________________
सेवा-परोपकार
___37
नाही. कदाचित श्रीमंत बनेल पण त्याची आध्यात्मिक उन्नती होत नाही. आई-वडिलांचे दोष बघायला नको. उपकार तर कधीच विसरायला नको. कोणी चहा पाजला असेल तर त्याचे उपकार जर आपण विसरत नाही, मग आपण आई-वडिलांचे उपकार का विसरतो? तुला समजले? हं.. अर्थात् खुप उपकार मानायला हवेत. खूप सेवा करायला हवी. आईवडिलांची खूप सेवा करायला हवी. ___या जगात तिघांचे महान उपकार आहेत. त्या उपकारांना कधीच विसरायचे नाही.आई-वडिल आणि गुरुचे! आपल्याला ज्यांनी योग्य मार्गावर चालायला शिकविले, ह्या तिघांचे उपकार कधीच विसरायला नको.
'ज्ञानी'च्या सेवेचे फळ आपले सेव्यपद गुप्त ठेवून सेवकभावात राहून आपण काम करायला पाहिजे. 'ज्ञानी पुरुष' तर साऱ्या 'जगा'चे सेवक आणि सेव्य म्हटले जातात. साऱ्या जगाची सेवा पण 'मी' च करतो आणि साऱ्या जगाची सेवाही 'मी' घेतो. हे जर तुला समजले तर तुझे काम झाले.
'आम्ही' इतकीच जबाबदारी घेतो की कोणी मनुष्य आम्हाला भेटायला आला, तर त्याला 'दर्शना'चा लाभ प्राप्त व्हायलाच हवा. 'आमची' सेवा कोणी केली तर त्याची जबाबदारी आमच्यावर येते आणि आम्हाला त्याला मोक्षाला घेऊनच जावे लागते.