________________
जे घडले तोच न्याय
विश्वाची विशालता, शब्दातीत... ह्या साऱ्या शास्त्रात लिहीले आहे एवढे च जग नाही. शास्त्र मध्ये तर अमुकच भाग आहे. जग हे तर अवक्तव्य आणि अवर्णनीय आहे कि ते शब्दाने सांगता येणारे नाही, मग तुम्ही शब्दांच्या बाहेर कुठून आणणार? शब्दात सांगता येणार नाही, ते शब्दांच्या पलीकडेचे त्याचे वर्णन तुम्ही कसे समजणार? एवढे मोठे विशाल आहे जग, आणि ते मी पाहून बसलो आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो कि, जग किती विशाल आहे !
निसर्ग तर सदा न्यायीच जो निसर्गाचा न्याय आहे तेथे एक क्षण सुद्धा अन्याय होत नाही. एक क्षण सुद्धा हा निसर्ग अन्यायाला पावला नाही. कोर्टात तसे झाले असेल, कोर्टात सगळे काही चालते. परंतु निर्सग कधी अन्यायी होत नाही. निसर्गाचा न्याय कसा आहे? तुम्ही जर इमानदार असाल आणि आज जर तुम्ही चोरी करायला जाल तर तो तुम्हाला आधीच पकडून देईल आणि मलीन माणूस असेल तर त्याला पहिल्या दिवशी एन्करेज (प्रोत्साहित) करेल. निसर्गाचा असा हिशोब असतो कि पहिल्याला स्वच्छ ठेवायचे, म्हणून त्याला पकडवून देतो, मदत नाही करत आणि दुसऱ्याला मदतच करत राहतो. नंतर असा मार मारेल कि तो पुन्हा कधी वर येणारच नाही. तो अगदी अधोगतीला जाईल, पण निर्सग एक मिनिट सुद्धा अन्याय करत