________________
सेवा-परोपकार
करतात की, 'मी कशी अनुकंपा केली!' अहंकार जर केला नाही तर काही हरकत नाही. पण अहंकार केल्याशिवाय राहत नाही!
सेवेमध्ये समपर्णता प्रश्नकर्ता : या जगाच्या सेवेमध्ये परमात्माच्या सेवेचा भाव ठेवून सेवा केली तर ते कर्तव्यामध्ये येते का?
दादाश्री : हो, त्याचे फळ पुण्य मिळते. मोक्ष नाही.
प्रश्नकर्ता : त्याचे श्रेय साक्षात्कारी परमात्म्याला अर्पण केले तरी मोक्ष नाही मिळणार?
दादाश्री : असे फळ कोणाकडूनही अर्पण केले जात नाही. प्रश्नकर्ता : मानसिक समर्पण केले तर? ।
दादाश्री : तसे समर्पण केले तरी कोणीही फळ घेत नाही आणि कोणी देतही नाही. हे तर फक्त बोलण्या पूरते आहे. खरा धर्म तर 'ज्ञानी पुरुष' आत्मा प्रदान करतील तेव्हापासूनच आपोआप चालत राहतो आणि व्यवहार धर्म तर आपल्याला करावा लागतो, शिकावा लागतो.
भौतिक समृद्धी, बाय प्रोडकशनमध्ये
प्रश्नकर्ता : भौतिक समृद्धी प्राप्त करण्याची इच्छा प्रयत्न, आध्यात्मिक विकासात बाधक ठरते का? आणि बाधक असेल तर कशी आणि नसेल तर कशी?
दादाश्री : भौतिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर आपल्याला या दिशेने जावे लागेल, आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर या दुसऱ्या दिशेने जावे लागेल. आपल्याला एका दिशेने जायचे आहे त्यापेक्षा या दुसऱ्या दिशेने गेलो तर बाधक होईल की नाही?
प्रश्नकर्ता : हो ते बाधक म्हटले जाईल!