________________
सेवा-परोपकार
प्रामाणिकता आणि परस्पर 'ओब्लाइजिंग नेचर.' बस एवढेच गरजेचे आहे. परस्पर उपकार करणे, एवढीच मनुष्य जीवनाची मोठी उपलब्धी आहे. या जगात दोन प्रकारच्या लोकांची चिंता मिटते, एक म्हणजे ज्ञानी पुरुष आणि दुसरे परोपकारी व्यक्ति.
परोपकाराची खरी पद्धत प्रश्नकर्ता : या जगात चांगले कृत्य कोणते म्हटले जातील? त्याची व्याख्या काय? हे सांगता येईल का?
दादाश्री : हो. चांगले कृत्य तर ही सर्व झाडे करत आहेत, ती अगदी उत्तम कार्य करत आहेत. परंतु ते स्वतः कर्ताभावात नाहीत. ही झाडे जिवंत आहेत. सर्व झाडे दुसऱ्यांसाठीच आपली फळे देतात. तुम्ही तुमचे फळ दुसऱ्यांना देऊन टाका, तुम्हाला तुमचे फळ मिळत राहिल. तुमचे जे फळ उत्पन्न होतील शारीरिक फळ, मानसिक फळ, वाचिक फळ, 'फ्री ऑफ कॉस्ट' इतरांना देत राहिलात तर तुम्हाला तुमची प्रत्येक वस्तु मिळत जाईल. तुमच्या जीवनावश्यक गरजांमध्ये किंचितमात्र अडचण येणार नाही. आणि जर ती फळे तुम्ही स्वतःच खाऊन टाकली तर मात्र अडचणी येतील. समजा आंब्याच्या झाडाने स्वत:ची फळ स्वत:च खाल्ली तर त्याचा जो कोणी मालक असेल तो काय करेल? त्या झाडाला कापूनच टाकेल ना? त्याचप्रमाणे ही माणसं स्वत:ची फळे स्वत:च खातात, इतकेच नाही, तर वरुन फी सुद्धा मागतात.
एक अर्ज लिहून देण्याचे बावीस रुपये मागतात. ज्या देशात फ्री ऑफ कॉस्ट ( मोफत) वकीली केली जायची, अरे, वरुन स्वतःच्या घरी खाऊ घालून वकीली करायचे, तिथे ही दशा झाली आहे. गावात जर भांडणं झाली, तर गावातील प्रमुख नगरशेठ त्या भांडणाऱ्या दोघांना बोलवायचा. 'भाऊ चंदुलाल, तुम्ही आज साडे दहा वाजता माझ्या घरी या.' आणि नगीनदास, 'तुम्ही सुद्धा त्याचवेळी घरी या.' नगीनदासच्या जागी कोणी मजूर किंवा शेतकरी असेल की जे भांडत असतील तर त्यांना