________________
जे घडले तोच न्याय
कमी-जास्त वाटणी, हाच न्याय
एक माणूस होता, त्याचे वडील वारले तर सर्व भावांची जमीन आहे, ती त्या मोठ्या भावाच्या हातात येते. तो मोठा भाऊ आहे तो इतरांना दटवत राहतो असतो, आणि जमीन देत नाही. जमीन अडीचशे बिघा होती. त्या चौघांना पन्नास-पन्नास बिघा जमीन द्यायची होती. पण कोणी पंचवीस घेऊन गेला, कोणी पन्नास घेऊन गेला, कोणी चाळीस घेऊन गेला आणि कोणाला पाचच बिघा जमीन वाट्याला आलेली असेल.
अशावेळेला काय समजायचे? जगाचा न्याय काय म्हणतो कि मोठा भाऊ खोटारडा आणि वाईट आहे. निसर्गाचा न्याय काय म्हणतो? मोठ्या भावाचे खरे आहे. पन्नास वाल्याला पन्नास दिले, पंचवीस वाल्याला पंचवीस, चाळीस वाल्याला चाळीस आणि पाच वाल्याला पाचच बिघा जमीन दिली. आणि बाकी ची गेली मागच्या जन्माची उधारी वसुल करण्यात. माझी गोष्ट लक्षात येते का तुम्हाला?
म्हणजे ज्याला भांडण करायचे नसेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, नाही तर हे जग भांडण च आहे. येथे न्याय होऊ शकत नाही. न्याय तर पाहण्यासाठी आहे कि, माझ्यात काही परिवर्तन, काही फरक झाला आहे का? जर मला न्याय मिळत असेल, तर मी न्यायी आहे, ही गोष्ट निश्चित होवून गेली. न्याय तर आपले एक थर्मोमीटर आहे. बाकी व्यवहारात न्याय असू शकत नाही ना! न्यायात आला म्हणजे माणूस परिपूर्ण झाला. तोपर्यंत अबाव नॉर्मल किंवा बिलो नॉर्मल असतो. असा पडलेला असतो, किंवा तो नॉर्मलपेक्षा जास्त असतो, किंवा नॉर्मलपेक्षा कमी असतो.
म्हणून तो मोठा भाऊ धाकट्या भावाला पूर्ण वाटा देत नाही, त्याला पाच बिघाच जमीन देतो ना! त्याला आपले लोक न्याय करायला जातात आणि ते मोठ्या भावाला वाईट ठरवितात. आता हा सर्व गुन्हाच आहे. तू