Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
[Marathi
दादा भगवान कथित
सेवा - परोपकार
आपले फळ दुसऱ्याला द्याल तर निसर्ग आपले सर्वच सांभाळून घेईल.
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
17
AOYA
PNAMESI
दादा भगवान कथित
सेवा-परोपकार
मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबेन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India.
: श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद 380014, गुजरात.
फोन - (079)39830100
No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : 3,000
भाव मूल्य
द्रव्य मूल्य
मुद्रक
-
10 'परम विनय' आणि
4:3
10 रुपये
ऑक्टोबर 2016
'मी काहीच जाणत नाही', हा भाव !
अंबा ऑफसेट
B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC,
क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044
फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
El
વર્તમાર્તયેકર , શ્રીફમધરવામાં नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवण्झायाणं नमो लोए सब्यसाहूर्ण एसो पंच नमुकारो, सव्य पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसिं,
पाम हवाइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जब सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
(दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चूक
११. पाप-पुण्य २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार ३. जे घडले तोच न्याय
१३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार ४. संघर्ष टाळा
१४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ५. मी कोण आहे ?
१५. मानव धर्म ६. क्रोध
१६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ७. चिंता
१७. सेवा-परोपकार ८. प्रतिक्रमण
१८. दान ९. भावना सुधारे जन्मोजन्म १९. त्रिमंत्र १०. कर्माचे विज्ञान
२०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति
२१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य ४. आत्मबोध
२३. दान ५. मैं कौन हूँ?
२४. मानव धर्म वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ९. टकराव टालिए
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय
२९. क्लेश रहित जीवन ११. चिंता
३०. गुरु-शिष्य १२. क्रोध
३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण
३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ? ३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार
३४. पाप-पुण्य १६. अंत:करण का स्वरूप
३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ?
३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र
३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे. * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो."
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
___ - दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.
पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.
वाचकांना... ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'सेवा-परोपकार' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदुभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय आपले मन-वचन-काया दुसऱ्यांच्या सुखासाठी वापरले तर आपल्या स्वत:च्या जीवनात कधीच सुखाची कमतरता पडणार नाही. आणि स्वतःचे सेल्फ रियलाइजेशन (आत्मसाक्षात्कार) करुन घेतले, तर सनातन सुखाची प्राप्ती होईल. मनुष्य जीवनाचे ध्येय हे एवढेच आहे. या ध्येयाच्या मार्गाने चालायला लागलो तर मनुष्याला जीवनमुक्त दशेचा अनुभव येईल. त्यानंतर मग ह्या जीवनात प्राप्त करण्यासारखे काहीच उरत नाही.
आंब्याचे झाड स्वत:चे किती आंबे खात असेल? त्याची फळे, लाकुड, फांद्या सर्वकाही दुसऱ्यांसाठीच उपयोगी असते ना! त्याचे फळ स्वरूप त्याला उर्ध्वगती प्राप्त होत राहते. धर्माची सुरुवात ऑब्लाइजिंग नेचर(परोपकारी स्वभाव)पासून होते. दुसऱ्याला काहीपण द्याल तेव्हापासूनच स्वतःला आनंद सुरु होतो.
परम पूज्य दादाश्री एकाच वाक्यात म्हणतात की, जी मुले आपल्या आई-वडिलांची सेवा करतात त्यांना कधीच पैश्यांची कमतरता येणार नाही, आणि जे आवश्यक आहे ते सर्व त्यांना मिळत जाईल आणि आत्मसाक्षात्कारी गुरुची सेवा केल्यास मोक्षाला जातो.
दादाश्रींनी स्वत:च्या आयुष्याचे एकच ध्येय ठरविले होते की, मला जो भेटला त्याला सुख मिळायलाच हवे. स्वत:च्या सुखाचा विचार सुद्धा त्यांनी कधी केला नाही. समोरच्या व्यक्तिची काय अडचण आहे आणि ती कोणत्या प्रकारे दूर करता येईल, या भावनेतच ते निरंतर राहिले. आणि तेव्हाच त्यांना कारुण्यता आणि अद्भूत अध्यात्म विज्ञान प्रकट झाले.
प्रस्तुत संकलनामध्ये दादाश्री सर्व दृष्टीकोणातून जीवनाचे ध्येय कशा प्रकारे सिद्ध करावे, की जे सेवा-परोपकारासहित असेल, त्याची समज सरळ-अचूक दृष्टांताद्वारे फिट करुन देतात. जे जीवनात ध्येयरुपाने आत्मसात केले तर मनुष्य जीवनाची सार्थकता झाली असे म्हटले जाईल.
- डो. नीरूबहन अमीन
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
मनुष्य जन्माची विशेषता प्रश्नकर्ता : हा मनुष्य जन्म व्यर्थ न जावो यासाठी काय करावे?
दादाश्री : ‘हा मनुष्य जन्म व्यर्थ न जावो' याचेच संपूर्ण दिवस चिंतन केले तर ते सफळ होईल. या मनुष्य जन्माची चिंता करायला हवी तिथे लोक लक्ष्मीची (पैश्यांची) चिंता करतात! प्रयत्न करणे हे तुमच्या हातात नाही परंतु भाव हे तुमच्या हातात आहे. प्रयत्न करणे हे दुसऱ्याच्या सत्तेत आहे. भावाचे फळ येते. खरे पाहिले तर भाव सुद्धा परसत्ताच आहे, पण भाव केला तर त्याचे फळ येतेच.
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्माची विशेषता काय आहे?
दादाश्री : मनुष्य जीवन परोपकारासाठी आहे आणि हिन्दुस्तानातील मनुष्याचे जीवन अॅब्सॉल्युटिझम' साठी आहे, मुक्ती साठी आहे. हिन्दुस्ताना शिवाय बाहेर अन्य देशांमधील जे जीवन आहे ते परोपकारासाठी आहे. परोपकार म्हणजे मनाचा वापर दुसऱ्यांसाठी करणे, वाणी सुद्धा दुसऱ्यांसाठीच वापरणे आणि वर्तन हे सुद्धा दुसऱ्यांसाठीच वापरणे! मन-वचन-कायेने परोपकार करावे. तेव्हा म्हणाल की, मग माझे काय होणार? त्याने परोपकार केला तर त्याच्या घरात काय राहील?
प्रश्नकर्ता : लाभ तर मिळेलच ना!
दादाश्री : हो, पण लोकं तर हेच मानतात ना की, मी दिले तर माझे जात राहील.
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
प्रश्नकर्ता : खालच्या वर्गाची माणसे असतील ते असे मानतील. दादाश्री : उच्च वर्गाचा माणूस असे मानतो की परक्यांना देऊ शकतो.
जीवन परोपकारासाठी याचे गुह्य सायन्स असे आहे की, जर मन-वचन-काया परोपकारासाठी वापरली तर तुमच्याजवळ प्रत्येक वस्तु असेल. परोपकारासाठी वापरले तर आणि जर फी घेऊन केले तर?
प्रश्नकर्ता : त्रास होईल.
दादाश्री : कोर्टात फी घेतात, शंभर रुपये लागतील, दिडशे रुपये लागतील. तेव्हा म्हणेल की, 'साहेब, दिडशे घ्या.' परंतु परोपकाराचा कायदा तर लागणार नाही ना!
प्रश्नकर्ता : पोटात आग लागली असेल तर असे म्हणावेच लागते ना?
दादाश्री : पोटात आग लागली आहे असा विचार करुच नका. कोणत्याही प्रकारचे परोपकार कराल ना तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आता लोकांचे काय होते? तर अर्धवट समजून करायला जातात त्यामुळे उलटाच 'इफेक्ट' (परिणाम) येतो. म्हणून मग मनात श्रद्धा बसत नाही, उडून जाते. आजपासून परोपकार करायला लागेल तेव्हा दोन-तीन जन्मानंतर सर्व काही नीट होईल. हेच 'सायन्स' आहे.
चांगल्या-वाईटासाठी परोपकार एक सारखाच प्रश्नकर्ता : मनुष्य चांगल्यासाठी परोपकारी जीवन जगतो. लोकांना सांगतो देखील, परंतु तो जो भल्यासाठी सांगतो त्याला लोक 'माझ्या स्वतःच्या भल्यासाठीच सांगत आहे,' हे समजून घ्यायलाच तयार नसतात, त्याचे काय?
दादाश्री : असे आहे, की परोपकार करणारा समोरच्याची समज कशी आहे हे पाहत नाही. जर परोपकार करणाऱ्याने समोरच्याची समज
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
पाहिली तर ती वकीली म्हटली जाईल. यामुळे समोरच्याची समज काय आहे हे पहायचेच नसते.
ही झाडे आहेत ना सगळी, आंबा आहे, निंब आहे या सगळ्या झाडांवर फळं येतात. तेव्हा आंब्याचे झाड स्वतःच्या किती कैऱ्या खात असेल?
प्रश्नकर्ता : एक सुद्धा नाही.
दादाश्री : कोणासाठी आहेत हे ? प्रश्नकर्ता : दुसऱ्यांसाठी.
दादाश्री : हो, तेव्हा ते झाड असे बघते का, की हा लबाड आहे की चांगला आहे ? जो घेऊन जाईल त्याची, माझी नाही. झाड तर परोपकारी जीवन जगतात. असे जीवन जगताना त्या जीवांची हळूहळू उर्ध्वगती होते.
प्रश्नकर्ता : पण अनेकदा असे होते की ज्यांच्यावर उपकार केले जातात ती व्यक्ति उपकार करणाऱ्यावरच दोषारोपण करतांना दिसते.
दादाश्री : हो, तेच तर बघायचे आहे ना? जो उपकार करतो ना, त्याच्यावर सुद्धा अपकार करतो.
प्रश्नकर्ता : समज नसल्यामुळे.
दादाश्री : ही समज तो कुठून आणणार? समज असेल तर कामच होईल ना! अशी समज आणणार?
परोपकार तर फारच उच्च स्थिती आहे. परोपकारी जीवन, हेच, संपूर्ण मनुष्य जीवनाचे ध्येय आहे.
आयुष्यात, महत्वाची कार्य ही दोनच आणि दुसरे या हिंदुस्तानात मनुष्याचा जन्म कशासाठी आहे ?
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
स्वत:चे हे बंधन, कायमचे बंधन तुटावे या हेतुसाठी आहे, 'अॅब्सोल्यूट' होण्यासाठी आहे. आणि जर तुला 'अॅब्सोल्यूट' होण्याचे ज्ञान प्राप्त झाले नाही, तर तु दुसऱ्यांसाठी जगायला शिक. ही दोनच कार्य करण्यासाठी हिन्दुस्तानात जन्म आहे. ही दोन कार्य लोकं करत असतील? लोकांनी तर भेसळ करुन मनुष्यातून जनावरात जाण्याची कला शोधून काढली आहे.
सरळतेचे उपाय प्रश्नकर्ता : जीवन सात्विक आणि सरळ बनविण्यासाठी कोणते उपाय आहेत?
दादाश्री : तुझ्याजवळ जे आहे ते ओब्लाईजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) करुन इतरांना देत जा. तर आपणहूनच जीवन सात्विक बनत जाईल. ओब्लाइजिंग नेचर केले होतेस का तू? तुला ओब्लाइजिंग नेचर आवडतो का?
प्रश्नकर्ता : काही प्रमाणात केलेले!
दादाश्री : ते जास्त प्रमाणात करशील तर जास्त फायदा मिळेल. परोपकार करत रहावे. कोणाला काही हवे असेल तर आणून द्यावे, कोणी दुःखी असेल तर त्यांना दोन कपडे शिवून द्यावे या प्रकारे उपकार करत रहायचे.
भगवंत म्हणतात की, मन-वचन-काया आणि आत्म्याचा (प्रतिष्ठित आत्म्याच्या) उपयोग दुसऱ्यांसाठी कर. आणि मग जर तुला काहीही दुःख आलेच तर मला सांग.
