________________
सेवा-परोपकार
35
ऐकत नाहीत. दोघांमध्ये खूप दरी निर्माण झाली आहे, जुना काळ आणि नवीन काळ. जुने लोक जुना काळ सोडत नाहीत. मार खातील पण तरीही सोडणार नाहीत.
प्रश्नकर्ता : पासष्ठाव्या वर्षी प्रत्येकाची हीच स्थिती राहते ना?
दादाश्री : हो, अशीच स्थिती, तेच हाल. खरोखर करण्यासारखे काय आहे या काळात? तर एखाद्या ठिकाणी वृद्धांना राहण्यासाठी ठिकाण बनविले तर खूप चांगली गोष्ट होईल. म्हणून आम्ही विचार केला होता. मी सांगितले की, असे काही करायचे असेल तर आधी त्यांना हे ज्ञान द्यायला हवे. नंतर त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था तर लोकांना किंवा अन्य सामाजिक संस्थेला सोपवून दिली तरी चालेल. पण आधी हे ज्ञान दिले असेल तर दर्शन करत राहिले तरी काम चालेल. आणि हे 'ज्ञान' दिले तर शांती राहील बिचाऱ्यांना, नाहीतर कोणत्या आधारावर शांती राहील? तुम्हाला कसे वाटते?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे. दादाश्री : पसंत पडेल अशी गोष्ट आहे की नाही?
वृद्धावस्था आणि साठ-पासष्ट वयाची व्यक्ति असेल आणि घरात राहत असेल, घरातील कोणीही त्यांना गृहीत धरत नसतील तर मग काय होईल? कोणाला काही बोलू शकत नाही आणि मनातच उलटे विचार करुन कर्म बांधून घेईल. म्हणून या लोकांनी जी वृद्धाश्रमाची व्यवस्था केली आहे ती व्यवस्था चुकीची नाही, हेल्पिंग आहे. पण त्यासाठी वृद्धाश्रम नाही, तर खूप सन्मान सूचक शब्द असावा. असा शब्द जो सन्माननीय वाटेल.
सेवेने जीवनात सुख-संपती प्रथम आई-वडीलांची सेवा, ज्यांनी जन्म दिला त्यांची. नंतर गुरुची सेवा. गुरु आणि आई-वडीलांची सेवा तर अवश्य केली पाहिजे. गुरु जर चांगले नसतील तर ती सेवा सोडायला हवी.