________________
जे घडले तोच न्याय दिली होती. तर ह्याचे न्याय काय आहे? हे च कि त्यानी आपल्याला तीन शिव्या द्याच्या च होत्या. कारण तो मागचा हिशोब वसुल करणार कि नाही?
प्रश्नकर्ता : हो, करुन घेणार.
दादाश्री : नंतर वसूली करणार च ना! त्याच्या वडीलांना जर आपण पैसे दिले असले आणि मग संधी मिळाली, तर आपण ते वसुल करून घेऊ ना?! पण तो तर समजेल कि हा अन्याय करीत आहे. असा च हा निसर्गाचा न्याय आहे कि मागचा हिशोब असेल ते सगळे एकत्र जोडून देतो. आज पतिला त्याची पत्नी त्रास देत असेल, तो निसर्गाचा न्याय च आहे. पति समजतो कि ही पत्नी खूप वाईट आहे, आणि पत्नी काय समजणार कि नवरा वाईट आहे. परंतु हा निसर्गाचा न्याय च आहे.
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : आणि मग तुम्ही तक्रार करता. मी तक्रार ऐकत नाही, याचे कारण काय? प्रश्नकर्ता : आता लक्षात आले कि, हा न्याय आहे.
गुंथा सोडवतो निसर्ग दादाश्री : ही आमची शोधखोळ आहे ना सगळी! भोगतो त्याची चुक' पहा शोध किती चांगला आहे! कोणाच्याही संघर्षात (वादविवादात) पडायचे नाही, आणि व्यवहारात न्याय शोधूच नका.
नियम कसा आहे कि जसा गुंथा केला असेल, त्या पद्धतीनेच तो गुंथा सुटत जाईल. अन्यायपूर्वक गुंथा केला असेल तर अन्यायाने सुटतो आणि न्यायाने केला असेल तर न्यायाने सोडवला जातो. अशा रीतीने सारा गुंथा सोडवला जातो आणि लोक त्यात न्याय शोधतात. अरे माणसा ! कोर्टा प्रमाणे न्याय कसला शोधतोस! अन्यायपूर्वक गुंथा तू केलास आणि आता न्यायपूर्वक तू तो सोडवू पाहतोस. हे कसे होईल? हे तर नऊने गुणायचे