________________
14
सेवा - परोपकार
आणि तीच सेवा जर कोणत्या दुसऱ्या समाजाला द्यायला गेलात, तर त्यांना ती प्रतिकुल वाटेल. म्हणून व्यवहार धर्म केव्हा म्हटला जातो, की जो सर्वांनाच एकसारखा वाटेल तेव्हाच ! आजपर्यंत तुम्ही जे केले ती समाजसेवा आहे. प्रत्येकाची समाजसेवा वेगवेगळी असते, प्रत्येक समाज वेगळा, तशीच सेवा सुद्धा वेगळी.
लोकसेवा बिगिन्स फ्रोम होम
प्रश्नकर्ता : जे लोक लोकसेवेत आले ते कशा करता आले असतील ?
दादाश्री : त्यांची भावना चांगली. लोकांचे कशा प्रकारे भलं होईल, अशी त्यांची इच्छा ! मनः भाव उत्तम असेल तेव्हाच ना !
लोकांसाठी भावना-मनोभाव की लोकांना कोणतेही दुःख होऊ नये, अशी भावना असते त्यामागे. उच्च भावना आहे ना ! परंतु लोकसेवकांचे मी बघितले आहे की, सेवकांच्या घरी जाऊन विचारले तर त्यांच्या नावाने बोंबा मारत असतात. घराकडे त्यांचे लक्ष्य नसते. म्हणून ती सेवा नाही म्हटली जात. सेवेची सुरुवात घरापासून व्हायला हवी. बिगिन्स फ्रोम होम. नंतर शेजारी. नंतर मग पुढची सेवा. हे तर घरची माणसं त्यांच्याबद्दल तक्रार करत असतात. काय वाटते तुम्हाला ? म्हणून सुरुवात घरापासून व्हायला हवी ना ?
प्रश्नकर्ता : हे भाऊ म्हणतात की, यांच्या बाबतीत घरात कोणाची तक्रार नाही !
दादाश्री : याचा अर्थ असा झाला की ही खरी सेवा आहे. करा जनसेवा, शुद्ध मनाने
प्रश्नकर्ता: लोकसेवा करता करता त्यांच्यात भगवंताचे दर्शन करत सेवा केली तर त्याचे फळ यथार्थ येईल ना ?
दादाश्री : भगवंताचे दर्शन झाले मग तर तो सेवेत पडणारच नाही.