________________
सेवा-परोपकार
स्वत:चे हे बंधन, कायमचे बंधन तुटावे या हेतुसाठी आहे, 'अॅब्सोल्यूट' होण्यासाठी आहे. आणि जर तुला 'अॅब्सोल्यूट' होण्याचे ज्ञान प्राप्त झाले नाही, तर तु दुसऱ्यांसाठी जगायला शिक. ही दोनच कार्य करण्यासाठी हिन्दुस्तानात जन्म आहे. ही दोन कार्य लोकं करत असतील? लोकांनी तर भेसळ करुन मनुष्यातून जनावरात जाण्याची कला शोधून काढली आहे.
सरळतेचे उपाय प्रश्नकर्ता : जीवन सात्विक आणि सरळ बनविण्यासाठी कोणते उपाय आहेत?
दादाश्री : तुझ्याजवळ जे आहे ते ओब्लाईजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) करुन इतरांना देत जा. तर आपणहूनच जीवन सात्विक बनत जाईल. ओब्लाइजिंग नेचर केले होतेस का तू? तुला ओब्लाइजिंग नेचर आवडतो का?
प्रश्नकर्ता : काही प्रमाणात केलेले!
दादाश्री : ते जास्त प्रमाणात करशील तर जास्त फायदा मिळेल. परोपकार करत रहावे. कोणाला काही हवे असेल तर आणून द्यावे, कोणी दुःखी असेल तर त्यांना दोन कपडे शिवून द्यावे या प्रकारे उपकार करत रहायचे.
भगवंत म्हणतात की, मन-वचन-काया आणि आत्म्याचा (प्रतिष्ठित आत्म्याच्या) उपयोग दुसऱ्यांसाठी कर. आणि मग जर तुला काहीही दुःख आलेच तर मला सांग.
धर्माची सुरुवातच 'ओब्लाइजिंग नेचर' ने होते. तुम्ही तुमच्या घरातील वस्तु दुसऱ्यांना दिल्या, त्यातच आनंद आहे. तेव्हा लोकं तर घ्यायचे शिकतात! तुम्ही तुमच्यासाठी काहीच करु नका. लोकांसाठीच करत राहा, मग स्वतःसाठी काहीच करावे लागणार नाही.