धर्माची सुरुवातच 'ओब्लाइजिंग नेचर' ने होते. तुम्ही तुमच्या घरातील वस्तु दुसऱ्यांना दिल्या, त्यातच आनंद आहे. तेव्हा लोकं तर घ्यायचे शिकतात! तुम्ही तुमच्यासाठी काहीच करु नका. लोकांसाठीच करत राहा, मग स्वतःसाठी काहीच करावे लागणार नाही.
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
भावात तर शंभर टक्के कोणतेही झाड स्वत:ची फळे खातो? नाही. म्हणजे ही झाडे मनुष्याला उपदेश देतात, की तुम्ही तुमची फळे इतरांना द्या. तुम्हाला निसर्ग देईल. निंब कडु लागला तरी लोकं त्याला लावतातच कारण त्याचे इतरही लाभ आहेत, नाहीतर ते रोपटे उपटूनच टाकतील. परंतु ते दुसऱ्याप्रकारे लाभदायी आहे. ते गारवा देते, त्याचे औषध हितकारी आहे, त्याचा रस हितकारी आहे. सत्युगात लोकं समोरच्या व्यक्तिला सुख देण्याचाच प्रयोग करायचे. संपूर्ण दिवस 'कोणाला ओब्लाइज करावे' ह्याच्याच विचार त्यांना येत असे.
बाहेरुन कमी प्रमाणात झाले तर हरकत नाही, पण आतून आपला भाव तर असलाच पाहिजे की माझ्याजवळ पैसे आहेत, तर मला इतरांचे दुःख कमी करायचे आहे. माझ्याजवळ अक्कल असेल तर कोणाची समजूत काढून पण त्याचे दु:ख कमी करायचे आहे. स्वतः जवळ जी शिल्लक असेल त्याच्याने मदत करणे. किंवा ओब्लाइजिंग नेचर तरी ठेवायलाच हवे. ओब्लाइजिंग नेचर म्हणजे काय? दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव!
ओब्लाइजिंग नेचर असेल तर स्वभावही तितकाच चांगला असतो. फक्त पैसे देणे म्हणजे ओब्लाइजिंग नेचर, असे नाही. पैसे तर आपल्याजवळ असतील किंवा नसतीलही, परंतु आपली भावना, आपली इच्छा अशीच असायला हवी की कोणाला कशाप्रकारे मदत करु! आपल्या घरी कोणी आले असेल तर त्याला कोणती मदत करता येईल, अशीच भावना असायला हवी. पैसे देणे किंवा नाही देणे हे तुमच्या शक्तीनुसार आहे.
केवळ पैश्यानेच ओब्लाइज करता येते असे काही नाही. ते तर देणाऱ्याच्या शक्तीवर निर्भर असते. फक्त मनापासून भावना असायला हवी की, कशाप्रकारे 'ओब्लाइज' करता येईल. हीच भावना सतत राहिल एवढेच बघायचे.
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
जीवनाचे ध्येय असे काही हवे जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचवेल. ध्येयविरहीत जीवनाचा काहीच अर्थ नाही. डॉलर (पैसा) येतात आणि खाऊन-पिऊन मजा करतात, आणि दिवसभर चिंता-वरीज करत राहतात. याला जीवनाचे ध्येय कसे म्हटले जाईल? मनुष्यपणा व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानतंर आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी काय करायला हवे? संसारिक सुख पाहिजे असेल, भौतिक सुख पाहिजे असेल तर तुमच्याजवळ जे काही असेल ते इतरांना द्या. कोणत्याही प्रकारे लोकांना सुख दिले तर तुम्ही सुखाची अपेक्षा करु शकता. नाहीतर तुम्हाला सुख मिळणार नाही. आणि जर दुःख दिले तर तुम्हाला दुःखच मिळेल.
___ या जगाचा नियम एकाच वाक्यात समजून घ्या, या जगातील सर्व धर्माचे सार हेच आहे की जर मनुष्याला सुख हवे असेल तर इतर जीवांना सुख द्या आणि दु:ख हवे असेल तर दुःख द्या. तुम्हाला जे अनुकूल असेल ते द्या. आता कोणी म्हणेल की, आम्ही लोकांना कशाप्रकारे सुख देऊ शकतो? आमच्याजवळ तर पैसे नाहीत. तेव्हा पैश्यांनीच मदत केली जाईल असे काही नाही. त्याच्यासोबत ओब्लाइजिंग नेचर ठेवू शकता. त्याला हवे असेल ते आणून देऊ शकता, सल्ला देऊ शकता, अशा अनेक प्रकारे तुम्ही ओब्लाइज करु शकता.
धर्म म्हणजे देवाच्या मूर्तीजवळ बसून राहणे, याला धर्म म्हणत नाहीत. धर्म म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे, याचे नाव धर्म आहे. त्याचबरोबर एकाग्रतेसाठी आपण काही साधना करु, ती वेगळी गोष्ट आहे. याच्यात जर एकाग्रता केली तर सर्व एकाग्रच आहे. ओब्लाइजिंग नेचर ठेवा, नक्की करा की आता मला इतरांना ओब्लाइज करायचेच आहे, तर तुमच्यात परिवर्तन होणार. नक्की करा की मला वाइल्डनेस (जंगलीपणा) करायचे नाही.
समोरचा जंगली झाला तरी मला जंगली व्हायचे नाही, तर मग
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा - परोपकार
असे होऊ शकते, नाही का ? असा निश्चय केला तर थोडे-थोडे परिवर्तन होईल की नाही ?
प्रश्नकर्ता : अवघड आहे पण.
दादाश्री : नाही, अवघड आहे पण नक्की करा ना. कारण तुम्ही मनुष्य आहात आणि भारत देशाचे मनुष्य आहात. असे तसे थोडेच आहात ? ऋषीमुनीचे पुत्र आहात तुम्ही, भरपूर शक्ती आहे तुमच्याकडे. जी झाकली गेली आहे ती तुम्हाला कशी उपयोगी पडेल ? जर तुम्ही माझ्या सांगण्या प्रमाणे निश्चय कराल की मला हे करायचेच आहे, तर ते अवश्य फळेल. कुठपर्यंत असा जंगलीपणा करत राहणार ? आणि त्यात तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. वाईल्डनेसमध्ये सुख मिळते का ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : उलट दुःखालाच आमंत्रण देता. परोपकारा सोबत पुण्य
7
जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत फक्त पुण्यच मित्रासारखे काम करते आणि पाप शत्रूसारखे काम करते. आता तुम्हाला शत्रू ठेवायचा आहे की मित्र ठेवायचा आहे ? हे तुम्हाला जे आवडेल त्या प्रमाणे तुम्ही नक्की करा. आणि मित्राचा संयोग कसा होईल ते विचारुन घ्या, आणि शत्रूचा संयोग कसा जाईल ते ही विचारा. जर तुम्हाला शत्रू पसंत असेल तर त्याचा संयोग कसा प्राप्त होईल हे जर विचारले तर आम्ही तुम्हाला सांगू की वाटेल ते करा, हवे तर कर्ज काढून सुद्धा तूप खा, वाटेल तेथे भटका आणि तुम्हाला आवडेल ती मौज करा. मग पुढची गोष्ट पुढे ! आणि पुण्यरुपी मित्र घ्वा असेल तर आम्ही सांगू की, भाऊ, या झाडांपासून शिक. कोणतेही झाड स्वतः चे फळ खातो का ? कोणतेही गुलाबाचे रोपटे स्वत:चे फुल खात असेल का ? थोडेसे तरी खात असेल, नाही का ? आपण नसताना रात्री खात असेल, नाही ? नाही खात ?
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
8
सेवा - परोपकार
प्रश्नकर्ता : नाही खात.
दादाश्री : ही झाडं - पाने तर मनुष्याला फळ देण्यासाठी मनुष्यांच्या सेवेत आहेत. यात झाडांना काय मिळते ? त्यांची उर्ध्वगती होते आणि मनुष्य त्यांची मदत घेऊन पुढे जातात ! असे माना, की आपण आंबा खाल्ला त्यात आंबाच्या झाडाचे काय गेले? आणि आपल्याला काय मिळाले ? आपण आंबा खाल्ला, म्हणून आपल्याला आनंद झाला. त्यामुळे आपली जी वृत्ती बदलली, त्यामुळे आपण शंभर रुपयां इतके अध्यात्माचे कमावले. आता आंबा खाल्ला, म्हणून त्यातून पाच टक्के आंब्याच्या झाडाला आपल्या वाट्यातून जातात आणि पंच्याण्णव टक्के आपल्या वाट्यात येतात, ते लोक आपल्या वाट्यातून पाच टक्के घेतात आणि बिचारे उच्चगतीला जातात आणि आपलीही अधोगती होत नाही, तर आपण सुद्धा पुढे जातो. म्हणूनच ही झाडे सांगतात की आमचे सर्व काही उपभोगा. प्रत्येक प्रकारची फळे-फुले उपभोगा.
योग उपयोग परोपकाराय
हा संसार आपल्याला साजेसा असेल, संसार जर आपल्याला आवडत असेल, संसारी चीज वस्तूंची इच्छा असेल, संसारी विषयांची कामना असेल तर इतके करा, की 'योग उपयोग परोपकाराय'. योग म्हणजे मन-वचनकायेचा योग आणि उपयोग म्हणजे बुद्धिचा उपयोग करायचा, मनाचा उपयोग करायचा, चित्ताचा उपयोग करायचा या सर्वांचा उपयोग इतरांसाठी करायचा आणि इतरांसाठी उपयोग नाही केला तर शेवटी आपली लोकं घरच्यांसाठी वापरतातच ना ! या कुत्रिला खायला का मिळते ? ह्या पिल्लांच्या आत भगवंत राहिले आहेत. त्या पिल्लांची ती सेवा करते म्हणून तिला सर्व मिळत आहे. याच आधारावर सर्व जग चालत आहे. या झाडाला आहार कुठून मिळतो? या झाडांनी काही पुरुषार्थ केला आहे ? ते तर जरा सुद्धा इमोशनल होत नाहीत. ते कधी इमोशनल होतात का ? ते तर कधी मागेपुढे देखील होत नाहीत. त्यांना कधीच असे नाही वाटत की इथून एक मैलावर विश्वामित्री नदी आहे तर तेथे जाऊन पाणी पिऊन येऊ.
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
प्रामाणिकता आणि परस्पर 'ओब्लाइजिंग नेचर.' बस एवढेच गरजेचे आहे. परस्पर उपकार करणे, एवढीच मनुष्य जीवनाची मोठी उपलब्धी आहे. या जगात दोन प्रकारच्या लोकांची चिंता मिटते, एक म्हणजे ज्ञानी पुरुष आणि दुसरे परोपकारी व्यक्ति.
परोपकाराची खरी पद्धत प्रश्नकर्ता : या जगात चांगले कृत्य कोणते म्हटले जातील? त्याची व्याख्या काय? हे सांगता येईल का?
दादाश्री : हो. चांगले कृत्य तर ही सर्व झाडे करत आहेत, ती अगदी उत्तम कार्य करत आहेत. परंतु ते स्वतः कर्ताभावात नाहीत. ही झाडे जिवंत आहेत. सर्व झाडे दुसऱ्यांसाठीच आपली फळे देतात. तुम्ही तुमचे फळ दुसऱ्यांना देऊन टाका, तुम्हाला तुमचे फळ मिळत राहिल. तुमचे जे फळ उत्पन्न होतील शारीरिक फळ, मानसिक फळ, वाचिक फळ, 'फ्री ऑफ कॉस्ट' इतरांना देत राहिलात तर तुम्हाला तुमची प्रत्येक वस्तु मिळत जाईल. तुमच्या जीवनावश्यक गरजांमध्ये किंचितमात्र अडचण येणार नाही. आणि जर ती फळे तुम्ही स्वतःच खाऊन टाकली तर मात्र अडचणी येतील. समजा आंब्याच्या झाडाने स्वत:ची फळ स्वत:च खाल्ली तर त्याचा जो कोणी मालक असेल तो काय करेल? त्या झाडाला कापूनच टाकेल ना? त्याचप्रमाणे ही माणसं स्वत:ची फळे स्वत:च खातात, इतकेच नाही, तर वरुन फी सुद्धा मागतात.
