________________
सेवा-परोपकार
पाहिली तर ती वकीली म्हटली जाईल. यामुळे समोरच्याची समज काय आहे हे पहायचेच नसते.
ही झाडे आहेत ना सगळी, आंबा आहे, निंब आहे या सगळ्या झाडांवर फळं येतात. तेव्हा आंब्याचे झाड स्वतःच्या किती कैऱ्या खात असेल?
प्रश्नकर्ता : एक सुद्धा नाही.
दादाश्री : कोणासाठी आहेत हे ? प्रश्नकर्ता : दुसऱ्यांसाठी.
दादाश्री : हो, तेव्हा ते झाड असे बघते का, की हा लबाड आहे की चांगला आहे ? जो घेऊन जाईल त्याची, माझी नाही. झाड तर परोपकारी जीवन जगतात. असे जीवन जगताना त्या जीवांची हळूहळू उर्ध्वगती होते.
प्रश्नकर्ता : पण अनेकदा असे होते की ज्यांच्यावर उपकार केले जातात ती व्यक्ति उपकार करणाऱ्यावरच दोषारोपण करतांना दिसते.
दादाश्री : हो, तेच तर बघायचे आहे ना? जो उपकार करतो ना, त्याच्यावर सुद्धा अपकार करतो.
प्रश्नकर्ता : समज नसल्यामुळे.
दादाश्री : ही समज तो कुठून आणणार? समज असेल तर कामच होईल ना! अशी समज आणणार?
परोपकार तर फारच उच्च स्थिती आहे. परोपकारी जीवन, हेच, संपूर्ण मनुष्य जीवनाचे ध्येय आहे.
आयुष्यात, महत्वाची कार्य ही दोनच आणि दुसरे या हिंदुस्तानात मनुष्याचा जन्म कशासाठी आहे ?