________________
संपादकीय आपले मन-वचन-काया दुसऱ्यांच्या सुखासाठी वापरले तर आपल्या स्वत:च्या जीवनात कधीच सुखाची कमतरता पडणार नाही. आणि स्वतःचे सेल्फ रियलाइजेशन (आत्मसाक्षात्कार) करुन घेतले, तर सनातन सुखाची प्राप्ती होईल. मनुष्य जीवनाचे ध्येय हे एवढेच आहे. या ध्येयाच्या मार्गाने चालायला लागलो तर मनुष्याला जीवनमुक्त दशेचा अनुभव येईल. त्यानंतर मग ह्या जीवनात प्राप्त करण्यासारखे काहीच उरत नाही.
आंब्याचे झाड स्वत:चे किती आंबे खात असेल? त्याची फळे, लाकुड, फांद्या सर्वकाही दुसऱ्यांसाठीच उपयोगी असते ना! त्याचे फळ स्वरूप त्याला उर्ध्वगती प्राप्त होत राहते. धर्माची सुरुवात ऑब्लाइजिंग नेचर(परोपकारी स्वभाव)पासून होते. दुसऱ्याला काहीपण द्याल तेव्हापासूनच स्वतःला आनंद सुरु होतो.
परम पूज्य दादाश्री एकाच वाक्यात म्हणतात की, जी मुले आपल्या आई-वडिलांची सेवा करतात त्यांना कधीच पैश्यांची कमतरता येणार नाही, आणि जे आवश्यक आहे ते सर्व त्यांना मिळत जाईल आणि आत्मसाक्षात्कारी गुरुची सेवा केल्यास मोक्षाला जातो.
दादाश्रींनी स्वत:च्या आयुष्याचे एकच ध्येय ठरविले होते की, मला जो भेटला त्याला सुख मिळायलाच हवे. स्वत:च्या सुखाचा विचार सुद्धा त्यांनी कधी केला नाही. समोरच्या व्यक्तिची काय अडचण आहे आणि ती कोणत्या प्रकारे दूर करता येईल, या भावनेतच ते निरंतर राहिले. आणि तेव्हाच त्यांना कारुण्यता आणि अद्भूत अध्यात्म विज्ञान प्रकट झाले.
प्रस्तुत संकलनामध्ये दादाश्री सर्व दृष्टीकोणातून जीवनाचे ध्येय कशा प्रकारे सिद्ध करावे, की जे सेवा-परोपकारासहित असेल, त्याची समज सरळ-अचूक दृष्टांताद्वारे फिट करुन देतात. जे जीवनात ध्येयरुपाने आत्मसात केले तर मनुष्य जीवनाची सार्थकता झाली असे म्हटले जाईल.
- डो. नीरूबहन अमीन