एक अर्ज लिहून देण्याचे बावीस रुपये मागतात. ज्या देशात फ्री ऑफ कॉस्ट ( मोफत) वकीली केली जायची, अरे, वरुन स्वतःच्या घरी खाऊ घालून वकीली करायचे, तिथे ही दशा झाली आहे. गावात जर भांडणं झाली, तर गावातील प्रमुख नगरशेठ त्या भांडणाऱ्या दोघांना बोलवायचा. 'भाऊ चंदुलाल, तुम्ही आज साडे दहा वाजता माझ्या घरी या.' आणि नगीनदास, 'तुम्ही सुद्धा त्याचवेळी घरी या.' नगीनदासच्या जागी कोणी मजूर किंवा शेतकरी असेल की जे भांडत असतील तर त्यांना
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
4U
सेवा-परोपकार
सुद्धा घरी बोलवत. दोघांना बसवून समोपचाराने त्यांच्यातील भांडण मिटवत. ज्याचे पैसे फेडायचे असतील त्याला थोडे रोख मिळवून देऊन, बाकीचे हप्ते लावून देत आणि मग दोघांना म्हणत की, 'चला, माझ्या बरोबर जेवायला बसा.' दोघांना खाऊ घालून घरी पाठवत असत! आज आहेत का असे वकील? म्हणून समजून घ्या आणि वेळेनुसार चला. आणि जर स्वत:चे स्वतःसाठीच वापरले तर मृत्युसमयी दःखी व्हाल. बंगला गाडी सोडून जीव जाऊ शकत नाही!
सल्लाचे पैसे त्यांच्याकडून मागत नव्हते. सहमतीने, असे तसे करुन मिटवले जात होते. स्वत:चे दोन हजार काढून देत असत. आणि आता सल्ला घ्यायला गेलो की सल्लाची फी शंभर रुपये घेतात! अरे, 'जैन आहात तुम्ही,' तेव्हा म्हणतात, 'जैन तर आहे पण व्यवसाय करायला हवा की नको आम्ही?' 'साहेब सल्ल्याची सुद्धा फी?' आणि तुम्ही जैन? देवालाही लाजवलेत? वीतरागांनाही लाजवलेत? नो-होऊची फी? हे तर कसले घोळ घातले आहेत?
प्रश्नकर्ता : ही अतिरिक्त बुद्धिची फी, असेच म्हणता येईल ना!
दादाश्री : कारण की बुद्धिचा विरोध नाही. ही बुद्धि विपरीत बुद्धि आहे. स्वत:चेच नुकसान करणारी बुद्धि आहे. विपरित बुद्धि ! देवाने बुद्धिला विरोध केलेला नाही. म्हणतात की, सम्यक बुद्धि सुद्धा असू शकते. ती बुद्धि वाढली तर मनातून चांगले विचार येतात की कोणाकोणाचे काम करु, कोणा-कोणाला मदत करु? कोणा-कोणाला नोकरी नाही त्यांना नोकरी मिळेल असे करु.
ओब्लाइजिंग नेचर प्रश्नकर्ता : आता माझ्या दृष्टीने मी सांगतो की, एखादा कुत्रा आहे तो एखाद्या कबुतराला मारायला आला आणि आपण त्याला वाचवायला गेलो तर माझ्या दृष्टीने आपण ओब्लाईज केले, तर आपण 'व्यवस्थित शक्ती' च्या मार्गात आलो ना?
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
दादाश्री : परंतु ते ओब्लाइज केव्हा होईल? जर त्याचे 'व्यवस्थित' असेल तरच तसे आपल्याकडून होईल, नाहीतर होणारच नाही. आपण ओब्लाइजिंग नेचर ठेवायचा आहे. त्याने सर्व पुण्यच बांधली जातील म्हणून मग दुःख उत्पन्न होण्याचे साधनच उरले नाही. पैश्याद्वारे नाही तर त्याचे काम करुन देऊन, किंवा बुद्धि द्वारे समज देऊन (समजावून) जमेल त्या कोणत्याही मार्गाने ओब्लाइज करावे.
परोपकार, परिणाम लाभच हे जीवन जर परोपकारासाठी जगले जाईल तर तुम्हाला कोणतीही कमतरता राहणार नाही. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतील आणि नुसत्या उड्याच माराल तर एकही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण की अशाने तर तुम्हाला झोपच येणार नाही. या श्रीमंत लोकांना तर झोप येतच नाही. तीन तीन, चार चार दिवस झोपूच शकत नाही, कारण ज्याची त्याची लूटमारच केलेली आहे त्यांनी. ___म्हणून ओब्लाइजिंग नेचर करा की रस्त्याने जाता-जाता शेजारीपाजारी कोणाला विचारुन घ्यावे की भाऊ, मी पोस्ट ऑफिसात जात आहे आपली काही टपाल टाकायची आहे का? असे विचारत जाण्यात काही हरकत आहे? कोणी म्हणेल की, माझा तुझ्यावर विश्वास नाही, तेव्हा म्हणावे, भाऊ, मी पाया पडतो. पण ज्यांना तुमच्यावर विश्वास असेल त्यांची टपाल तर घेऊन जा.
हा तर माझ्या लहानपणापासूनचा गुण होता ते मी सांगतो. ओब्लाइजिंग नेचर आणि पंचवीस वर्षाचा झालो तेव्हा माझे सर्व मित्र मला सुपर ह्यमन म्हणत असत.
ह्यमन (माणूस) कोणाला म्हटले जाईल की जो देतो आणि घेतो, समान भावाने व्यवहार करतो. ज्याने सुख दिले असेल त्याला सुख देतो, दुःख दिले असेल त्याला दुःख देत नाही. असा व्यवहार जो करतो त्याला मनुष्यपणा म्हटले जाते.
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा - परोपकार
म्हणजे जो समोरच्याचे सुख हिरावून घेतो, तो पाशवी वृत्तीचा असतो. जो स्वतः सुख देतो आणि सुख घेतो असा मानवीय व्यवहार करतो म्हणून तो मनुष्यात राहतो आणि जो स्वत:चे सुख दुसऱ्यांना उपभोगण्यासाठी देतो तो देवगतीत जातो, सुपर ह्युमन ! स्वतःचे सुख दुसऱ्यांना, एखाद्या दुःखी माणसला देतो तो देवगतीत जातो.
12
त्यात इगोइजम नोर्मल
प्रश्नकर्ता : परोपकाराबरोबर 'इगोइजम' ( अहंकाराची) ची सोबत असते का ?
दादाश्री : जो परोपकार करतो त्याचा 'इगोइजम' नेहमी नोर्मलच असतो. त्याचा ‘इगोइजम' वास्तविक असतो. आणि जो कोर्टात दिडशे रुपए फी घेऊन इतरांचे काम करतो त्याचा 'इगोइजम' खूप वाढलेला असतो.
या निसर्गाचा नियम काय आहे की तुम्ही तुमची फळे दुसऱ्यांना दिली तर निसर्ग तुम्हाला देईल. हेच गूढ सायन्स आहे. हा परोक्ष धर्म आहे. त्यानंतर प्रत्यक्ष धर्म येतो, आणि शेवटी आत्मधर्म येतो. मनुष्य जीवनाचा हिशोब एवढाच असतो. सार एवढेच की मन-वचन-काया इतरांसाठी उपयोगात आणा.
नवीन ध्येय आजचे, रिएक्शन मागचे
प्रश्नकर्ता : तर परोपकारासाठीच जगले पाहिजे ?
दादाश्री : हो, परोपकारासाठीच जगले पाहिजे. पण आता तुम्ही ही लाइन लगेच बदलली तर तसे केल्याने मागील रिएक्शन येतात, म्हणून मग तुम्ही कंटाळतात आणि वाटते की हे मला अजून सहन करावे लागते. पण थोड्या वेळेपुरतेच तुम्हाला सहन करावे लागेल. त्यानंतर मात्र तुम्हाला कोणतेही दुःख राहणार नाही. पण आता तर नवीन लाइन बांधताय म्हणून मागील रिएक्शन तर येणारच. आजपर्यंत जे उलटे कार्य केले होते त्याचे फळ तर येईलच ना ?
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
13
शेवटी उपकार स्वतःवरच करायचे नेहमी कोणावर तरी उपकार केले असतील, कोणाचा फायदा केला असेल, कोणासाठी जगला असाल तर त्याचा लाभ तुम्हाला होतो, पण तो भौतिक लाभ होतो, आणि त्याचे फळ भौतिक स्वरूपातच मिळते.
प्रश्नकर्ता : कोणावर उपकार करण्यापेक्षा स्वत:वरच उपकार केले तर?
दादाश्री : बस, स्वत:वर उपकार करण्यासाठीच सर्व करायचे आहे. जो स्वत:वर उपकार करेल त्याचे कल्याण होईल. परंतु त्यासाठी त्याला स्वतःला (स्वत:च्या आत्म्याला) जाणून घ्यावे लागेल, तोपर्यंत इतरांवर उपकार करत राहा, त्याचे भौतिक फळ मिळत राहिल. आपल्याला स्वत:ची ओळख होण्यासाठी 'मी कोण आहे' हे जाणून घ्यावे लागेल. वास्तविक आपण स्वतः शुद्धात्मा आहोत. तुम्ही तर आजपर्यंत 'मी चंदुभाऊ आहे' एवढेच जाणत होतात ना की अजून दुसरे काही जाणता? हा 'चकुंभाऊ' तो 'मीच आहे.' असेच म्हणाल. हिचा नवरा आहे, याचा मामा आहे, याचा काका आहे, अशी सर्व घटमाळ! असेच आहे ना? हेच ज्ञान आहे ना तुमच्याकडे ? त्याहून पुढे गेला नाही ना?
मानवसेवा, सामाजिक धर्म | प्रश्नकर्ता : पण व्यवहारात असे होते ना की कोणासाठी दयाभाव राहतो, सेवा राहते, कोणासाठी भावना राहते की काहीतरी करावे. कोणाला तरी नोकरी मिळवून द्यावी, आजारी व्यक्तिला होस्पिटलमध्ये भरती करावे म्हणजे ह्या सर्व क्रिया एक प्रकारे व्यवहार धर्मच झाला ना?
दादाश्री : ही सर्व सामान्य कर्तव्ये आहेत.
प्रश्नकर्ता : तर मानवसेवा ही एक प्रकारे व्यावहारिक झाले असे समजायचे ना? तो तर व्यवहारधर्म झाला ना?
दादाश्री : हा व्यवहार धर्म पण नाही, हा तर समाजधर्म म्हटला जातो. ज्या समाजाला जे अनुकूल असेल ते त्या लोकांना अनुकूल वाटते
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
14
सेवा - परोपकार
आणि तीच सेवा जर कोणत्या दुसऱ्या समाजाला द्यायला गेलात, तर त्यांना ती प्रतिकुल वाटेल. म्हणून व्यवहार धर्म केव्हा म्हटला जातो, की जो सर्वांनाच एकसारखा वाटेल तेव्हाच ! आजपर्यंत तुम्ही जे केले ती समाजसेवा आहे. प्रत्येकाची समाजसेवा वेगवेगळी असते, प्रत्येक समाज वेगळा, तशीच सेवा सुद्धा वेगळी.
