________________
सेवा-परोपकार
सांगतील की, 'आम्ही स्वतःचीच करतो.' तेव्हा आपण त्यांना म्हणायला हवे की 'मलाही असा मार्ग दाखवा!'
'स्वत:च्या' सेवेचे लक्षण प्रश्नकर्ता : स्वत:च्या सेवेचे लक्षण कोणते आहे?
दादाश्री : 'स्वतःची' सेवा म्हणजे कोणालाही दुःख द्यायचे नाही. हे सर्वात पहिले लक्षण. त्यात सर्व गोष्टी येऊन जातात. त्याच्यात अब्रह्मचर्यचेही सेवन करायचे नाही. अब्रह्मचर्याचे सेवन करणे म्हणजे दुसऱ्याला दुःखं देण्यासारखे आहे. जरी राजीखुशीने अब्रह्मचर्य झाले तरी त्यात किती जीव मारले जातात! म्हणून ते दु:ख देण्यासारखे आहे. त्यामुळे सेवाच बंद होऊन जाते. त्यानंतर खोटे बोलायचे नाही, चोरी करायची नाही, हिंसा करायची नाही. धन साठवायचे नाही. परिग्रह करणे, पैसे साठवणे ही हिंसाच आहे. दुसऱ्यांना दु:ख देणे यात सर्व येऊन जाते.
प्रश्नकर्ता : स्वत:च्या सेवेची दुसरी लक्षणे कोण कोणती आहेत? स्वत:ची सेवा करत आहे, असे केव्हा म्हटले जाईल?
दादाश्री : 'स्वत:ची' सेवा करणाऱ्याला भले ही जगातील सगळे जण दुःख देतील, पण तो मात्र कोणालाही दुःख देणार नाही. दुःख तर देत नाही, पण विचार देखील वाईट करत नाही की तुझे वाईट हो! 'तुझे भले हो.' असेच म्हणतो.
हो, तरी पण समोरचा बोलला तरी हरकत नाही. समोरचा बोलला की, तुम्ही नालायक आहात, बदमाश आहात, तुम्ही दुःखं देतात, यात आपल्याला काहीच हरकत नसावी. आपण काय करतो हे बघायचे आहे, समोरचा रेडिओ प्रमाणे बोलतच राहिल, जसा रेडिओ वाजतो तसा!
प्रश्नकर्ता : आयुष्यात सगळे लोक आपल्याला दुःख देतील आणि तरीही आम्ही सहन करु, असे तर होणार नाही. घरातील लोकांनी जरासे जरी अपमानजनक वर्तन केले तरी सहन होत नाही तेव्हा!