________________
32
सेवा-परोपकार
तुम्ही जो व्यवसाय-नोकरी करता त्यात काही कमवत असाल तर एखाद्या गावात कुणी दुःखी असेल तर त्याला थोडं धान्य-पाणी द्या. मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम द्या. अशाप्रकारे त्याची गाडी रुळावर आणली पाहिजे! इतरांना आनंद दिला, सुख दिले तर भगवंत आपल्याला आनंद देतील.
ज्ञानी देतील, लेखी गॅरंटी प्रश्नकर्ता : कोणाला आनंद द्यायला गेलो तर खिसा कापला
जातो.
दादाश्री : खिसा भलेही कापला जावो, तो मागचा हिशोब असेल जो आता चुकता होत आहे. पण आता तुम्ही आनंद द्याल तर त्याचे फळ येईलच, याची शंभर टक्के गॅरंटी लेखी देतो. हे आम्ही दिले असेल म्हणून आम्हाला आज सुख मिळत आहे. माझा धंदाच हा असल्याने सुखाचे दुकान काढले. आम्हाला दु:खाची दुकान नाही काढायची. सुखाचे दुकान, मग ज्याला जे पाहिजे ते सुख घेऊन जा आणि कोणी दुःख द्यायला आले तर आम्ही म्हणू. ओहोहो, अजून बाकी आहे माझे, आणा, आणा. त्यास आम्ही एकीकडे ठेवून देऊ. अर्थात् दुःख देण्यासाठी आले तर घेऊन टाकायचे. आमचा हिशोब आहे म्हणून द्यायला तर येणारच ना? नाहीतर मला कोणी दु:खं द्यायला आले नसते.
सुखाचे दुकान असे खोला की बस, सगळ्यांना सुखच द्यायचे दु:खं कोणलाही द्यायचे नाही आणि दुःख देणाऱ्याला तर कधीतरी कोणी चाकू मारतो ना? तो वाट बघत बसलेला असतो. ही जी वैराची वसुली करतात, ते असेच वैर वसूल करत नाहीत, दु:खाचा बदला घेतात.
सेवा कराल तर सेवा मिळेल या जगात सर्व प्रथम सेवा करण्यासाठी योग्य साधन आहेत ते आई-वडील.