लोकसेवा बिगिन्स फ्रोम होम
प्रश्नकर्ता : जे लोक लोकसेवेत आले ते कशा करता आले असतील ?
दादाश्री : त्यांची भावना चांगली. लोकांचे कशा प्रकारे भलं होईल, अशी त्यांची इच्छा ! मनः भाव उत्तम असेल तेव्हाच ना !
लोकांसाठी भावना-मनोभाव की लोकांना कोणतेही दुःख होऊ नये, अशी भावना असते त्यामागे. उच्च भावना आहे ना ! परंतु लोकसेवकांचे मी बघितले आहे की, सेवकांच्या घरी जाऊन विचारले तर त्यांच्या नावाने बोंबा मारत असतात. घराकडे त्यांचे लक्ष्य नसते. म्हणून ती सेवा नाही म्हटली जात. सेवेची सुरुवात घरापासून व्हायला हवी. बिगिन्स फ्रोम होम. नंतर शेजारी. नंतर मग पुढची सेवा. हे तर घरची माणसं त्यांच्याबद्दल तक्रार करत असतात. काय वाटते तुम्हाला ? म्हणून सुरुवात घरापासून व्हायला हवी ना ?
प्रश्नकर्ता : हे भाऊ म्हणतात की, यांच्या बाबतीत घरात कोणाची तक्रार नाही !
दादाश्री : याचा अर्थ असा झाला की ही खरी सेवा आहे. करा जनसेवा, शुद्ध मनाने
प्रश्नकर्ता: लोकसेवा करता करता त्यांच्यात भगवंताचे दर्शन करत सेवा केली तर त्याचे फळ यथार्थ येईल ना ?
दादाश्री : भगवंताचे दर्शन झाले मग तर तो सेवेत पडणारच नाही.
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
कारण एकदा भगवंताचे दर्शन झाल्यावर देवाला कोण सोडेल? लोकसेवा एवढ्यासाठी करायची की भगवंताचे दर्शन होतील. लोकसेवा हृदयापासून व्हायला हवी. हृदयापासून असेल तर सर्वत्र पोहचेल. लोकसेवा आणि प्रसिद्धी दोन्ही एकत्र झाली तर अडचण येईल माणसानां. प्रसिद्धीशिवाय लोकसेवा असेल तर ती खरी. प्रसिद्धी तर मिळेलच म्हणा. परंतु प्रसिद्धीची अपेक्षा नसावी, असे असायला पाहिजे.
लोकं जनसेवा करतील असे नाहीत. हे तर आतमध्ये कीर्तिचा लोभ आहे, मानाचा लोभ आहे, सगळे वेगवेगळे लोभ आहेत ते त्यांच्याकडून करवून घेतात. जनसेवा करणारे लोक कसे असतात? ते अपरिग्रही पुरुष असतात. हे तर सगळे नांव कमविण्यासाठी आहेत. 'हळूहळू कधीतरी मंत्री बन' या अपेक्षेने जनसेवा करतात. दानत चोर आहे म्हणून जर बाहेरच्या अडचणी, व्यर्थ परिग्रह हे सर्व बंध केले तर सर्वकाही ठीक होईल. येथे तर एका बाजूने परिग्रही, संपूर्ण परिग्रही रहायचे आणि दुसऱ्या बाजूने जनसेवा करायची. हे दोन्ही कसे शक्य आहे ?
प्रश्नकर्ता : सध्या तर मी मानवसेवा करत आहे. घरो-घरी भीख मागून मी गरिबांना देतो. एवढे मी करतो सध्या.
दादाश्री : ते सर्व तुमच्या वही खात्यात जमा होईल. तुम्ही जे देतात ना... नाही, नाही तुम्ही जे त्या दोघांमध्ये करता, त्याची रक्कम काढली जाईल. अकरा पटीने रक्कम करुन, मग त्याची जी दलाली आहे, ती तुम्हाला मिळेल. पुढच्या जन्मी दलाली मिळेल आणि त्याची तुम्हाला शांती राहील. हे चांगले काम करता म्हणून शांती राहते आणि भविष्यातही राहील. हे काम चांगले आहे.
बाकी, सेवा तर त्यास म्हणावी की तू काम करत असशील पण मला ते माहित सुद्धा पडणार नाही, त्याला सेवा म्हणतात, मूक सेवा. माहित पडते ती सेवा म्हटली जात नाही.
सुरतमधील एका गावात आम्ही गेलो होतो. एक माणूस म्हणाला,
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
16
सेवा - परोपकार
'मला समाजसेवा करायची आहे.' मी विचारले, 'तु कोणती समाजसेवा करणार?' तेव्हा तो म्हणाला, 'श्रीमंत लोकांकडून पैसे आणून लोकांमधे वाटतो.' मी विचारले, 'वाटल्यानंतर माहित पडते की ते कसे खर्च होतात ?' तेव्हा तो म्हणतो, 'ते आपल्याला बघण्याची काय गरज आहे ?' नंतर त्याला समजावले की, 'भाऊ, मी तुला मार्ग दाखवितो, त्याप्रमाणे कर. श्रीमंत लोकांकडून पैसे आणतोस त्यातून त्याला शंभर रुपयांची हातगाडी घेऊन दे. ती हातगाडी असते ना, दोन चाकांची. ती शंभर-दीडशे किंवा दोनशेची गाडी घेऊन दे आणि पन्नास रुपये आणखी दे आणि सांग की, 'तू भाज्या घेऊन त्या विकून रोज संध्याकाळी मला मूळ रक्कम परत देत जा. फायदा तुझा आणि हातगाडीचे एवढे पैसे रोजचे मला देत जा.' यावर तो म्हणाला, 'खूप चांगले वाटले, तुम्ही परत सुरतमध्ये याल तोपर्यंत पन्नास-शंभर लोकांना मी एकत्र करेल. ' म्हणजे असे काही करा ना आता, हातगाड्या वगैरे आणून द्या या गरीब लोकानां, त्यांना काय मोठा व्यवसाय करण्याची गरज आहे का ? एक गाडी तेवढी घेऊन द्याल तर संध्याकाळपर्यंत वीस रुपये कमवतील. तुम्हाला कसे वाटते ? त्यांना असे काहीतरी दिले तर आम्ही पक्के जैन आहोत की नाही? असे आहे, की अगरबत्ती सुद्धा जळता जळता सुगंध देत जळते, नाही का ? पूर्ण खोली सुगंधाने भरुन जाते ना? मग काय आपल्यामुळे सुगंध पसरणारच नाही ?
आपण असे का असावे? मी तर वयाच्या पंचवीस- तिसाव्या वर्षी खूप अहंकार करत होतो आणि तो सुद्धा विचित्र प्रकारचा अहंकार करत होतो, एखादी व्यक्ति मला भेटली आणि त्या व्यक्तिला माझ्याकडून काही फायदा झाला नाही तर माझे भेटणे चुकीचे असायचे. म्हणून प्रत्येक व्यक्तिला माझ्याकडून लाभ प्राप्त झाला प्राप्त होता. मी भेटलो आणि त्याचा जर फायदा झाला नाही, तर माझे भेटणे काय कामाचे ? आंब्याचे झाड काय म्हणते की, मला भेटलात आणि आंब्याचे दिवस आहेत आणि जर समोरच्याला लाभ झाला नाही तर मी आंबाच नाही. मग जरी छोटा तर छोटा, तुला योग्य वाटेल तसा, पण तुला त्याचा लाभ तर होणार ना ! ते आंब्याचे झाड स्वतः कोणताही फायदा घेत नाही. असे काही विचार
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
17
तर आले पाहिजे ना. हे मनुष्यजीवन असे का असावे? हे जर त्यांना समजावले, तर तसे ते सर्व समंजसच आहेत. हे त्याला नीट समजले, आणि त्याने असे केले, मग चालू झाली गाडी. काय वाटते तुम्हाला?
प्रश्नकर्ता : हो तुम्ही सांगत आहात तशी महाजनाची संस्था प्रत्येक ठिकाणी असायची.
दादाश्री : पण आता ते सुद्धा अडचणीत पडले आहेत ना! म्हणजे यात कोणाचाच दोष नाही. जे झाले ते झाले, पण आता अशा विचारांनी सुधारले तर अजूनही सुधरु शकतो आणि बिघडलेल्याला सुधरावयाचे त्याचे नांव धर्म. सुधरलेल्याला सुधरवायला तयारच असतात सर्व, पण बिघडलेल्याला सुधरवणे, याचेच नांव धर्म.
___ मानवसेवा ही प्रभूसेवा? प्रश्नकर्ता : मानवसेवा, ही तर प्रभूसेवा आहे ना!
दादाश्री : नाही, प्रभूसेवा नाही. दुसऱ्यांची सेवा केव्हा करता? तर स्वतःला आतून दुःख वाटते. तुम्हाला कोणत्याही मनुष्याची दया येते, त्याची स्थिती बघून तुम्हाला दु:ख होते आणि त्या दुःखाला मिटविण्यासाठी तुम्ही सेवा करता. अर्थात् हे सर्व आपलेच दु:ख संपविण्यासाठी आहे. एका माणसाला खूप दया येते. तो म्हणतो की, 'मला या लोकांबद्दल दया वाटल्याने त्यांना मी हे दिले, ते दिले...' नाही, अरे, तू तुझे दुःख मिटाविण्यासाठी या लोकांना देतोस. तुम्हाला समजली ही गोष्ट? खूप सूक्ष्म आहे ही गोष्ट. स्थूल गोष्ट नाही ही. स्वतःचे दु:ख मिटवण्यासाठी देत आहे. पण ही चांगली गोष्ट आहे. कोणला तरी द्याल तर तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल.
प्रश्नकर्ता : पण जनता जनार्दनाची सेवा हीच भगवंत सेवा आहे की मग अमूर्ताला मूर्त रुप देऊन पूजा करणे ही आहे ?
दादाश्री : जनता जनार्दनाची सेवा केल्याने आपल्याला संसारातील
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
सर्व सुखं मिळतात, भौतिक सुख आणि हळूहळू , स्टेप बाय स्टेप, मोक्षमार्गाकडे जातो. परंतु प्रत्येक जन्मात असे होत नाही. कुठल्यातरी जन्मात हे संयोग जुळून येतात. बाकी, प्रत्येक जन्मात असे होत नाही. म्हणून ते सिद्धांतरूप नाही.
...कल्याणाच्या श्रेणीच भिन्न समाज कल्याण करणे म्हणजे जगत कल्याण केले असे नाही म्हटले जात. हा तर एक सांसारिक भाव आहे. हे सर्व समाज कल्याण म्हटले जाते. ते ज्याच्याकडून जेवढे होईल तेवढे करतात, ही सर्व स्थूळभाषा म्हटली जाते आणि जग कल्याण करणे ती सूक्ष्म भाषा, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम भाषा आहे! फक्त असे सूक्ष्मतम भावच असतात किंवा मग त्याचे शिंतोडेच असतात.
समाजसेवा प्रकृती स्वभाव समाजसेवेची ज्याला धुंदी चढलेली आहे, ध्यास लागला आहे, म्हणून तो घरात जास्त लक्ष देत नाही आणि बाहेरच्या लोकांची सेवा करण्यात तो गुंतलेला आहे, ती समाजसेवा म्हटली जाते. आणि दुसरे तर स्वतःचे आंतरिक भाव म्हटले जातात. असे भाव स्वत:ला येतच राहतात. कोणासाठी दया येते. कोणासाठी भावना होते आणि असे सगळे स्वत:च्या प्रकृतित आणलेलेच आहे, तरीही शेवटी तर हा प्रकृति धर्मच आहे. समाजसेवा हा सुद्धा प्रकृति धर्म आहे, त्यास प्रकृति स्वभाव म्हणतात की याचा स्वभाव असा आहे, त्याचा स्वभाव असा आहे. कोणाचा दुःख देण्याचा स्वभाव असतो, तर कोणाचा सुख देण्याचा स्वभाव असतो, हे दोन्ही प्रकृति स्वभाव आहेत. आत्मस्वभाव नाही, प्रकृतिमध्ये जसा माल भरलेला आहे तसा त्याचा माल निघत असतो.
