________________
जे घडले तोच न्याय बरोबर आहे. ज्ञानदृष्टिने पाहिले तर दुःख किती कमी होऊन जाते? ज्ञान ठेवून बघितल तर?
आणि एक सेकन्डसाठी पण न्यायात फरक नाही होत. जर अन्यायी असते तर कोणी मोक्षाला जाणार नाही. हे तर कोणी म्हणेल, कि चांगल्या माणसांना अडचणी का येतात? पण इतर माणसे अशी काही अडचण करू शकणार नाहीत. कारण कि स्वतः जर कशात ही हस्तक्षेप केला नाही, तर कोणाची हिंमत नाही कि तुमचे नांव घेतील. आपण स्वतः हस्तक्षेप केला म्हणून हे सारे झाले.
प्रेक्टिकल पाहिजे, थियरी नाही पण शास्त्रकार काय म्हणतात. 'जे घडले तोच न्याय' असे म्हणत नाही. ते तर (लौकिक) न्याय हाच न्याय म्हणतात. अरे वेड्या, तुझ्यामुळे तर आम्ही रखडुन पडलो ! त्यामुळे थियरेटिकली असे म्हणतात कि न्याय हाच न्याय तर प्रेक्टिकल काय म्हणते, जे घडले तोच न्याय प्रेक्टिकल शिवाय जगात काही काम होत नाही. म्हणन हे थियरेटिकल टिकले
नाही.
म्हणून, जे घडले तोच न्याय. निर्विकल्पी व्हायचे आहे, तर 'जे घडले तोच न्याय.' विकल्पी व्हायचे असेल तर न्याय शोधा. म्हणजे परमात्मा व्हायचे असेल तर ह्या बाजूला जे घडेल तोच न्याय आणि भटकंती व्हायचे असेल तर हा न्याय शोधून भटकतच रहावे लागेल निरंतर.
लोभींना बोचे नुकसान हे जग खोटे नाही. जग न्यायस्वरूप आहे बिलकुल कधी ही अन्याय केला नाही निसर्गाने. निसर्ग माणसाला कापून टाकतो, अपघात होतो, हे सारे न्यायस्वरूप आहे. न्यायाच्या बाहेर निसर्ग जात नाही. हे बिनकामाची गैरसमजूतीचीच बोंबाबोंब... आणि जीवन जगण्याची कला पण नाही आणि नुस्ती चिंता, काळजी... म्हणून जे घडते, त्याला न्याय म्हणा.