________________
जे घडले तोच न्याय तो त्याच्या पुण्यमुळे सुटून जातो कि तो त्याच्या पूर्वकर्मचा बदला घेत आहे म्हणून सुटतो. हे काय आहे?
दादाश्री : ते पुण्य, आणि पूर्वकर्माचा बदला एकच म्हटले जाते. तो त्याच्या पुण्याइने सुटून गेला आणि कोणी केले नसेल तरी पण पकडला जाईल, त्याला जेलमध्ये जावे लागेल. तो त्याच्या पापाचा उदय. त्यात सुटकाच नाही.
बाकी, या कोर्टात कधीकधी अन्याय होतो. परंतु ह्या जगात निसर्ग अन्याय करत नाही, न्यायातच असतो. न्यायाच्या बाहेर निसर्ग कधी ही गेला नाही. मग वादळ दोनदा येवो किंवा एकदा येवो, परंतु न्यायातच होत असते.
प्रश्नकर्ता : आपल्या दृष्टिने विनाश होताना जी दृश्ये दिसतात, ते आपल्यासाठी श्रेयकर असतात ना?
दादाश्री : विनाश होतांना दिसते, त्याला श्रेयकर कसे म्हणता येईल? पण विनाश होतो ते खरच पद्धतशीर सत्य आहे. निसर्ग तिथे विनाश करतो ते बरोबर आहे आणि निसर्ग ज्याचे पोषण करतो ते पण बरोबर आहे. सर्व अगदी व्यवस्थित चालू आहे ऑन द स्टेज! हे तर लोक आपल्या स्वार्थामुळे ओरडत असतात कि, माझे पीक जळाले तेव्हा ते लहान शेतकरी म्हणतात आमचा फायदा झाला, म्हणजेच लोक तर स्वतःच्या स्वार्थलाच गातात.
प्रश्नकर्ता : आपण म्हणता कि निर्सग न्यायी आहे, तर मग भूकंप होतो, वादळ होते, पाऊस खूप पडतो ते का बरं?
दादाश्री : तो सर्व न्यायच करीत असतो, पाऊस पडतो, खूप धान्य पिकते. हे सारे न्यायच होत आहे. भूकंप होतो तो पण न्यायच होत आहे.
प्रश्नकर्ता : ते कसे काय?
दादाश्री : जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनाच पकडले जाते इतरांना नाही. गुन्हेगारालाच पकडले जाते! हे जग किंचित्मात्र डिस्टर्ब झालेले नाही. एक सेकन्डही न्यायाच्या बाहेर मुळीच गेले नाही.