________________
8
सेवा - परोपकार
प्रश्नकर्ता : नाही खात.
दादाश्री : ही झाडं - पाने तर मनुष्याला फळ देण्यासाठी मनुष्यांच्या सेवेत आहेत. यात झाडांना काय मिळते ? त्यांची उर्ध्वगती होते आणि मनुष्य त्यांची मदत घेऊन पुढे जातात ! असे माना, की आपण आंबा खाल्ला त्यात आंबाच्या झाडाचे काय गेले? आणि आपल्याला काय मिळाले ? आपण आंबा खाल्ला, म्हणून आपल्याला आनंद झाला. त्यामुळे आपली जी वृत्ती बदलली, त्यामुळे आपण शंभर रुपयां इतके अध्यात्माचे कमावले. आता आंबा खाल्ला, म्हणून त्यातून पाच टक्के आंब्याच्या झाडाला आपल्या वाट्यातून जातात आणि पंच्याण्णव टक्के आपल्या वाट्यात येतात, ते लोक आपल्या वाट्यातून पाच टक्के घेतात आणि बिचारे उच्चगतीला जातात आणि आपलीही अधोगती होत नाही, तर आपण सुद्धा पुढे जातो. म्हणूनच ही झाडे सांगतात की आमचे सर्व काही उपभोगा. प्रत्येक प्रकारची फळे-फुले उपभोगा.
योग उपयोग परोपकाराय
हा संसार आपल्याला साजेसा असेल, संसार जर आपल्याला आवडत असेल, संसारी चीज वस्तूंची इच्छा असेल, संसारी विषयांची कामना असेल तर इतके करा, की 'योग उपयोग परोपकाराय'. योग म्हणजे मन-वचनकायेचा योग आणि उपयोग म्हणजे बुद्धिचा उपयोग करायचा, मनाचा उपयोग करायचा, चित्ताचा उपयोग करायचा या सर्वांचा उपयोग इतरांसाठी करायचा आणि इतरांसाठी उपयोग नाही केला तर शेवटी आपली लोकं घरच्यांसाठी वापरतातच ना ! या कुत्रिला खायला का मिळते ? ह्या पिल्लांच्या आत भगवंत राहिले आहेत. त्या पिल्लांची ती सेवा करते म्हणून तिला सर्व मिळत आहे. याच आधारावर सर्व जग चालत आहे. या झाडाला आहार कुठून मिळतो? या झाडांनी काही पुरुषार्थ केला आहे ? ते तर जरा सुद्धा इमोशनल होत नाहीत. ते कधी इमोशनल होतात का ? ते तर कधी मागेपुढे देखील होत नाहीत. त्यांना कधीच असे नाही वाटत की इथून एक मैलावर विश्वामित्री नदी आहे तर तेथे जाऊन पाणी पिऊन येऊ.