________________
सेवा-परोपकार
23
प्रश्नकर्ता : मी असे मानतो की तुम्ही जे सांगत आहात, ते माझ्या लक्षात येत नाही.
दादाश्री : म्हणून मानून घ्या की हे सर्व बाय प्रॉडक्ट आहे. बाय प्रॉडक्ट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट या संसारातील सर्व विनाशी सुख फ्री ऑफ कॉस्ट मिळालेले आहे. आध्यात्मिक सुख प्राप्त करायला जातो तेव्हा मार्गात हे बाय प्रॉडक्शन मिळाले आहे.
प्रश्नकर्ता : आम्ही असे बरेच लोक पाहिले आहेत की जी लोकं आध्यात्मयात जात नाहीत परंतु भौतिक रुपाने पुष्कळ समृद्ध आहेत आणि त्यात ते सुखी आहेत.
दादाश्री : हो, ते अध्यात्मामध्ये जाताना दिसत नाहीत. परंतु पूर्वी जे अध्यात्म केले होते त्याचे फळ त्यांना आता मिळत आहे.
प्रश्नकर्ता : याचा अर्थ या जन्मात अध्यात्म केले तर पुढच्या जन्मात त्याचे हे भौतिक सुख मिळेल ?
दादाश्री : हो, त्याचे फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. तुम्हाला आज फळ दिसते पण आज तुम्ही अध्यात्मात नसाल सुद्धा.
कार्याचा हेतु सेवा की लक्ष्मी ?
प्रत्येक कार्याचा एक हेतू असतो की कोणत्या हेतूने हे कार्य केले जात आहे! त्यात जर उच्च हेतू नक्की केला, जसे की येथे दवाखाना सुरु करायचा आहे, म्हणजे पेशंटला स्वास्थय कसे प्राप्त होईल, लोकं कसे सुखी होतील, कसे आनंदात राहतील, त्यांची जीवनशक्ती कशी वाढेल, असा आपला उच्च हेतु नक्की केला असेल आणि सेवाभावनेने कामं केली गेली तर त्याचे बाय प्रॉडक्शन काय ? तर लक्ष्मी ! म्हणून लक्ष्मी ही बाय प्रॉडक्ट आहे, त्यास प्रॉडक्शन नाही समजायचे. जगात सर्वांनी लक्ष्मीचेच प्रॉडक्शन केले आहे. म्हणून त्यांना बाय प्रॉडक्शनचा लाभ मिळत नाही.