________________
सेवा-परोपकार
17
तर आले पाहिजे ना. हे मनुष्यजीवन असे का असावे? हे जर त्यांना समजावले, तर तसे ते सर्व समंजसच आहेत. हे त्याला नीट समजले, आणि त्याने असे केले, मग चालू झाली गाडी. काय वाटते तुम्हाला?
प्रश्नकर्ता : हो तुम्ही सांगत आहात तशी महाजनाची संस्था प्रत्येक ठिकाणी असायची.
दादाश्री : पण आता ते सुद्धा अडचणीत पडले आहेत ना! म्हणजे यात कोणाचाच दोष नाही. जे झाले ते झाले, पण आता अशा विचारांनी सुधारले तर अजूनही सुधरु शकतो आणि बिघडलेल्याला सुधरावयाचे त्याचे नांव धर्म. सुधरलेल्याला सुधरवायला तयारच असतात सर्व, पण बिघडलेल्याला सुधरवणे, याचेच नांव धर्म.
___ मानवसेवा ही प्रभूसेवा? प्रश्नकर्ता : मानवसेवा, ही तर प्रभूसेवा आहे ना!
दादाश्री : नाही, प्रभूसेवा नाही. दुसऱ्यांची सेवा केव्हा करता? तर स्वतःला आतून दुःख वाटते. तुम्हाला कोणत्याही मनुष्याची दया येते, त्याची स्थिती बघून तुम्हाला दु:ख होते आणि त्या दुःखाला मिटविण्यासाठी तुम्ही सेवा करता. अर्थात् हे सर्व आपलेच दु:ख संपविण्यासाठी आहे. एका माणसाला खूप दया येते. तो म्हणतो की, 'मला या लोकांबद्दल दया वाटल्याने त्यांना मी हे दिले, ते दिले...' नाही, अरे, तू तुझे दुःख मिटाविण्यासाठी या लोकांना देतोस. तुम्हाला समजली ही गोष्ट? खूप सूक्ष्म आहे ही गोष्ट. स्थूल गोष्ट नाही ही. स्वतःचे दु:ख मिटवण्यासाठी देत आहे. पण ही चांगली गोष्ट आहे. कोणला तरी द्याल तर तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल.
प्रश्नकर्ता : पण जनता जनार्दनाची सेवा हीच भगवंत सेवा आहे की मग अमूर्ताला मूर्त रुप देऊन पूजा करणे ही आहे ?
दादाश्री : जनता जनार्दनाची सेवा केल्याने आपल्याला संसारातील