________________
480 :: मूकमाटी-मीमांसा आणखी एक उदाहरण :
"...जो जीव/अपनी जीभ जीतता है/दुःख रीतता है उसी का
सुख-मय जीवन बीतता है/चिरंजीव बनता वही।” (पृ. ११६) हया काव्यातून उद्बोधनाने जनमाणसाला आत्मचिंतनाची वाट दिसते. विडंबनाच्या माध्यमातून हे काव्य वाट चुकलेल्यांना सतर्क करविते. मानव जातीच्या त्रुटी दाखवून त्यांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न हे काव्य करते. कवीने सामाजिक जीवनातील दंभस्फोट ही आपल्या काव्यातून घडविला आहे. आपल्या अवती भोवतीच्या समाजातील भांडणे या अनंत दुर्गुणांवर कवीने निर्भीडपणे तोंडसुख घेतले आहे. सामाजिक शोषणाबद्दल कवी म्हणतो-पंचमचतुर्थया वादाबद्दल निर्देश असावा.
"क्या पता नहीं तुझको !/छोटी को बड़ी मछली/साबुत निगलती हैं यहाँ और/सहधर्मी सजाति में ही/वैर वैमनस्क भाव/परस्पर देखे जाते हैं ! श्वान श्वान को देख कर ही/नाखूनों से धरती को खोदता हुआ गुर्राता है बुरी तरह।/...विजाति का क्या विश्वास ? आज श्वास-श्वास पर/विश्वास का श्वास घुटता-सा देखा जा रहा है। प्रत्यक्ष !/...यहाँ 'तो'''/'मुँह में राम/बगल में छुरी'
बगुलाई छलती है।" (पृ. ७१-७२) बाह्य क्रियाकांडामध्ये गुंतणाऱ्याबद्दल लेखक सांगतो :
"बाहरी क्रिया से/भीतरी जिया से/सही-सही साक्षात्कार
किया नहीं जा सकता।” (पृ. ३०) भारतीय कवितेला नवे अध्यात्मिक वळण देणारे हे महाकाव्य आहे. जैन साहित्यकांना एक विशिष्ट अशी अध्यात्मिक चिंतानांची, मूलगामी विचारांची, निर्भिड प्रतिपादनाची, मनोविश्लेषणात्मक निरूपणाची बैठक असते. ही सर्व वैशिष्ट्ये 'मूकमाटी' मध्ये आहेत. एखाद्या दार्शनिकाने सत्य निरूपणाची उकल करून ठेवावी असे रूप धारण करणारी ही कविता आहे. मनोरंजनापेक्षा प्रबोधनाचे, प्रचितीचे, अनुभवाचे भाष्य करणारी ही 'गीता' आहे पावलोपावली स्वत:चेच अंतरंग वेचून, जगापुढे ते अंतरंग उलगडून पसरण्याचा प्रयत्न करणारी ही एक कविता आहे. 'दिगंबर मुद्रा'- धारण करणाऱ्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहिताना कवि म्हणतो :
“कम से कम एक कम्बल तो"/काया पर ले लो ना ! ...कम बलवाले ही/कम्बल वाले होते हैं और/काम के दास होते हैं।
हम बलवाले हैं/राम के दास होते हैं और/राम के पास सोते हैं।" (पृ. ९२) जगातील सर्व रस- वीर रस, शृंगार रस, हास्य रस, रौद्र रस- या सर्वांची निरूपयोगिता काव्यातून दाखवून शेवटी कवी एका शाश्वत रसाची चर्चा करतो आणि तो आहे 'शान्त रस'। कवि म्हणतो :
___. “जो अरस का रसिक रहा है/उसे रस में से रस आये कहाँ ?' (पृ. १३९)
- "जिसे रूप की प्यास नहीं है,/अरूप की आस लगी हो