________________
सेवा - परोपकार
वचन-कायेने या जगातील कोणत्याही जीवाला किंचीतमात्र दुःख न होवो. ' असे पाच वेळा बोलून निघायचे. मग बाकीची जबाबदारी माझी ! जा, दुसरे काही नाही आले तर मी बघेल ! एवढेच बोल ना ! आणि मग कोणाला दुःख झाले, तर ते मी बघेल. पण तू एवढेच बोलायचे. यात काही हरकत आहे ?
30
प्रश्नकर्ता : यात काहीच हरकत नाही.
दादाश्री : हे नक्की म्हणायचे. तेव्हा तो म्हणतो की, 'माझ्याकडून जर दुःख दिले गेले तर ?' ते तुला बघायचे नाही. ते सर्व मी हायकोर्टात करुन घेईल, नंतर ते वकीलाने बघायचे आहे ना ? ते सगळे मी करुन देईल.' तू माझे हे वाक्य बोलत जा ना सकाळी पांच वेळा ! यात काही हरकत आहे? काही कठीन आहे का यात ? मनापासून 'दादा भगवान' यांना आठवून बोला ना, मग काय हरकत आहे ?
प्रश्नकर्ता : आम्ही असेच करतो.
दादाश्री : बस, तेच करायचे. दुसरे काहीच करण्यासारखे नाही या
जगात.
थोडक्यात व्यवहार धर्म
संसारातील लोकांना व्यवहार धर्म शिकण्यासाठी आम्ही सांगतो की परानुग्रही बना. स्वतः साठी विचारच यायला नको. लोक कल्याणसाठी परानुग्रही बना. तू स्वतःसाठी खर्च करशील तर ते गटरात जाईल आणि इतरांसाठी थोडा जरी खर्च करशील तर पुढे अॅडजस्टमेन्ट मिळेल.
शुद्धात्मा भगवान काय म्हणतात की, जो दुसऱ्यांना सांभाळतो त्याला मी सांभाळून घेतो आणि जो स्वतःलाच सांभाळतो, त्याला मी त्याच्यावरच सोडतो.
जगाचे काम करा, आपले काम होत राहील. जगाचे काम कराल तर आपले काम आपोआप होत राहील आणि तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल.