत तेच पाणी मागवून दिले, तरी पुन्हा तेच पाणी आम्ही पिऊन जातो. पण कोणाला कळू देत नाही, आता अज्ञानी ह्या ठिकाणी काय करेल?
प्रश्नकर्ता : आरडाओरड करून टाकेल.
दादाश्री : घरातील सर्व माणसांना समजून जाईल कि ओहोहो! आज शेठजीच्या पाण्यात रॉकेल पडले!
प्रश्नकर्ता : सगळे घर हादरुन जाईल.
दादाश्री : अरे, सगळ्यांना वेडे करून टाकेल! आणि बायको तर बिचारी चहात साखर टाकायचेच विसरुन जाईल. एकदा विचलीत झाले तर काय होणार? इतर सर्व बाबतीत पण विचलीत होणार.
प्रश्नकर्ता : दादा, आपण तक्रार न करणे हे बरोबर, पण मग शांत चित्ताने घरच्यांना सांगू शकतो ना कि भाऊ, पाण्यात रॉकेल मिसळले होते. आता या पुढे लक्षात ठेवा. ___ दादाश्री : हे केव्हा सांगता येईल? चहा पाणी चालले असेल, सगळे अगदी हसत असतील, तेव्हा हासतहासत आपण गोष्ट सांगून टाकावी.
जशी आम्ही ही गोष्ट उघड केली ना?! असेच हासत-खेळत असतांना ती गोष्ट उघड करून टाकावी.
प्रश्नकर्ता : म्हणजे समोरच्या व्यक्तिला टोचणार नाही अशा रीतीने सांगायचे ना?