________________
सेवा-परोपकार
नाही आणि त्याचाही पुरुषार्थ नाही, परंतु मनातून असे मानता की, 'मी करत आहे.' आता 'मी करत आहे' हीच भ्रांती आहे. येथे 'आत्मज्ञान' दिल्यानंतरही तुम्ही सेवा तर करणारच आहात कारण प्रकृतिच तशी घेऊन आला आहात. परंतु मग ती सेवा शुद्ध सेवा होईल. आता शुभ सेवा होत आहे. शुभसेवा म्हणजे बंधनाची सेवा. सोन्याची बेडी देखील बंधनच आहे ना! आत्मज्ञानानंतर समोरच्या मनुष्याला काहीही झाले, तरी तुम्हाला दुःख होत नाही आणि त्याचे दुःख दूर होते. मग तुम्हाला करुणा राहील. आता तर तुम्हाला दया येते की बिचाऱ्याला किती दुःख होत असेल? किती दुःख होत असेल? त्याची तुम्हाला दया येते. ती दया नेहमी आपल्याला दुःख देते. जेथे दया आहे तेथे अहंकार असतोच. दयाभावाशिवाय प्रकृति सेवा करतच नाही आणि आत्माज्ञानानंतर आपल्याला करुणाभाव राहील.
सेवाभावाचे फळ भौतिक सुख आहे आणि कुसेवाभावाचे फळ भौतिक दुःख आहे. सेवाभावाने स्वत:चे 'मी' सापडत नाही. परंतु जोपर्यंत 'मी' सापडत नाही तोपर्यंत परोपकारी स्वभाव ठेवा.
खरा समाजसेवक तुम्ही कोणाला मदत करता का? प्रश्नकर्ता : समाजाच्या सेवेमध्ये भरपूर वेळ देत असतो.
दादाश्री : समाजसेवा तर अनेक प्रकारची असते. ज्या समाजसेवेत, किंचितमात्र 'समाजसेवक आहे' याचे भान राहत नाही, ती खरी समाजसेवा.
प्रश्नकर्ता : ही गोष्ट बरोबर आहे.
दादाश्री : बाकी, समाजसेवक तर जागो-जागी आणि प्रत्येक विभागात दोन-चार, दोन-चार असतातच. पांढरी टोपी घालून फिरत असतात, समाजसेवक म्हणून. पण जो हे भान विसरेल तो खरा समाजसेवक!