________________
१०
जे घडले तोच न्याय दादाश्री : होय, ह्याच पद्धतीने सांगायचे तर तो समोरच्या व्यक्तिला मदतीचे ठरेल. पण सगळ्यात चांगला मार्ग हाच कि मेरी भी चूप अन् तेरी भी चूप!!! ह्याच्या शिवाय दुसरे काहीच नाही. कारण कि ज्याला संसारातून सूटका करायची आहे तो किंचित ही आरडाओरड करणार नाही.
प्रश्नकर्ता : सल्ला देण्याच्या दृष्टिने ही काही सांगायचे नाही? तेथे पण चूप रहायचे का?
दादाश्री : तो त्याचा सर्व हिशोब घेऊन आला आहे. शहाणे होण्यासाठी पण तो सारा हिशोब घेऊनच आलेला आहे.
आम्ही काय सांगतो कि संसारतून सूटायचे असेल तर पळून जा. आणि पळायचे असेल तर काही बोलू नको. रात्री पळून जायचे असेल आणि आपणच आरडाओरड केली तर मग आपण पकडले जाऊ ना!
परमेश्वराकडे कसे असते?
परमेश्वर न्यायस्वरूप नाही आणि अन्यायस्वरूप पण नाही. कोणाला दु:ख होऊ नये हीच परमेश्वराची भाषा आहे. म्हणून न्याय-अन्याय ही तर लोकभाषा आहे.
चोर चोरी करण्यात धर्म समजतो, दानेश्वर दान देण्यात धर्म समजतो, ही लोकभाषा आहे, परमेश्वराची भाषा नाही. परमेश्वराकडे असे तसे काहीच नाही. परमेश्वराकडे तर एवढेच आहे कि, 'कोणत्याही जीवाला दुःख होणार नाही, हीच आमची आज्ञा आहे!'
न्याय-अन्याय तर निसर्गच पहातो. बाकी, ह्या इथे जो जगाचा न्यायअन्याय आहे ते शत्रूला, गुन्हेगाराला मदत करतो. म्हणेल, 'असेल बिचारा, जाऊ द्या ना!' मग तो गुन्हेगार असा सूटुन जातो. 'असेच असते.' म्हणा. बाकी, निसर्गाच्या न्यायाला तर सुटकाच नाही. तिथे कोणाचेच चालत नाही!