________________
१२
जे घडले तोच न्याय
निसर्गाच्या न्यायाला आधार काय?
प्रश्नकर्ता : निसर्ग न्यायी आहे, त्याला आधार काय? न्यायी म्हणण्यासाठी काही आधारभूत गोष्ट तर पाहिजे ना?
दादाश्री : हे न्यायी आहे. ते तर तुम्हाला समजण्यापुरतेच आहे. तुम्हाला खात्री होईल कि न्यायी आहे. परंतु बाहेरच्या लोकांना निसर्ग न्यायी आहे ह्याची कधीच खात्री होणार नाही. कारण कि त्यांना स्वत:ची दृष्टि नाही ना! (ज्याला आत्मज्ञान प्राप्ति झालेली नाही त्याची दृष्टि सम्यक् नाही.)
बाकी, आम्ही काय सांगू इच्छितो कि ? आफ्टर ऑल (शेवटी), जग काय आहे? अरे! भाऊ हे असेच आहे. एक अणूचा पण फरक होणार नाही, एवढे सारे न्यायस्वरूप आहे, निव्वळ न्यायी आहे.
निसर्ग दोन वस्तुनी बनलेले आहे. एक स्थायी सनातन वस्तु आणि दुसरी अस्थायी वस्तु. जी अवस्था रुपाने आहे. त्यात अवस्था बदलत राहणार आणि त्यांच्या कायद्यानुसार बदलत राहणार. पहाणारा माणूस स्वत:च्या एकांतिक बुद्धिने पाहतो. अनेकांत बुद्धिने कोणी विचार करीत नाही, पण स्वतःच्या स्वार्थनेच पहात असतो.
कोणाचा एकुलता एक मुलगा मेला तरी तो न्यायच आहे. तेथे काही कोणी अन्याय केलेला नाही. ह्यात परमेश्वराचा, कोणाचाही अन्याय नाही. हा न्यायच आहे! म्हणून आम्ही म्हणतो कि जग हे न्यायस्वरूप आहे. निरंतर न्यायस्वरूपातच आहे.
कोणाचा एकुलता एक मुलगा गेला तर, त्यात त्यांच्या घरातीलच माणसे रडतात. दुसरे आजुबाजूची माणसे का रडत नाही? ती घरातील माणसे स्वतःच्या स्वार्थामुळे रडतात. जर सनातन तत्वात (आत्मस्वरूपात) आलात तर निसर्ग न्यायपूर्ण च आहे.
तालमेळ पडतो का ह्या सर्व गोष्टीत? मेळ जमला तर समजावे कि