सेवा-कुसेवा, प्राकृत स्वभाव तुम्ही जी सेवा करता ती प्रकृति स्वभाव आहे आणि एखादा मनुष्य जो कुसेवा करतो तो सुद्धा प्रकृति स्वभावच आहे. यात आपलाही पुरुषार्थ
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
नाही आणि त्याचाही पुरुषार्थ नाही, परंतु मनातून असे मानता की, 'मी करत आहे.' आता 'मी करत आहे' हीच भ्रांती आहे. येथे 'आत्मज्ञान' दिल्यानंतरही तुम्ही सेवा तर करणारच आहात कारण प्रकृतिच तशी घेऊन आला आहात. परंतु मग ती सेवा शुद्ध सेवा होईल. आता शुभ सेवा होत आहे. शुभसेवा म्हणजे बंधनाची सेवा. सोन्याची बेडी देखील बंधनच आहे ना! आत्मज्ञानानंतर समोरच्या मनुष्याला काहीही झाले, तरी तुम्हाला दुःख होत नाही आणि त्याचे दुःख दूर होते. मग तुम्हाला करुणा राहील. आता तर तुम्हाला दया येते की बिचाऱ्याला किती दुःख होत असेल? किती दुःख होत असेल? त्याची तुम्हाला दया येते. ती दया नेहमी आपल्याला दुःख देते. जेथे दया आहे तेथे अहंकार असतोच. दयाभावाशिवाय प्रकृति सेवा करतच नाही आणि आत्माज्ञानानंतर आपल्याला करुणाभाव राहील.
सेवाभावाचे फळ भौतिक सुख आहे आणि कुसेवाभावाचे फळ भौतिक दुःख आहे. सेवाभावाने स्वत:चे 'मी' सापडत नाही. परंतु जोपर्यंत 'मी' सापडत नाही तोपर्यंत परोपकारी स्वभाव ठेवा.
खरा समाजसेवक तुम्ही कोणाला मदत करता का? प्रश्नकर्ता : समाजाच्या सेवेमध्ये भरपूर वेळ देत असतो.
दादाश्री : समाजसेवा तर अनेक प्रकारची असते. ज्या समाजसेवेत, किंचितमात्र 'समाजसेवक आहे' याचे भान राहत नाही, ती खरी समाजसेवा.
प्रश्नकर्ता : ही गोष्ट बरोबर आहे.
दादाश्री : बाकी, समाजसेवक तर जागो-जागी आणि प्रत्येक विभागात दोन-चार, दोन-चार असतातच. पांढरी टोपी घालून फिरत असतात, समाजसेवक म्हणून. पण जो हे भान विसरेल तो खरा समाजसेवक!
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
20
सेवा-परोपकार
प्रश्नकर्ता : काही चांगले काम केले, तर आत मला अहंकार येतो मी केले म्हणून!
दादाश्री : तो तर येणारच ना. प्रश्नकर्ता : मग ते विसरण्यासाठी काय करावे?
दादाश्री : मी समाजसेवक आहे याचा अहंकार यायला नको, चांगले काम केले की त्याचा अहंकार होतो, तेव्हा एकच करायचे, आपले जे इष्टदेव आहेत किंवा ज्याला तुम्ही मानता त्यांना म्हणावे की, हे भगवंता, मला अहंकार करायचा नाही, तरी पण होत आहे, मला क्षमा करा! एवढेच करायचे, होईल एवढे ?
प्रश्नकर्ता : होईल. दादाश्री : एवढे करा!
समाजसेवेचा अर्थ काय? बऱ्याच प्रमाणात 'माय' तोडून टाकते. 'माय' (माझे) पूर्णपणे संपले तर तो स्वतः परमात्मा आहे. त्याला नंतर सुख मिळतेच!
सेवेत अहंकार प्रश्नकर्ता : तर या जगासाठी आम्हाला काहीच करण्यासारखे रहात नाही का?
दादाश्री : तुम्हाला करायचेच नाही. हा तर अहंकार उभा झालेला आहे. हे मनुष्य एकटेच अहंकार करतात, कर्तापणाचा.
प्रश्नकर्ता : या ताई एक डॉक्टर आहेत. एक गरीब ‘पेशंट' आला, त्याच्यासाठी अनुकंपा येते. ते त्याची सुश्रुषा करतात. आपल्या सांगण्यानुसार अनुकंपा करण्याचा काही प्रश्नच येत नाही ना?
दादाश्री : ती अनुकंपा सुद्धा नैसिर्गिक आहे. पण परत अहंकार
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
करतात की, 'मी कशी अनुकंपा केली!' अहंकार जर केला नाही तर काही हरकत नाही. पण अहंकार केल्याशिवाय राहत नाही!
सेवेमध्ये समपर्णता प्रश्नकर्ता : या जगाच्या सेवेमध्ये परमात्माच्या सेवेचा भाव ठेवून सेवा केली तर ते कर्तव्यामध्ये येते का?
दादाश्री : हो, त्याचे फळ पुण्य मिळते. मोक्ष नाही.
प्रश्नकर्ता : त्याचे श्रेय साक्षात्कारी परमात्म्याला अर्पण केले तरी मोक्ष नाही मिळणार?
दादाश्री : असे फळ कोणाकडूनही अर्पण केले जात नाही. प्रश्नकर्ता : मानसिक समर्पण केले तर? ।
दादाश्री : तसे समर्पण केले तरी कोणीही फळ घेत नाही आणि कोणी देतही नाही. हे तर फक्त बोलण्या पूरते आहे. खरा धर्म तर 'ज्ञानी पुरुष' आत्मा प्रदान करतील तेव्हापासूनच आपोआप चालत राहतो आणि व्यवहार धर्म तर आपल्याला करावा लागतो, शिकावा लागतो.
भौतिक समृद्धी, बाय प्रोडकशनमध्ये
प्रश्नकर्ता : भौतिक समृद्धी प्राप्त करण्याची इच्छा प्रयत्न, आध्यात्मिक विकासात बाधक ठरते का? आणि बाधक असेल तर कशी आणि नसेल तर कशी?
दादाश्री : भौतिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर आपल्याला या दिशेने जावे लागेल, आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर या दुसऱ्या दिशेने जावे लागेल. आपल्याला एका दिशेने जायचे आहे त्यापेक्षा या दुसऱ्या दिशेने गेलो तर बाधक होईल की नाही?
प्रश्नकर्ता : हो ते बाधक म्हटले जाईल!
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
22
सेवा-परोपकार
दादाश्री : अर्थात् संपूर्णपणे बाधक आहे. आध्यात्मिक दिशा ही आहे तर भौतिक दिशा समोरची आहे.
प्रश्नकर्ता : पण भौतिक समृद्धीशिवाय कशा प्रकारे चालेल?
दादाश्री : भौतिक समृद्धी या जगात कोणाची झाली आहे का? सगळे जण भौतिक समृद्धीच्या मागे पडले आहेत. झाली का कोणाची समृद्धी ?
प्रश्नकर्ता : काही जणांचीच होते. सगळयांची नाही होत.
दादाश्री : मनुष्याच्या हाती ती सत्ता नाही, जिथे सत्ता नाही तिथे व्यर्थ बोंबाबोंब कराल याला काही अर्थ आहे का? मिनिंगलेस !
प्रश्नकर्ता : जोपर्यंत त्याची काही कामना आहे तोपर्यंत अध्यात्मात कसा जाऊ शकेल?
दादाश्री : हो, कामना असते ते ठीक आहे. कामना असते पण आपल्या हातात सत्ता नाही.
प्रश्नकर्ता : ही कामना कशा प्रकारे मिटेल?
दादाश्री : त्याच्या कामनेसाठी असे सर्व येतेच मग. तुम्हाला त्यात जास्त डोकेफोडी करायची नाही. आध्यात्मिक करत रहा. ही भौतिक समृद्धी तर बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही आध्यात्मिक प्रॉडक्शन सुरु करा. या दिशेने जा आणि आध्यात्मिक प्रॉडक्शन सुरु करा मग भौतिक समृद्धी, बाय प्रॉडक्ट, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल.
प्रश्नकर्ता : आध्यात्मिक रितीने जायचे असेल, तर काय सांगाल? कोणत्या प्रकारे जायला हवे?
दादाश्री : नाही, पण आधी हे समजते का तुम्हाला की, तुम्ही आध्यात्मिक प्रॉडक्शन केले तर भौतिक हे त्याचे बाय प्रॉडक्ट आहे, हे तुमच्या लक्षात आले का?
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
23
प्रश्नकर्ता : मी असे मानतो की तुम्ही जे सांगत आहात, ते माझ्या लक्षात येत नाही.
दादाश्री : म्हणून मानून घ्या की हे सर्व बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट या संसारातील सर्व विनाशी सुख फ्री ऑफ कॉस्ट मिळालेले आहे. आध्यात्मिक सुख प्राप्त करायला जातो तेव्हा मार्गात हे बाय प्रॉडक्शन मिळाले आहे.
प्रश्नकर्ता : आम्ही असे बरेच लोक पाहिले आहेत की जी लोकं आध्यात्मयात जात नाहीत परंतु भौतिक रुपाने पुष्कळ समृद्ध आहेत आणि त्यात ते सुखी आहेत.
दादाश्री : हो, ते अध्यात्मामध्ये जाताना दिसत नाहीत. परंतु पूर्वी जे अध्यात्म केले होते त्याचे फळ त्यांना आता मिळत आहे.
प्रश्नकर्ता : याचा अर्थ या जन्मात अध्यात्म केले तर पुढच्या जन्मात त्याचे हे भौतिक सुख मिळेल ?
दादाश्री : हो, त्याचे फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. तुम्हाला आज फळ दिसते पण आज तुम्ही अध्यात्मात नसाल सुद्धा.
कार्याचा हेतु सेवा की लक्ष्मी ?
प्रत्येक कार्याचा एक हेतू असतो की कोणत्या हेतूने हे कार्य केले जात आहे! त्यात जर उच्च हेतू नक्की केला, जसे की येथे दवाखाना सुरु करायचा आहे, म्हणजे पेशंटला स्वास्थय कसे प्राप्त होईल, लोकं कसे सुखी होतील, कसे आनंदात राहतील, त्यांची जीवनशक्ती कशी वाढेल, असा आपला उच्च हेतु नक्की केला असेल आणि सेवाभावनेने कामं केली गेली तर त्याचे बाय प्रॉडक्शन काय ? तर लक्ष्मी ! म्हणून लक्ष्मी ही बाय प्रॉडक्ट आहे, त्यास प्रॉडक्शन नाही समजायचे. जगात सर्वांनी लक्ष्मीचेच प्रॉडक्शन केले आहे. म्हणून त्यांना बाय प्रॉडक्शनचा लाभ मिळत नाही.
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
24
सेवा-परोपकार
याकरीता तुम्ही फक्त सेवाभावच नक्की केला तर बाय प्रॉडक्शनमध्ये लक्ष्मी अधिक प्रमाणात येते. म्हणजे लक्ष्मीला बाय प्रॉडक्टमध्येच ठेवली तर लक्ष्मी अधिक येते, परंतु येथे तर लक्ष्मीच्या हेतुनेच लक्ष्मीचे प्रॉडक्शन करतात म्हणून लक्ष्मी येत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की एकच हेतू ठेवा. 'निरंतर सेवाभाव' तर बाय प्रॉडक्ट आपोआप येत राहील. जसे बाय प्रॉडक्टमध्ये कोणतीही मेहनत करावी लागत नाही, खर्च करावा लागत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट मिळते. तसेच ही लक्ष्मी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळत जाते. तुम्हाला अशी लक्ष्मी पाहिजे की ऑनची (वर-खात) लक्ष्मी पाहिजे? ऑनची लक्ष्मी नको ना?! मग ठीक आहे! ती फ्री ऑफ कॉस्ट मिळाली तर किती चांगले!
