________________
22
सेवा-परोपकार
दादाश्री : अर्थात् संपूर्णपणे बाधक आहे. आध्यात्मिक दिशा ही आहे तर भौतिक दिशा समोरची आहे.
प्रश्नकर्ता : पण भौतिक समृद्धीशिवाय कशा प्रकारे चालेल?
दादाश्री : भौतिक समृद्धी या जगात कोणाची झाली आहे का? सगळे जण भौतिक समृद्धीच्या मागे पडले आहेत. झाली का कोणाची समृद्धी ?
प्रश्नकर्ता : काही जणांचीच होते. सगळयांची नाही होत.
दादाश्री : मनुष्याच्या हाती ती सत्ता नाही, जिथे सत्ता नाही तिथे व्यर्थ बोंबाबोंब कराल याला काही अर्थ आहे का? मिनिंगलेस !
प्रश्नकर्ता : जोपर्यंत त्याची काही कामना आहे तोपर्यंत अध्यात्मात कसा जाऊ शकेल?
दादाश्री : हो, कामना असते ते ठीक आहे. कामना असते पण आपल्या हातात सत्ता नाही.
प्रश्नकर्ता : ही कामना कशा प्रकारे मिटेल?
दादाश्री : त्याच्या कामनेसाठी असे सर्व येतेच मग. तुम्हाला त्यात जास्त डोकेफोडी करायची नाही. आध्यात्मिक करत रहा. ही भौतिक समृद्धी तर बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही आध्यात्मिक प्रॉडक्शन सुरु करा. या दिशेने जा आणि आध्यात्मिक प्रॉडक्शन सुरु करा मग भौतिक समृद्धी, बाय प्रॉडक्ट, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल.
प्रश्नकर्ता : आध्यात्मिक रितीने जायचे असेल, तर काय सांगाल? कोणत्या प्रकारे जायला हवे?
दादाश्री : नाही, पण आधी हे समजते का तुम्हाला की, तुम्ही आध्यात्मिक प्रॉडक्शन केले तर भौतिक हे त्याचे बाय प्रॉडक्ट आहे, हे तुमच्या लक्षात आले का?