________________
सेवा - परोपकार
असे होऊ शकते, नाही का ? असा निश्चय केला तर थोडे-थोडे परिवर्तन होईल की नाही ?
प्रश्नकर्ता : अवघड आहे पण.
दादाश्री : नाही, अवघड आहे पण नक्की करा ना. कारण तुम्ही मनुष्य आहात आणि भारत देशाचे मनुष्य आहात. असे तसे थोडेच आहात ? ऋषीमुनीचे पुत्र आहात तुम्ही, भरपूर शक्ती आहे तुमच्याकडे. जी झाकली गेली आहे ती तुम्हाला कशी उपयोगी पडेल ? जर तुम्ही माझ्या सांगण्या प्रमाणे निश्चय कराल की मला हे करायचेच आहे, तर ते अवश्य फळेल. कुठपर्यंत असा जंगलीपणा करत राहणार ? आणि त्यात तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. वाईल्डनेसमध्ये सुख मिळते का ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : उलट दुःखालाच आमंत्रण देता. परोपकारा सोबत पुण्य
7
जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत फक्त पुण्यच मित्रासारखे काम करते आणि पाप शत्रूसारखे काम करते. आता तुम्हाला शत्रू ठेवायचा आहे की मित्र ठेवायचा आहे ? हे तुम्हाला जे आवडेल त्या प्रमाणे तुम्ही नक्की करा. आणि मित्राचा संयोग कसा होईल ते विचारुन घ्या, आणि शत्रूचा संयोग कसा जाईल ते ही विचारा. जर तुम्हाला शत्रू पसंत असेल तर त्याचा संयोग कसा प्राप्त होईल हे जर विचारले तर आम्ही तुम्हाला सांगू की वाटेल ते करा, हवे तर कर्ज काढून सुद्धा तूप खा, वाटेल तेथे भटका आणि तुम्हाला आवडेल ती मौज करा. मग पुढची गोष्ट पुढे ! आणि पुण्यरुपी मित्र घ्वा असेल तर आम्ही सांगू की, भाऊ, या झाडांपासून शिक. कोणतेही झाड स्वतः चे फळ खातो का ? कोणतेही गुलाबाचे रोपटे स्वत:चे फुल खात असेल का ? थोडेसे तरी खात असेल, नाही का ? आपण नसताना रात्री खात असेल, नाही ? नाही खात ?