म्हणून सेवाभाव नक्की करा, मनुष्यमात्रांची सेवा. कारण की आम्ही दवाखाना काढला याचा अर्थ आपल्याला जी विद्या अवगत आहे त्या विद्येचा सेवाभावात उपयोग करणे, हाच आपला हेतु असायला हवा. त्याच्या फळस्वरूप इतर गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळत राहतील. लक्ष्मीची कधीही कमी पडणार नाही. आणि जे केवळ लक्ष्मीसाठीच (पैश्यांसाठीच) करायला गेले, त्यांना तोटा झाला. हो, लक्ष्मीसाठी कारखाना काढला तर ते बाय प्रॉडक्ट राहिलेच नाही ना! कारण लक्ष्मीच बाय प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्शनची! म्हणजे आधी आपल्याला प्रॉडक्शन नक्की करायचे नंतर बाय प्रॉडक्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळत राहील.
जग कल्याण, हेच प्रॉडक्शन आत्मा प्राप्त करण्यासाठी जे केले जाते ते प्रॉडक्शन आहे आणि त्यामुळे बाय प्रॉडक्शन मिळत राहते. सांसारिक सर्व गरजा पूर्ण होत जातात. मी माझे एक प्रकारचे प्रॉडक्शन ठेवलेले आहे, 'हे जग परम शांती प्राप्त करो आणि कित्येक मोक्ष प्राप्त करो.' हे माझे प्रॉडक्शन आणि त्याचे बाय प्रॉडक्शन मला मिळतच राहते. हे चहा-पाणी आम्हाला तुमच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे मिळते त्याचे कारण काय आहे की तुमच्या तुलनेत माझे प्रॉडक्शन उच्च कोटीचे आहे. असेच तुमचे प्रॉडक्शन उच्च
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
____ 25
कोटीचे झाले तर बाय प्रॉडक्शन सुद्धा उच्च कोटीचे येईल. प्रत्येक कार्याचा हेतू असतो. जर सेवाभावाचा हेतू असेल तर लक्ष्मी 'बाय प्रॉडक्ट' मध्ये मिळेलच.
सेवा परोक्ष रुपाने भगवंताची दुसरे सर्व प्रॉडक्शन बाय प्रॉडक्ट आहेत. त्यात आपल्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतात आणि त्या इझीली (सहज)मिळतात. पाहा ना प्रॉडक्शन पैशांचे केले म्हणून तर आज पैसे इझीली मिळत नाही. नुसती पळापळ, धांधरटासारखे फिरतात, जणू चेहऱ्याला एरंडेल तेल लावून फिरत आहेत असे दिसते! घरात सुंदर खाण्या-पिण्याचे आहे, किती सुविधा आहे, रस्ते किती चांगले आहेत, रस्त्यावरुन चाललो तरी पाय धुळीचे होत नाहीत! म्हणून मनुष्यांची सेवा करा. माणसांमध्ये भगवंत विराजमान आहेत. भगवंत आतच बसलेले आहेत. बाहेर भगवंत शोधायला जाल तर मिळतील असे
नाही.
___ तुम्ही मनुष्यांचे डॉक्टर आहात, म्हणून तुम्हाला मनुष्यांची सेवा करायला सांगतो. जनावरांचे डॉक्टर असते तर त्यांना जनावरांची सेवा करायला सांगितली असती. जनावरांमध्ये देखील भगवंत विराजमान आहेत, पण या मनुष्यांमध्ये भगवंत विशेष रुपाने प्रकट झालेले आहेत!
सेवा-परोपकाराहून पुढे मोक्षमार्ग प्रश्नकर्ता : मोक्षमार्ग समाजसेवेच्या मार्गापेक्षा उच्च कसा आहे, हे जरा समजवा.
दादाश्री : समाजसेवकाला आम्ही विचारले की आपण कोण आहात? तर तो म्हणेल, 'मी समाजसेवक आहे.' काय म्हणतो? हेच म्हणतो ना की दुसरे काही?
प्रश्नकर्ता : हेच म्हणतो! दादाश्री : याचा अर्थ 'मी समाजसेवक आहे' असे बोलणे हाच
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
26
सेवा-परोपकार
त्याचा इगोइज़म (अहंकार) आहे. आणि या भाऊला विचारले की, 'तुम्ही कोण आहात?' तर तो म्हणेल, बाहेर ओळखण्यासाठी मी चंदुभाऊ आहे आणि खरोखर तर मी शुद्धात्मा आहे.' तर त्यात इगोइजम नाही. विधाउट इगोइज़म!
समाजसेवकाचा इगो(अहंकार) चांगल्या कार्यासाठी असला तरी आहे तर इगोच. वाईट कार्यासाठी इगो असेल तर 'राक्षस' म्हटला जाईल. चांगल्या कार्यासाठी इगो असेल तर देव म्हटला जातो. इगो म्हणजे इगो. इगो म्हणजे भटकत भटकत रहायचे आणि इगो संपला. मग येथेच मोक्ष होईल.
'मी कोण आहे' हे जाणणे, हाच धर्म प्रश्नकर्ता : प्रत्येक जीवाने काय करायला हवे, त्याचा धर्म काय आहे?
दादाश्री : जे काही करत आहे, तो त्याचाच धर्म आहे. पण आपण म्हणतो की माझा धर्म, इतकेच. त्याचा आपण इगोइज़म करतो, की मी हे केले. म्हणून आता आपण काय करायला हवे की 'मी कोण आहे' हे जाणणे, त्यासाठी प्रयत्न करणे, तर मग सर्व पझल सॉल्व होऊन जातील. नतंर पझल उभे राहणार नाहीत आणि पझल उद्भवलेच नाही म्हणून तो स्वतंत्र व्हायला लागेल.
लक्ष्मी, ती तर बाय प्रॉडक्शनमध्ये प्रश्नकर्ता : प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य मग तो वकील असो किंवा डॉक्टर असो, कर्तव्य तर हेच असते ना की मनुष्यजीवाचे भले करणे?
दादाश्री : हो, पण 'भले करायचे आहे' हा निश्चय केल्याशिवायच करत राहतात. कोणताही डिसिज़न घेत नाही. कोणताही हेतू निश्चित केल्याशिवाय अशीच गाडी चालत राहते. कोणत्या गावी जायचे हे माहिती नाही. कोणत्या गावी उतरायचे याचा ठिकाणा नाही. वाटेत चहा-नाश्टा
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा - परोपकार
कुठे करायचा याचाही ठिकाणा नाही. फक्त, पळतच राहतो. म्हणून सगळा गुंता होत जातो. हेतू निश्चित केल्यानंतर सर्व कार्य करायला पाहिजे.
27
आपल्याला फक्त हेतुच बदलायचा आहे, दुसरे काहीही करायचे नाही. पंपाच्या इंजिनाचा एक पट्टा ह्या बाजूने दिला तर पाणी निघेल आणि त्या बाजूने दिला तर धानमधून तांदूळ निघतील. अर्थात् फक्त पट्टा देण्यातच फरक आहे. हेतू पक्का करायचा आणि तो हेतू कायम लक्षात ठेवायचा. बस, दुसरे काहीच नाही. लक्ष्मीचे लक्ष्य ठेवायचे नाही.
'स्वतःच्या' सेवेत सामावलेत सर्व धर्म
दोनच प्रकारचे धर्म, तिसऱ्या प्रकारचा कोणताही धर्म नाही. ज्या धर्मात जगाची सेवा आहे, तो एक प्रकारचा धर्म आहे आणि जेथे स्वत: ची, आत्म्याची सेवा आहे तो दुसऱ्या प्रकारचा धर्म आहे. स्वतःची सेवा करणारे होम डिपार्टमेन्टमध्ये (आत्म स्वरूपात) येतात आणि जे जगाची सेवा करतात, त्यांना संसारी लाभ मिळतो अथवा भौतिक सुखात मजा करतात. आणि ज्यामध्ये जगाची कोणत्याही प्रकारची सेवा सामवली जात नाही, जेथे स्वत:च्या सेवेचा समावेश होत नाही, ते सर्व एक प्रकारे सामाजिक भाषणे आहेत! आणि स्वतःला भयंकर नशा चढवणारे आहेत. जगाची कोणतीही सेवा होत असेल तर तो धर्म आहे. जगाची सेवा होत नसेल तर स्वतःची सेवा करा. जो स्वतःची सेवा करतो तो जगाची सेवा करणाऱ्यापेक्षाही वरचढ आहे. कारण की स्वतःची सेवा करणारा कोणलाही दुःख देत नाही !
प्रश्नकर्ता : परंतु स्वतःची सेवा करण्याचे सुचले पाहिजे ना ! दादाश्री : ते सुचणे सोपे नाही.
प्रश्नकर्ता : ते कसे करणार ?
दादाश्री : जे स्वत:ची सेवा करतात अशा ज्ञानी पुरुषांना विचारा की, 'साहेब आपण दुसऱ्यांची सेवा करता की स्वतः : ची ?' तेव्हा साहेब
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
सांगतील की, 'आम्ही स्वतःचीच करतो.' तेव्हा आपण त्यांना म्हणायला हवे की 'मलाही असा मार्ग दाखवा!'
'स्वत:च्या' सेवेचे लक्षण प्रश्नकर्ता : स्वत:च्या सेवेचे लक्षण कोणते आहे?
दादाश्री : 'स्वतःची' सेवा म्हणजे कोणालाही दुःख द्यायचे नाही. हे सर्वात पहिले लक्षण. त्यात सर्व गोष्टी येऊन जातात. त्याच्यात अब्रह्मचर्यचेही सेवन करायचे नाही. अब्रह्मचर्याचे सेवन करणे म्हणजे दुसऱ्याला दुःखं देण्यासारखे आहे. जरी राजीखुशीने अब्रह्मचर्य झाले तरी त्यात किती जीव मारले जातात! म्हणून ते दु:ख देण्यासारखे आहे. त्यामुळे सेवाच बंद होऊन जाते. त्यानंतर खोटे बोलायचे नाही, चोरी करायची नाही, हिंसा करायची नाही. धन साठवायचे नाही. परिग्रह करणे, पैसे साठवणे ही हिंसाच आहे. दुसऱ्यांना दु:ख देणे यात सर्व येऊन जाते.
प्रश्नकर्ता : स्वत:च्या सेवेची दुसरी लक्षणे कोण कोणती आहेत? स्वत:ची सेवा करत आहे, असे केव्हा म्हटले जाईल?
दादाश्री : 'स्वत:ची' सेवा करणाऱ्याला भले ही जगातील सगळे जण दुःख देतील, पण तो मात्र कोणालाही दुःख देणार नाही. दुःख तर देत नाही, पण विचार देखील वाईट करत नाही की तुझे वाईट हो! 'तुझे भले हो.' असेच म्हणतो.
हो, तरी पण समोरचा बोलला तरी हरकत नाही. समोरचा बोलला की, तुम्ही नालायक आहात, बदमाश आहात, तुम्ही दुःखं देतात, यात आपल्याला काहीच हरकत नसावी. आपण काय करतो हे बघायचे आहे, समोरचा रेडिओ प्रमाणे बोलतच राहिल, जसा रेडिओ वाजतो तसा!
