________________
36
सेवा-परोपकार
प्रश्नकर्ता : आता जे आई-वडीलांची सेवा करत नाहीत, त्यांचे काय? त्यांना कोणती गती मिळेल?
दादाश्री : आई-वडिलांची सेवा जे करत नाहीत ते या जन्मात सुखी होत नाहीत. आई-वडीलांची सेवा करण्याचे प्रत्यक्ष उदाहरण काय? तर म्हणावे की, साऱ्या आयुष्यात त्यांना दु:ख येत नाही. आई-वडीलांची सेवा केल्याने अडचणीही येत नाहीत!
आपल्या हिंदुस्तानाचे विज्ञान खूप सुंदर होते. म्हणून तर शास्त्रकारांनी सांगितले आहे की आई-वडिलांची सेवा करा. ज्यामुळे आपल्या आयुष्यात कधीच पैशांचे दुःख येणार नाही. आता ते न्यायसंगत आहे की नाही, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आई-वडीलांची सेवा अवश्य करायलाच हवी. कारण जर तुम्ही सेवा केली नाही, तर तुम्हाला कोणाकडून सेवा मिळेल? तुमची येणारी पिढी कशी शिकेल की तुम्ही सेवा करण्यासाठी लायक आहात. मुलं सगळं बघत असतात. ते बघतील की आपल्या वडिलांनी कधी स्वत:च्या वडिलांची सेवा केली नाही! तेव्हा मग मुलांवर तसे संस्कार पडणारच नाही ना!
प्रश्नकर्ता : माझे म्हणणे असे होते की मुलांचे वडिलांसाठी कर्तव्य काय आहे?
दादाश्री : मुलांनी वडिलांसाठी कर्तव्य निभावले पाहिजेत. आणि मुलाने जर कर्तव्य निभावले तर त्याला काय फायदा होईल? आईवडिलांची सेवा जो मुलगा करेल त्याला कधीच पैशांची कमी राहणार नाही. त्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील आणि जो गुरुची सेवा करेल त्याला मोक्ष मिळेल पण आजची पिढी आई-वडील किंवा गुरुची सेवा करतच नाही? ते सगळे जण दुःखी होणार आहेत.
महान उपकारी आई-वडील जो मनुष्य आई-वडिलांचे दोष बघतो त्याच्यात कधीच बरकत येत