________________
सेवा-परोपकार
__33
आई-वडीलांची सेवा केली तर शांती जात नाही. परंतु आज मनापासून आई-वडीलांची सेवा केली जात नाही. तीस वर्षांचा झाला की 'गुरु' (पत्नी) येते. ती म्हणते की, मला नवीन घरात घेऊन जा. गुरु पाहिलेत का तुम्ही? पंचवीस-तिसाव्या वर्षी 'गुरु' मिळतात आणी 'गुरु' मिळाले की सर्व बदलून जाते. गुरु म्हणते की, आईला तुम्ही ओळखतच नाही, पहिल्यांदा तर तो तिचा ऐकत नाही, पण मग दोन-तीनदा सांगितल्यावर तो रुळ बदलतो.
बाकी, आई-वडीलांची शुद्ध सेवा केली तर, त्याला अशांती होत नाही, असे हे जग आहे. हे जग काही काढून टाकण्यासारखे नाही. तेव्हा लोकं असे विचारतात ना, की यात मुलांचाच दोष ना की ते आई-वडीलांची सेवा करत नाहीत, त्यात आई-वडीलांचा काय दोष? मी म्हटले की, त्यांनी त्यांच्या आई-वडीलांची सेवा केली नाही, म्हणून त्यांना सेवा प्राप्त झाली नाही. अर्थात् हा वारसाच खोटा आहे. त्यापेक्षा आता नव्याने वारसाच्या रुपात चालले तरच चांगले होईल.
मी प्रत्येक घर असे बनवत आहे की जिथे मुलं सर्व ऑलराइट झाली आहेत. आई-वडीलही ऑलराइट आणि मुलंही ऑलराइट!
वडीलधाऱ्यांची सेवा केल्याने आपले विज्ञान उमलत जाते. मूर्तिची सेवा केली जाते का? मूर्तिचे काय पाय दुखतात! सेवा तर पालक, वडीलधारी माणसे किंवा गुरु असतील त्यांची सेवा करायलाच हवी.
सेवेचा तिरस्कार करुन धर्म होतो? आई-वडीलांची सेवा करणे हा धर्म आहे, तो हिशोब कसाही असला तरीही सेवा करणे हा आपला धर्म आहे. जेवढे आपल्या धर्माचे पालन करु तेवढे सुख आपल्याला मिळत जाईल. वृद्धांची सेवा तर होतेच त्याचबरोबर सुखही मिळत जाते. आई-वडीलांना सुखी ठेवले तर आपण सुखी होतो. आई-वडीलांना सुखी ठेवणाऱ्या मुलांना कधीच दुःख येत नाही.