प्रश्नकर्ता : आयुष्यात सगळे लोक आपल्याला दुःख देतील आणि तरीही आम्ही सहन करु, असे तर होणार नाही. घरातील लोकांनी जरासे जरी अपमानजनक वर्तन केले तरी सहन होत नाही तेव्हा!
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा - परोपकार
दादाश्री : तेव्हा काय कराल ? याच्यात नाही राहणार तर कशात राहाल? हे सांगा मला. हे जे मी सांगतो ती लाईन पसंत पडत नसेल तर त्या व्यक्तिने कशात राहायचे ? सेफसाइड आहे कोणती ? असेल तर दाखवा मला.
प्रश्नकर्ता : नाही असे नाही. पण आपला 'इगो' तर आहेच ना ?
दादाश्री : जन्मापासून सगळ्यानां 'इगो' च अडवतो, पण आपल्याला अडकायचे नाही,' 'इगो' आहे तो वाटेल तसा नाचो पण 'आपल्याला' नाचण्याची गरज नाही आम्ही इगोपेक्षा वेगळे आहोत. याशिवाय सारे धार्मिक मनोरंजन
4
...
29
अर्थात् दोनच धर्म आहेत, तिसरा धर्म नाही. दुसरे तर ओर्नामेन्ट आहे! ओर्नामेन्ट पोर्शन आणि लोकं 'वाह वाह' करतात !
जेथे सेवा नाही, कोणत्याही प्रकारची सेवा नाही, जगाची सेवा नाही, ते सर्व धार्मिक मनोरंजन आहे आणि सर्व ओर्नामेन्टल पोर्शन आहे !
बुद्धिचा धर्म तोपर्यंत स्वीकराला जातो जोपर्यंत बुद्धि सेवाभावी आहे, इतर जीवांना सुख देणारी आहे, अशी बुद्धि असेल तर ती चांगली. बाकी दुसरी बुद्धि बेकार आहे. दुसरी बुद्धि तर उलट बांधणारी आहे, बांधून मार खायला लावते आणि जिथे तिथे फायदा-नुकसान दाखवत राहते. बसमध्ये चढल्यावर आधी बघते की बसायला जागा कुठे आहे ? याप्रमाणे बुद्धि इकडे तिकडे भटकवत राहते. दुसऱ्यांची सेवा करणारी बुद्धि चांगली. नाहीतर स्वतःच्या सेवे सारखी दुसरी कोणतीही बुद्धि नाही ! जो 'स्वत:ची' सेवा करत आहे तो साऱ्या जगाची सेवा करुन राहिला आहे.
जगात कोणालाही दुःख न होवो
म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की भाऊ सकाळी घराच्या बाहेर निघण्याआधी दुसरे काही येत नसेल तर एवढेच म्हणत जा की,
'मन
-
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा - परोपकार
वचन-कायेने या जगातील कोणत्याही जीवाला किंचीतमात्र दुःख न होवो. ' असे पाच वेळा बोलून निघायचे. मग बाकीची जबाबदारी माझी ! जा, दुसरे काही नाही आले तर मी बघेल ! एवढेच बोल ना ! आणि मग कोणाला दुःख झाले, तर ते मी बघेल. पण तू एवढेच बोलायचे. यात काही हरकत आहे ?
30
प्रश्नकर्ता : यात काहीच हरकत नाही.
दादाश्री : हे नक्की म्हणायचे. तेव्हा तो म्हणतो की, 'माझ्याकडून जर दुःख दिले गेले तर ?' ते तुला बघायचे नाही. ते सर्व मी हायकोर्टात करुन घेईल, नंतर ते वकीलाने बघायचे आहे ना ? ते सगळे मी करुन देईल.' तू माझे हे वाक्य बोलत जा ना सकाळी पांच वेळा ! यात काही हरकत आहे? काही कठीन आहे का यात ? मनापासून 'दादा भगवान' यांना आठवून बोला ना, मग काय हरकत आहे ?
प्रश्नकर्ता : आम्ही असेच करतो.
दादाश्री : बस, तेच करायचे. दुसरे काहीच करण्यासारखे नाही या
जगात.
थोडक्यात व्यवहार धर्म
संसारातील लोकांना व्यवहार धर्म शिकण्यासाठी आम्ही सांगतो की परानुग्रही बना. स्वतः साठी विचारच यायला नको. लोक कल्याणसाठी परानुग्रही बना. तू स्वतःसाठी खर्च करशील तर ते गटरात जाईल आणि इतरांसाठी थोडा जरी खर्च करशील तर पुढे अॅडजस्टमेन्ट मिळेल.
शुद्धात्मा भगवान काय म्हणतात की, जो दुसऱ्यांना सांभाळतो त्याला मी सांभाळून घेतो आणि जो स्वतःलाच सांभाळतो, त्याला मी त्याच्यावरच सोडतो.
जगाचे काम करा, आपले काम होत राहील. जगाचे काम कराल तर आपले काम आपोआप होत राहील आणि तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
___31
जगाचे स्वरूप कसे आहे? जगातील जीवमात्रांमध्ये भगवंत राहिलेले आहेत. कोणत्याही जीवाला काहीही त्रास द्याल, दु:खं द्याल तर तो अधर्म होईल. कोणत्याही जीवाला सुख द्याल तर तो धर्म होईल. अधर्माचे फळ आपल्या इच्छेविरुद्ध आहे धर्माचे फळ आपल्या इच्छेनुसार आहे.
'रिलेटिव्ह धर्म' हा संसार मार्ग आहे, समाजसेवेचा मार्ग आहे. मोक्षमार्ग समाजसेवेहून वेगळा आहे, स्व-रमणतेचा आहे.
धर्माची सुरुवात मनुष्याने जेव्हापासून इतरांना सुख द्यायला सुरुवात केली तेव्हापासून धर्माची सुरुवात झाली. स्वतःचे सुख नाही परंतु समोरच्याची अडचण कशी दुर होईल हा विचार असतो तेव्हापासून कारुण्यतेची सुरुवात होते. मला लहानपणापासूनच समोरच्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न असायचा. स्वतःसाठी विचार सुद्धा आले नाहीत, ती कारुण्यता म्हटली जाते. त्यामुळेच 'ज्ञान' प्रकट झाले.
__ रिटायर होण्याच्या वेळेस ओनररी प्रेसिडन्ट होतो. तो ओनररी होतो. अरे वेड्या, जबाबदारी का वाढवून घेतोस? आता रिटायर होत आहे तरीही? संकट उभे करतो. ही सर्व संकटे उभी केलेली आहेत.
समजा सेवा नाही होऊ शकत तर ठीक आहे पण कोणाला दु:ख होणार नाही हे बघायला हवे. भले ही तो नुकसान करुन गेला असेल. कारण तो पूर्वीचा काही हिशोब असेल परंतु आपल्याकडून त्याला दुःख होणार नाही. असेच करायला हवे.
बस, हेच शिकण्यासारखे प्रश्नकर्ता : दुसऱ्यांना सुख देऊन सुखी होणे हे?
दादाश्री : हो, बस, एवढेच शिकायचे ना! दुसरे काही शिकण्यासारखे नाही. जगात दुसरा कोणताही धर्म नाही. हा एवढाच धर्म आहे, दुसरा कोणताच धर्म नाही. इतरांना सुखी करा त्यातच सुखी व्हाल.
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
32
सेवा-परोपकार
तुम्ही जो व्यवसाय-नोकरी करता त्यात काही कमवत असाल तर एखाद्या गावात कुणी दुःखी असेल तर त्याला थोडं धान्य-पाणी द्या. मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम द्या. अशाप्रकारे त्याची गाडी रुळावर आणली पाहिजे! इतरांना आनंद दिला, सुख दिले तर भगवंत आपल्याला आनंद देतील.
ज्ञानी देतील, लेखी गॅरंटी प्रश्नकर्ता : कोणाला आनंद द्यायला गेलो तर खिसा कापला
जातो.
दादाश्री : खिसा भलेही कापला जावो, तो मागचा हिशोब असेल जो आता चुकता होत आहे. पण आता तुम्ही आनंद द्याल तर त्याचे फळ येईलच, याची शंभर टक्के गॅरंटी लेखी देतो. हे आम्ही दिले असेल म्हणून आम्हाला आज सुख मिळत आहे. माझा धंदाच हा असल्याने सुखाचे दुकान काढले. आम्हाला दु:खाची दुकान नाही काढायची. सुखाचे दुकान, मग ज्याला जे पाहिजे ते सुख घेऊन जा आणि कोणी दुःख द्यायला आले तर आम्ही म्हणू. ओहोहो, अजून बाकी आहे माझे, आणा, आणा. त्यास आम्ही एकीकडे ठेवून देऊ. अर्थात् दुःख देण्यासाठी आले तर घेऊन टाकायचे. आमचा हिशोब आहे म्हणून द्यायला तर येणारच ना? नाहीतर मला कोणी दु:खं द्यायला आले नसते.
सुखाचे दुकान असे खोला की बस, सगळ्यांना सुखच द्यायचे दु:खं कोणलाही द्यायचे नाही आणि दुःख देणाऱ्याला तर कधीतरी कोणी चाकू मारतो ना? तो वाट बघत बसलेला असतो. ही जी वैराची वसुली करतात, ते असेच वैर वसूल करत नाहीत, दु:खाचा बदला घेतात.
सेवा कराल तर सेवा मिळेल या जगात सर्व प्रथम सेवा करण्यासाठी योग्य साधन आहेत ते आई-वडील.
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
__33
आई-वडीलांची सेवा केली तर शांती जात नाही. परंतु आज मनापासून आई-वडीलांची सेवा केली जात नाही. तीस वर्षांचा झाला की 'गुरु' (पत्नी) येते. ती म्हणते की, मला नवीन घरात घेऊन जा. गुरु पाहिलेत का तुम्ही? पंचवीस-तिसाव्या वर्षी 'गुरु' मिळतात आणी 'गुरु' मिळाले की सर्व बदलून जाते. गुरु म्हणते की, आईला तुम्ही ओळखतच नाही, पहिल्यांदा तर तो तिचा ऐकत नाही, पण मग दोन-तीनदा सांगितल्यावर तो रुळ बदलतो.
बाकी, आई-वडीलांची शुद्ध सेवा केली तर, त्याला अशांती होत नाही, असे हे जग आहे. हे जग काही काढून टाकण्यासारखे नाही. तेव्हा लोकं असे विचारतात ना, की यात मुलांचाच दोष ना की ते आई-वडीलांची सेवा करत नाहीत, त्यात आई-वडीलांचा काय दोष? मी म्हटले की, त्यांनी त्यांच्या आई-वडीलांची सेवा केली नाही, म्हणून त्यांना सेवा प्राप्त झाली नाही. अर्थात् हा वारसाच खोटा आहे. त्यापेक्षा आता नव्याने वारसाच्या रुपात चालले तरच चांगले होईल.
मी प्रत्येक घर असे बनवत आहे की जिथे मुलं सर्व ऑलराइट झाली आहेत. आई-वडीलही ऑलराइट आणि मुलंही ऑलराइट!
वडीलधाऱ्यांची सेवा केल्याने आपले विज्ञान उमलत जाते. मूर्तिची सेवा केली जाते का? मूर्तिचे काय पाय दुखतात! सेवा तर पालक, वडीलधारी माणसे किंवा गुरु असतील त्यांची सेवा करायलाच हवी.
