Book Title: Je Ghadle Toch Nyay
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 23
________________ जे घडले तोच न्याय तुम्ही दुकानदाराला शंभराची नोट दिली. पांच रुपयाचे त्याने सामान दिले. आणि पांच रुपये त्याने परत दिले. गडबडीत तो नव्वद रुपये द्यायचे विसरुन गेला, त्याच्याकडे कितीतरी शंभराच्या नोटा, कितीतरी दहाच्या नोटा असतात, मोजल्या शिवायच्या. तो विसरुन गेला आणि पाच रुपये त्याने आपल्याला दिले तर आपण काय म्हणणार? 'मी तुला शंभराची नोट दिली होती', तेव्हा तो म्हणेल, 'नाही'. त्याला तशीच आठवण आहे, तो ही खोटे बोलत नाही, तर आपण काय करायचे? १४ प्रश्नकर्ता : पण ती गोष्ट सारखी टोचत - बोचत राहते तेवढे पैसे गेले मन आरडाओरड करते. दादाश्री : ते बोचते, ज्याला बोचते त्याला झोप येणार नाही. 'आपल्याला' (शुद्धात्माला) काय? ह्या शरीरात ज्याला टोचते त्याला झोप येणार नाही. सगळ्यांना काही टोचेल असे थोडी आहे? लोभ्याला च टोचते ! तेव्हा त्या लोभ्याला सांगा, टोचते तर झोपून जा ना ! आत्तातर संपूर्ण रात्र झोपावेच लागेल! प्रश्नकर्ता : त्याची झोप पण जाईल आणि पैसे पण जातील. दादाश्री : हो, म्हणजे तेथे 'जे घडते ते खरे' हे ज्ञान हजर झाले तर आपले कल्याण होते. ‘जे घडले तोच न्याय,' हे समजले तर संपूर्ण संसारचे पैल तीर येऊन जाईल. ह्या जगात एक सेकन्ड पण अन्याय होत नाही. न्यायच होत राहिला आहे. म्हणजे बुद्धि आपल्याला फसवते कि, ह्याला न्याय कसे म्हणता येईल? म्हणून आम्ही मूळ गोष्ट सांगू इच्छितो, कि निसर्गाचे हे आहे, आणि बुद्धिने तुम्ही वेगळे होवून जाता. म्हणजे ह्यात आपल्याला बुद्धि फसविते. एकदा समजून घेतल्यानंतर मग बुद्धिचे आपण नाही ऐकायचे. जे घडले तोच न्याय. कोर्टाचे न्यायत भूल - चुक होऊ शकते. उलट-सुलट होते, परंतु ह्या न्यायात फरक होत नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38