________________
जे घडले तोच न्याय
आणि नऊने भागायचे म्हणजे पुन्हा मूळ ठिकाणीच येणार न! सारे गुंथे कसे गुरफटलेले आहेत. म्हणून माझे हे शब्द ज्याने पकडले असतील त्यांचे काम होवून जाईल ना !
४
प्रश्नकर्ता : हो दादा, हे दोन-तीन शब्द पकडले असतील आणि जिज्ञासु माणूस असेल त्याचे काम होऊन जाईल.
दादाश्री : काम होऊन जाईल, जास्त शहाणपणा केला नाही, तर काम होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : व्यवहारात ‘तू न्याय शोधू नको' आणि 'भोगतो त्याची चुक', हे दोन सूत्र पकडले आहेत.
दादाश्री : न्याय शोधू नको. हे जर वाक्य पकडून ठेवले तर त्याचे सगळे व्यवस्थित होऊन जाईल. हा न्याय शोधतो आहे, गुंतागुंती होत असते.
म्हणूनच सर्व
पुण्योदयाने खूनी पण सुटेल निर्दोष
प्रश्नकर्ता : कोणी कोणाचा खून केला, तर तो पण न्यायच म्हणता येईल का?
दादाश्री : न्यायाच्या बाहेर काहीच होत नाही. न्यायच म्हटले जाते परमेश्वराच्या भाषेत. सरकारी भाषेत नाही म्हणता येणार. लोकभाषेत नाही म्हणता येणार. लोकभाषेत तर खून करणाऱ्याला पकडून आणतील, कि हाच गुन्हेगार आहे आणि परमेश्वराच्या भाषेत काय म्हणतात? ते म्हणतात कि, ज्याचा खून झाला तो गुन्हेगार आहे. तेव्हा म्हणे, हा खून करणाऱ्याचा गुन्हा नाही? तेव्हा सांगतात, नाही, खून करणारा जेव्हा पकडला जाईल, त्यानंतर तो गुन्हेगार म्हटला जाईल. आता तर तो पकडला गेला नाही, आणि हा पकडला गेला. तुमच्या लक्षात आले नाही का?
प्रश्नकर्ता : कोर्टात एखादा माणूस खून करून निर्दोष सुटून जातो,