सेवेचा तिरस्कार करुन धर्म होतो? आई-वडीलांची सेवा करणे हा धर्म आहे, तो हिशोब कसाही असला तरीही सेवा करणे हा आपला धर्म आहे. जेवढे आपल्या धर्माचे पालन करु तेवढे सुख आपल्याला मिळत जाईल. वृद्धांची सेवा तर होतेच त्याचबरोबर सुखही मिळत जाते. आई-वडीलांना सुखी ठेवले तर आपण सुखी होतो. आई-वडीलांना सुखी ठेवणाऱ्या मुलांना कधीच दुःख येत नाही.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
34
सेवा-परोपकार
एक भाऊ मला एका मोठ्या आश्रमात भेटले. मी विचारले, 'तुम्ही येथे कुठे?' त्यावर तो म्हणाला, 'मी या आश्रमात गेल्या दहा वर्षांपासून राहत आहे.' तेव्हा मी त्याला म्हटले, 'गावात तुमचे आई-वडील उतार वयात खूप गरिबीत, दुःखात जगत आहेत.' त्यावर तो म्हणाला,' त्यात मी काय करु? मी त्यांचे करायला गेलो तर माझा धर्म करायचा राहून जाईल.' याला धर्म कसे म्हणणार? धर्म करणे म्हणजे आई-वडीलांना, भावांना सगळ्यांना धरुन चालणे, त्यांची विचारपुस करणे, आदर्श व्यवहार असायला हवा. जो व्यवहार स्वतःच्या धर्माचा तिरस्कार करतो, आईवडीलांच्या नात्याचा तिरस्कार करतो त्याला धर्म कसे म्हणणार?
तुमचे आई-वडील आहेत की नाही? प्रश्नकर्ता : आई आहे.
दादाश्री : आता चांगली सेवा करा. वारंवार संधी मिळणार नाही आणि कोणी म्हणेल की, 'मी दुःखी आहे.' तर मी त्याला सांगेल की तुझ्या आई-वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा कर, तर संसारातील दु:खं तुला येणार नाहीत. भले श्रीमंत होणार नाही, पण दुःखीही होणार नाही. नंतर धर्म असावा. याला धर्म कसे म्हणणार?
मी सुद्धा आईची सेवा केली होती. तेव्हा मी वीस वर्षाचा अर्थात् तरुणच होतो, म्हणून आईची सेवा करु शकलो. वडिलांना खांदा दिला होता तेवढीच सेवा झाली होती. मग विचार केला की अरे, असे तर कितीतरी वडील होऊन गेलेत, आता काय करणार? तेव्हा उत्तर मिळाले, जे आहेत त्यांची सेवा कर. जे गेले ते गेले त्यांची चिंता करु नकोस. सगळे खूप झाले. चूकलात तेथून परत मोजा. आई-वडिलांची सेवा प्रत्यक्ष रोख आहे. भगवंत दिसत नाहीत, हे तर दिसतात. भगवंत कुठे दिसतात? आई-वडील तर दिसतात.
खरी आवश्यकता वृद्धांच्या सेवेची आता जर सगळ्यात जास्त कोणी दुःखी असतील, तर ते साठपासठ वयाचे वृद्ध खूप दुःखी आहेत. पण ते कोणाला सांगतील? मुलं
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
35
ऐकत नाहीत. दोघांमध्ये खूप दरी निर्माण झाली आहे, जुना काळ आणि नवीन काळ. जुने लोक जुना काळ सोडत नाहीत. मार खातील पण तरीही सोडणार नाहीत.
प्रश्नकर्ता : पासष्ठाव्या वर्षी प्रत्येकाची हीच स्थिती राहते ना?
दादाश्री : हो, अशीच स्थिती, तेच हाल. खरोखर करण्यासारखे काय आहे या काळात? तर एखाद्या ठिकाणी वृद्धांना राहण्यासाठी ठिकाण बनविले तर खूप चांगली गोष्ट होईल. म्हणून आम्ही विचार केला होता. मी सांगितले की, असे काही करायचे असेल तर आधी त्यांना हे ज्ञान द्यायला हवे. नंतर त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था तर लोकांना किंवा अन्य सामाजिक संस्थेला सोपवून दिली तरी चालेल. पण आधी हे ज्ञान दिले असेल तर दर्शन करत राहिले तरी काम चालेल. आणि हे 'ज्ञान' दिले तर शांती राहील बिचाऱ्यांना, नाहीतर कोणत्या आधारावर शांती राहील? तुम्हाला कसे वाटते?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे. दादाश्री : पसंत पडेल अशी गोष्ट आहे की नाही?
वृद्धावस्था आणि साठ-पासष्ट वयाची व्यक्ति असेल आणि घरात राहत असेल, घरातील कोणीही त्यांना गृहीत धरत नसतील तर मग काय होईल? कोणाला काही बोलू शकत नाही आणि मनातच उलटे विचार करुन कर्म बांधून घेईल. म्हणून या लोकांनी जी वृद्धाश्रमाची व्यवस्था केली आहे ती व्यवस्था चुकीची नाही, हेल्पिंग आहे. पण त्यासाठी वृद्धाश्रम नाही, तर खूप सन्मान सूचक शब्द असावा. असा शब्द जो सन्माननीय वाटेल.
सेवेने जीवनात सुख-संपती प्रथम आई-वडीलांची सेवा, ज्यांनी जन्म दिला त्यांची. नंतर गुरुची सेवा. गुरु आणि आई-वडीलांची सेवा तर अवश्य केली पाहिजे. गुरु जर चांगले नसतील तर ती सेवा सोडायला हवी.
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
36
सेवा-परोपकार
प्रश्नकर्ता : आता जे आई-वडीलांची सेवा करत नाहीत, त्यांचे काय? त्यांना कोणती गती मिळेल?
दादाश्री : आई-वडिलांची सेवा जे करत नाहीत ते या जन्मात सुखी होत नाहीत. आई-वडीलांची सेवा करण्याचे प्रत्यक्ष उदाहरण काय? तर म्हणावे की, साऱ्या आयुष्यात त्यांना दु:ख येत नाही. आई-वडीलांची सेवा केल्याने अडचणीही येत नाहीत!
आपल्या हिंदुस्तानाचे विज्ञान खूप सुंदर होते. म्हणून तर शास्त्रकारांनी सांगितले आहे की आई-वडिलांची सेवा करा. ज्यामुळे आपल्या आयुष्यात कधीच पैशांचे दुःख येणार नाही. आता ते न्यायसंगत आहे की नाही, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आई-वडीलांची सेवा अवश्य करायलाच हवी. कारण जर तुम्ही सेवा केली नाही, तर तुम्हाला कोणाकडून सेवा मिळेल? तुमची येणारी पिढी कशी शिकेल की तुम्ही सेवा करण्यासाठी लायक आहात. मुलं सगळं बघत असतात. ते बघतील की आपल्या वडिलांनी कधी स्वत:च्या वडिलांची सेवा केली नाही! तेव्हा मग मुलांवर तसे संस्कार पडणारच नाही ना!
प्रश्नकर्ता : माझे म्हणणे असे होते की मुलांचे वडिलांसाठी कर्तव्य काय आहे?
दादाश्री : मुलांनी वडिलांसाठी कर्तव्य निभावले पाहिजेत. आणि मुलाने जर कर्तव्य निभावले तर त्याला काय फायदा होईल? आईवडिलांची सेवा जो मुलगा करेल त्याला कधीच पैशांची कमी राहणार नाही. त्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील आणि जो गुरुची सेवा करेल त्याला मोक्ष मिळेल पण आजची पिढी आई-वडील किंवा गुरुची सेवा करतच नाही? ते सगळे जण दुःखी होणार आहेत.
महान उपकारी आई-वडील जो मनुष्य आई-वडिलांचे दोष बघतो त्याच्यात कधीच बरकत येत
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
सेवा-परोपकार
___37
नाही. कदाचित श्रीमंत बनेल पण त्याची आध्यात्मिक उन्नती होत नाही. आई-वडिलांचे दोष बघायला नको. उपकार तर कधीच विसरायला नको. कोणी चहा पाजला असेल तर त्याचे उपकार जर आपण विसरत नाही, मग आपण आई-वडिलांचे उपकार का विसरतो? तुला समजले? हं.. अर्थात् खुप उपकार मानायला हवेत. खूप सेवा करायला हवी. आईवडिलांची खूप सेवा करायला हवी. ___या जगात तिघांचे महान उपकार आहेत. त्या उपकारांना कधीच विसरायचे नाही.आई-वडिल आणि गुरुचे! आपल्याला ज्यांनी योग्य मार्गावर चालायला शिकविले, ह्या तिघांचे उपकार कधीच विसरायला नको.
'ज्ञानी'च्या सेवेचे फळ आपले सेव्यपद गुप्त ठेवून सेवकभावात राहून आपण काम करायला पाहिजे. 'ज्ञानी पुरुष' तर साऱ्या 'जगा'चे सेवक आणि सेव्य म्हटले जातात. साऱ्या जगाची सेवा पण 'मी' च करतो आणि साऱ्या जगाची सेवाही 'मी' घेतो. हे जर तुला समजले तर तुझे काम झाले.
'आम्ही' इतकीच जबाबदारी घेतो की कोणी मनुष्य आम्हाला भेटायला आला, तर त्याला 'दर्शना'चा लाभ प्राप्त व्हायलाच हवा. 'आमची' सेवा कोणी केली तर त्याची जबाबदारी आमच्यावर येते आणि आम्हाला त्याला मोक्षाला घेऊनच जावे लागते.
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
नऊ कलमे १. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र
पण अहम् दुभावणार (दुखावणार) नाही, दुभाविला जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार नाही अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन
करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावणार
नाही, दुभावले जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची
परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी किंवा
आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. ४. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति किंचितमात्र
पण अभाव, तिरस्कार कधीही केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याशी कधीही कठोर
भाषा, तंतीली (टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची किंवा बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा
बोलण्याची परम शक्ति द्या. ६. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणताही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचितमात्र पण विषयविकार संबंधी दोष, इच्छा, चेष्टा-चाळे किंवा विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी ___ शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा प्रत्यक्ष किंवा
परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा का प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम
शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. (एवढेच तुम्ही दादा भगवान यांच्याजवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली (यंत्रवत्) वाचण्याची वस्तु नाही, अंतरात ठेवण्याची वस्तु आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावना करण्याची वस्तु आहे. एवढ्या पाठात सर्व शास्त्रांचे सार येऊन जाते.)
__ प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्तिद्या
** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे.
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज,
जि.-गांधीनगर, गुजरात - 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर,
सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा
जि.-पंचमहाल. फोन : 9723707738 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड.
फोन : 9737048322 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, जि.-मोरबी,
फोन : 9924341188 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ, सीनोग्रा गाँव,
ता.-अंजार. फोन : 9924346622 मुंबई : 9323528901
दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230
चेन्नई : 9380159957 जयपुर : 8290333699
भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433
भिलाई : 9827481336 पटना : 7352723132
अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099
हैदराबाद : 9885058771 पूणे : 7218473468
जालंधर : 9814063043 U.S.A. : +1877-505-DADA (3232) UAE
: +971 557316937 U.K. : +44 330-111-DADA (3232) Singapore : +65 81129229 Kenya : +254 722722063
Australia : +61421127947
New Zealand : +64 210376434 Website : www.dadabhagwan.org
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________ सेवेचे फळ... जगाचे काम करत राहा, तुमचे काम आपोआप होत राहिल. जगाचे काम कराल तेव्हा तुमचे काम आपोआप होत राहिल आणि तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मनुष्याने जेव्हापासून दुसऱ्यांस सुख देण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच धर्माची सुरुवात झाली. स्वत:चे सुख नाही, परंतु समोरच्याची अडचण कशी दूर होईल असेच वाटत राहते, तेव्हापासूनच कारुण्यतेची सुरुवात होते. आम्हाला लहानपणापासूनच समोरच्याची अडचण दूर करण्याची तळमळ होती. स्वतःसाठी विचार सुद्धा येत नाही हीच कारुण्यता आहे. त्यामुळेच'ज्ञान' प्रकट होते. -दादाश्री Printed in India Price 10 dadabhagwan.org